रिलायंस जियो भारतीय टेलीकॉम बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आहे. जियो ने आपल्या फ्री सेवा आणि 4जी सर्विस च्या जोरावर थोड्याच वेळात दूरसंचार विभागात मोठे स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की जियो चा बिजनेस तोट्यात चालू आहे पण असे असूनही कंपनी आपल्या ग्राहकांना कमीत कमी किंमतीत सुविधा देत आहे. आता जियो बद्दल आश्चर्यकारक बातमी आली आहे ज्या नुसार जियो ने परदेशातून 1 अब्ज डॉलर चे कर्ज घेतले आहे.
रिलायंस जियो ने स्वतः हे सार्वजनिक केले आहे की कंपनी परदेशातून कर्ज घेणार आहे. जियो ने सांगितले आहे की कपंनी एकाच नाही तर वेगवेगळ्या अनेक बँकांकडून लोन घेईल आणि या कर्जाची एकूण किंमत 1 अब्ज डॉलर च्या आसपास असेल. रिलायंस जियो या कर्जाने सॅमसंग आणि ऐस टेक्नोलॉजी सह 4 कंपन्यांन सोबत होणारे व्यवहार फाइनेंस करेल.
जियो घेत असलेल्या या लोन ला विमा कवर देण्यासाठी कोरिया ट्रेड इंश्योरेंस कार्पोरेशन कंपनी पुढे आली आहे जी या ट्रांजेक्शन वर नजर ठेवेल. जियो नुसार हे कर्ज आस्ट्रेलिया एंड न्यूजीलँड बँकिंग ग्रुप, एचएसबीसी, बीएनपी परिबा, कोमर्जबँक, सिटीबँक, आईएनजी बँक, जेपीमोर्गन चेज बँक, मिजुहो बँक, एमयूएफजी बँक आणि बँकों सेंटांदर घेतले जाईल.
विशेष म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज द्वारा घेतला जाणारा हे पाचवे कर्ज असेल. बाजारा संबधी जाणकारांचे म्हणणे आहे की जियो अवलंबलेल्या या धोरणामुळे कंपनी ला नुकसान होण्याची शक्यता पण आहे. पण हे नुकसान शॉर्ट-टर्म म्हणजे थोड्या वेळा साठी असेल तर दुसरीकडे या धोरणामुळे कंपनी च्या मार्केट शेयर्स मध्ये वृद्धि होईल.