Categories: बातम्या

Moto G85 5G किती रुपयांमध्ये लाँच होईल? रिलीज होण्याच्या आधी किंमत झाली लीक

Motorola बाबत बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘जी’ सीरिजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे ज्याला Moto G85 5G नावाने मार्केटमध्ये आणले जाईल. हा मोबाईल युरोपच्या एाक रिटेलर वेबसाईटवर पण स्पॉट करण्यात आला आहे जिथे कंपनी घोषणेच्या आधी या 5 जी फोनची किंमत समोर आली आहे. मोटो जी 85 5 जी किती रुपयांमध्ये लाँच होईल? ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G85 5G किंमत (लीक)

मोटो जी 85 5 जी फोनला युरोपियन रिटेलर्स वेबसाईटवर 12GB RAM + 256GB Storage सह लिस्ट करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये या फोनची किंमत €300 सांगण्यात आली आहे. हा 300 यूरो भारतीय चलनानुसार 26,900 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की भारतात यापेक्षा कमी किंमतीत लाँच होईल. तसेच भारतात 12GB+256GB Moto G84 5G 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Moto G84 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.55″ 120 हर्ट्झ ओएलईडी डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 16 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : मोटो जी 84 5जी फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असणारा ही मोबाईल स्क्रीन पीओएलईडी पॅनलवर बनली आहे ज्यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट तसेच 1300 निट्स ब्राईटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो. या डिस्प्लेवर बेजल्स खूप नॅरो बनविले गेले आहेत.

परफॉर्मन्स : मोटो जी 84 5 जी फोनमध्ये पण अँड्रॉईड 13 आपरेटिंग सिस्टम मिळते. हा मोबाईल फोन 6 एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो 619 जीपीयू मिळतो.

कॅमेरा : मोटो जी 84 5जी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल मॅक्रो + डेप्थ सेन्सर आहे. हा कॅमेरा सेटअप अल्ट्रा पिक्सल टेक्नॉलॉजीवर चालतो, ज्याला ओआयएस फिचर पण मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : मोटो जी 84 5जी फोनला पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले गेले आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी हा स्मार्टफोन 33W Turbo charging टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे.

इतर फिचर्स : मोटो जी 84 5 जी फोन IP54 रेटिंगसह येतो. यात Dolby Atmos Stereo speakers, Bluetooth 5.1, NFC, 5GHz Wi-Fi आणि GPS सोबतच Dual SIM ला सपोर्ट मिळतो.

Published by
Kamal Kant