5G Smartphone.Oppo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Dec 2019 13:35:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/#respond Thu, 26 Dec 2019 13:35:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6127 Reno 3 सीरीजचे हे दोन्ही डिवाईस OPPO चे 5G स्मार्टफोन आहेत जे शानदार लुक सोबत पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतात

The post OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दीर्घ प्रतीक्षेनंतर आज OPPO च्या ‘रेनो सीरीज’ चे नवीन स्मार्टफोन्स टेक मार्केट मध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी OPPO च्या अधिकृत चीनी वेबसाइट वर ऑफिशियल झाल्यानंतर आज OPPO Reno 3 आणि Reno 3 Pro स्मार्टफोन बाजारात आले आहेत. OPPO ने आज चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करून हे दोन्ही स्मार्टफोन्स विक्री साठी मार्केट मध्ये सादर केले आहेत. Reno 3 सीरीजचे हे दोन्ही डिवाईस OPPO चे 5G स्मार्टफोन आहेत जे शानदार लुक सोबत पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतात. चला नजर टाकूया OPPO Reno 3 आणि Reno 3 Pro स्मार्टफोन वर

OPPO Reno 3 Pro

रेनो 3 प्रो बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन पंच-होल डिजाईन सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस कर्व्ड स्क्रीन देण्यात आली आहे जी उजव्या आणि डाव्याबाजूने बॅक पॅनलकडे वळली आहे. तसेच पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे वर आहे. Oppo Reno 3 Pro चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92:1 आहे तसेच हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येते.

Oppo Reno 3 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च झाला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. फोटाग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OPPO Reno 3

Oppo Reno 3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला आहे. कंपनीने हा फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह आणला आहे जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. Oppo Reno 3 एंडरॉयड 10 ओएस सह मीडियाटेकच्या डामेनसिटी 1000एल चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo Reno 3 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Oppo Reno 3 पावर बॅकअप साठी VOOC 4.0 आणि 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,025 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Oppo Reno 3 Pro दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनच्या 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 40,500 रुपये) आणि 12 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 4499 युआन (जवळपास 45,600 रुपये) आहे.

त्याचप्रमाणे Oppo Reno 3 चा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज आणि दूसरा वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. फोनचा 8 जीबी रॅम वेरिएंट 3399 युआन (जवळपास 35,500 रुपये) तर 12 जीबी रॅम वेरिएंट 3699 युआन (जवळपास 37,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन Sunrise impression, Moon night black, Blue starry night आणि Misty white कलर मध्ये विकत घेता येईल.

The post OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/feed/ 0