600MPCamera - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 27 Jun 2020 14:19:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग 600 मेगापिक्सल कॅमेरा वर करत आहे काम, फोटोग्राफीच्या दुनियेत होईल क्रांतिकारी बदल https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-600-megapixel-camera-for-future-phones-know-everything-about/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-600-megapixel-camera-for-future-phones-know-everything-about/#respond Tue, 21 Apr 2020 14:17:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7561 कॅमेरा सेंसर्स बद्दल सॅमसंग पुढे असा सेंसर बनवण्याचा विचार करत आहे जो सुगंध आणि चव पण ओळखू शकेल.

The post सॅमसंग 600 मेगापिक्सल कॅमेरा वर करत आहे काम, फोटोग्राफीच्या दुनियेत होईल क्रांतिकारी बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आता पर्यंत 48MP, 64MP आणि 108MP चे कॅमेरा स्मार्टफोन सादर केले आहेत. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी कथितपणे 150MP सेंसर वर पण काम करत आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणत आहे कि ते 600MP कॅमेरा सेंसर वर काम करत आहेत.

माणसाच्या डोळ्यांची बरोबरी करेल कॅमेरा

बोलले जात आहे कि 600MP कॅमेरा सेंसर माणसाच्या डोळ्यांपेक्षा चांगल्या रेजॉलूशन सह येईल. कंपनीचे एग्जिक्यूटिव वाइस प्रेजिडेंट आणि सेंसर बिजनस टीम हेड के यॉन्गीन पार्क यांच्या मते माणसाचे डोळे 500MP रेजॉलूशनची बरोबरी करतात.

नवीन टेक्नोलॉजी वर चालू आहे काम

कॅमेरा सेंसर्स बद्दल सॅमसंग पुढे असा सेंसर बनवण्याचा विचार करत आहे जो सुगंध आणि चव पण ओळखू शकेल. कंपनी स्मार्टफोन्स व्यतिरिक्त ऑटोनोमस वेइकल, ड्रोन आणि इतर इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये आपल्या हाई रेजॉलूशन कॅमेरा सेंसरचा वापर करण्याचा विचार करत आहे.

108-मेगापिक्सल कॅमेरा

सॅमसंगने काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी S20 अल्ट्रा 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लॉन्च केला होता. कंपनीने मे 2019 मध्ये 64 मेगापिक्सल असलेला कॅमेरा सेंसर सादर केला होता. आज 64एमपी कॅमेरा असलेले फोन मिड-रेंज मध्ये उपलब्ध केले जात आहेत.

सॅमसंगच्या 108 मेगापिक्सल सेंसर बद्दल बोलायचे झाले तर 108 मेगापिक्सलच्या सेंसरने 12032 x 9024 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला फोटो क्लिक केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर जर हा सेंसर असलेल्या फोन मधून वीडियो रेकॉर्ड केल्यास तो 6K रेज्ल्यूशन असलेला म्हणजे 6016 x 3384 पिक्सल्स वर फिल्म बनवू शकतो. हा सेंसर 30fps म्हणजे 1 सेकंदात 30 फ्रेम कॅप्चर करू शकतो.

The post सॅमसंग 600 मेगापिक्सल कॅमेरा वर करत आहे काम, फोटोग्राफीच्या दुनियेत होईल क्रांतिकारी बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-600-megapixel-camera-for-future-phones-know-everything-about/feed/ 0