108MP Camera Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Aug 2022 11:34:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/#respond Wed, 24 Aug 2022 11:34:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12440 स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. जास्त मेगापिक्सल म्हणजे जास्त चांगला कॅमेरा नव्हे, हे जरी खरं असलं तरी जास्त रिजोल्यूशनचे फायदे देखील आहेत. त्यामुळे तुम्ही देखील 108MP चा हाय रिजोल्यूशन असलेला कॅमेरा फोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला भारतीय […]

The post 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. जास्त मेगापिक्सल म्हणजे जास्त चांगला कॅमेरा नव्हे, हे जरी खरं असलं तरी जास्त रिजोल्यूशनचे फायदे देखील आहेत. त्यामुळे तुम्ही देखील 108MP चा हाय रिजोल्यूशन असलेला कॅमेरा फोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

20 हजारांच्या बजेटमधील 108MP चा कॅमेरा असलेले फोन्स

Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G

किंमत: 19,999 रुपये

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीचा हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा म्हणून 108MP चा Samsung HM2 सेन्सर मिळतो. जोडीला 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच 5000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Motorola Edge 20 Fusion

किंमत: 19,999 रुपये

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या Edge 20 Fusion फोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसरची पावर आहे. हा फोन 5000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP च्या अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP च्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 9

किंमत: 16,999 रुपये

Realme 9 स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 लेयर प्रोटेक्शनसह येतो, ज्यात पंच होल कटआउट मिळते. रियलमीच्या या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh ची बॅटरी आहे. रियलमी 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा Samsung ISOCELL HM6 सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Moto G60

किंमत: 14,999 रुपये

Moto G60 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G SoC प्रोसेसर मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा सेन्सर आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Infinix Note 12 Pro 5G

किंमत: 17,999 रुपये

Infinix Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंग पावरसाठी मीडियाटेकचा Dimensity 810 5G चिपसेट मिळतो. फोनमध्ये 5000mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. Infinix Note 12 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 2MP चा अल्ट्रा वाइड आणि एक AI लेन्स आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/#respond Thu, 31 Oct 2019 11:09:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5639 Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच Mi Note 10 स्मार्टफोन आणणार आहे. Xiaomi च्या पोलॅंड वेबसाइटने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे सांगितले आहे कि Mi Note 10 108MP Penta Camera सह लॉन्च केला जाईल तसेच पोलॅंडच्या बाजारात हा फोन येत्या 14 नोव्हेंबरला येईल. Mi Note 10 जगातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. Mi Note 10 च्या लॉन्चच्या आधीच आता या फोनच्या रिटेल बॉक्सचे फोटो इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Mi Note 10 च्या रिटेल बॉक्स संबंधित एक लीक काही दिवसांपूर्वी पण समोर आला होता, पण आता नवीन लीक मध्ये फोनच्या रिटेल बॉक्सची फुल ईमेज दाखवण्यात आली आहे. सर्वात आधी फोन बद्दल बोलायचे झाले तर Mi Note 10 पेंटा कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर पाच रियर कॅमेरा सेंसर मिळतील. जास्त सेंसर्स सोबतच हा फोन हाई मेगापिक्सलला पण सपोर्ट करेल. Mi Note 10 108MP च्या प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल.

Xiaomi Mi Note 10

Mi Note 10 संबंधित लीक मध्ये समोर आले होते कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 1080पिक्सलला सपोर्ट करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच डिवाईस मध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. तर प्रोसेसिंग साठी Mi Note 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह एकूण 5 सेंसर्स दिले जातील तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीक नुसार Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

108 MP कॅमेरा ऐसे करेल काम

Xiaomi Mi Note 10 मध्ये Samsung ने सादर केलेला ISOCELL Bright HMX सेंसर मिळेल. हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो. ISOCELL Bright HMX मध्ये Tetracell टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळ्या पिक्सल्सला सोबत घेऊन काम करते आणि चारही कॅप्चर फोटो एक बनवते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज कमी असल्यामुळे आब्जेक्टचे रंग पण योग्यरीत्या कॅप्चर होतात.

हे देखील वाचा: 108 MP कॅमेरा असलेल्या Xiaomi CC9 Pro ची संपूर्ण माहिती झाली लीक, 5X ऑप्टिकल झूम सपोर्ट असेल यात

तसेच जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर काम करेल जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX चा प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले बनवतो. विशेषसा म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल 108 MP पेंटा कॅमेरा असेलेला Xiaomi Mi Note 10, लॉन्चच्या आधी फोनचा रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-world-first-108-mp-penta-camera-retail-box-leaked/feed/ 0