आमचा 5जी फोन रेडी आहे, आम्ही कधीही लॉन्च करू शकतो: आदित्य बब्बर

गेल्यावर्षी पासूनच 5जी ची चर्चा जोरात आहे आणि 2019 मध्ये तर जवळपास सर्व कंपन्यानी आपल्या 5जी फोनची माहिती दिली आहे. पण यात सर्वात पुढे सॅमसंग आहे. कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये 5जी फोन लॉन्च केला आहे आणि लवकरच हा फोन यूएस सहित यूरोप मध्ये उपलब्ध होईल. अलीकडेच सॅमसंग ने भारतात पण गॅलेक्सी एस10 सीरीज सादर केला आहे. परंतु कंपनी ने 5जी मॉडेल लॉन्च केला नाही. पण लोकांना आशा होती कि कदाचित कंपनी भारतात पण 5जी फोनची माहिती देईल आणि सर्वात आधी 5जी आणेल, परंतु असे झाले नाही.

भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या लॉन्चच्या वेळी आमची भेट सॅमसंग इलेक्ट्रानिक्सचे प्रोडक्ट हेड ‘आदित्य बब्बर’ यांच्याशी झाली आणि आम्ही कंपनी कधी आपला 5जी फोन भारतात आणणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत ते म्हणाले कि, ”सर्वात आधी सॅमसंगनेच 4जी फोन आणले होते आणि 5जी फोन पण आमचाच सर्वात आधी तयार आहे, आम्ही कधीही लॉन्च करू शकतो. भारतात सध्या 5जी नेटवर्क नाही त्यामुळे 5जी फोन आणून काही फायदा नाही. सॅमसंगचा 5जी फोन यूएस आणि यूके सहित इतर देशांत उपलब्ध होईल जिथे 5जी नेटवर्क उपलब्ध झाला आहे. भारतात 5जी नेटवर्क येताच आमचा फोन सर्वात आधी लॉन्च होईल.”

कोणत्या कंपन्यांनी दाखवले 5जी फोन

सॅमसंग गॅलेक्सी एस10 5जी व्यतिरिक्त शाओमीने आपला 5जी फोन सादर केला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस मध्ये शाओमी ने पण मी मिक्स 3 चा आपला 5जी फोन दाखवला आहे. वनप्लसचा पण 5जी फोन तिथे होता पण प्रोटोटाइप स्वरूपात. कॉमर्शियल डिवाइस अजूनतरी आला नाही पण कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच क्वालकॉम द्वारा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेटची एक कॉन्फ्रेंस आयोजित केली होती ज्यात कंपनी ने 5जी प्लान बद्दल माहिती दिली होती. त्यावेळी सॅमसंग सोबतच इतर सर्व चीनी मोबाईल निर्मात्यांनी पण आपले 5जी फोन बद्दलचे प्लान सांगतिले होते ज्यात वनप्लस, शाओमी, ओपो आणि एलजी चा समावेश आहे.

भारतात कधी येतील 5जी फोन

या सर्व कंपन्यांनी 5जी फोनची घोषणा करून पण आतापर्यंत भारतात 5जी बद्दल स्थिति स्पष्ट नाही. याचे सर्वात मोठे कारण आहे 5जी नेटवर्कचे नसणे. आशा आहे कि यावर्षीच्या शेवट्पर्यंत 5जी नेटवर्कच्या स्पेक्ट्रमची लिलाव केला जाईल आणि त्यांनतर काही स्पष्ट होईल. रिलायंस जियो आणि एयरटेल सारख्या मोठ्या कंपन्यांनी हि आधीच घोषणा केली आहे कि त्यांचे नेटवर्क 5जी रेडी आहेत. गेल्यावर्षी एयरटेल ने हुआवई सोबत मिळून गुरुग्राम मानेसर मधील आपल्या ऑफिस मध्ये 5जी टेस्ट पण केले होते.

असे असतानाही स्पेक्ट्रम येताच 5जी सर्विस सगळीकडे उपलब्ध होईल असे बोलता येत नाही. उलट स्पेक्ट्रमचा लिलाव वर्षाच्या शेवटीपण होऊ शकतो त्यात जवळपास वर्षभर लागेल आणि 2021—2022 पर्यंत भारतातील सर्व शहरांत येईल. तर 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरवातीला जर 5जी डिवाइस भारतात आले तर ते महाग असतील. स्वस्त 5जी डिवाइस साठी थोडी वाट बघावी लागेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 5जी फोन स्पेसिफिकेशन

सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासोबतच गॅलेक्सी एस10 5जी मॉडेल पण सादर केला आहे. या फोन मध्ये 2.8 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोनला 5जी ची ताकद देण्यासाठी क्वालकॉमचा एक्स50 5जी मॉडेम पण आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 5जी 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे जो क्रमश 512जीबी तसेच 1टीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

गॅलेक्सी एस10 5जी 1440 x 3040 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.7—इंचाच्या क्यूएचडी कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल + 16-मेगापिक्सल + टोओएस लेंस चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 10-मेगापिक्सल आणि 3डी टीओएस सह डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 5जी 1,500यूएस डॉलर च्या किंमतीत लॉन्च केला आहे जो भारतीय करंसी नुसार जवळपास 1,06,300 रुपये होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here