Aarogya Setu Mobile App - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 14 Apr 2020 13:16:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आरोग्य सेतु ऍपचा फायदा काय, हे ऍप डाउनलोड करण्यावर पंतप्रधानांनी का दिला जोर, जाणून घ्या या ऍप बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-aarogya-setu-mobile-app-how-to-use-install-benifite-corona-virus-lockdown-india-covid-19/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-aarogya-setu-mobile-app-how-to-use-install-benifite-corona-virus-lockdown-india-covid-19/#respond Tue, 14 Apr 2020 13:16:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7079 आज देशाला संबोधित करताना मोदींनी Aarogya setu App चा पण उल्लेख केला आणि हा फोन मध्ये डाउनलोड करण्यावर जोर दिला आहे.

The post आरोग्य सेतु ऍपचा फायदा काय, हे ऍप डाउनलोड करण्यावर पंतप्रधानांनी का दिला जोर, जाणून घ्या या ऍप बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सर्व देश या महामारीशी लढा देत आहेत आणि भारत पण यातून वाचला नाही. Coronavirus चा धोका कमी करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन पूर्ण झाल्यांनंतर आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी याचा काळ वाढवला आहे. Lockdown आता 3 मे पर्यंत लागू राहील आणि या काळात सर्वांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज देशाला संबोधित करताना मोदींनी Aarogya setu App चा पण उल्लेख केला आणि हा फोन मध्ये डाउनलोड करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न आला असेल कि कि हा आरोग्य सेतु ऍप आहे तरी काय आणि कशाप्रकारे चालतो. तसेच हा ऍप आपल्या फोन मध्ये इंस्टाल केल्यावर कशाप्रकारे कोरोना वायरसच्या विरोधात लढण्यास मदत होईल. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मदत होईल.

आरोग्य सेतु ऍप म्हणजे काय

Aarogya setu App भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सादर केला आहे. हा खास ऍप कोरोना वायरस तसेच त्याच्या संक्रमणाच्या धोक्क्याची माहिती लोकांना समजण्यास मदत करतो. तसेच या वायरस पासून वाचण्याचे आणि याचे संक्रमण रोखण्याचे उपाय पण सांगण्यात आले आहेत. या ऍपच्या माध्यमातून यूजर स्वतःच जाणून घेऊ शकतो कि तो कोरोना वायरसच्या संक्रमणापासून किती सुरक्षित आहे तसेच तुमहाला तुमच्या विभागाची माहिती पण आरोग्य सेतु ऍपच्या माध्यमातून मिळते.

असे करा इंस्टाल

आता पर्यंत Aarogya setu App ची लिंक तुमच्याकडे पोहचली असेल. व्हाट्सऍप ग्रुप सोबतच भारत सरकार पण मेसेजच्या माध्यमातून या ऍपची लिंक लोकांना फोन वर पाठवत आहे. पण तरीही खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करून आरोग्य सेतु ऍप आपल्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता.

एंडरॉयड फोन / आईफोन

-> ऍप इंस्टाल केल्यानंतर तुमची आवडीची भाषा निवडा. इथे मराठी व इंग्लिश सोबतच 11 भारतीय भाषा उपलब्ध आहेत तसेच तुम्ही नंतर पण भाषा बदलू शकता.

-> तुम्हाला आरोग्य सेतु ऍप वर रजिस्टर करावे लागेल. रजिस्टर करण्यासाठी फोन नंबर टाकावा लागेल त्या नंतर ओटीपी द्वारे वेरिफाई केले जाईल.

-> मोबाईल नंबर वेरिफाई केल्यावर Aarogya setu App तुमच्याकडे ब्लूटूथ आणि लोकेशनचा ऍक्सेस मागेल, त्याला सहमती द्या. कारण याच्या मदतीने हा ऍप कोरोना वायरस ट्रॅक करेल.

-> रजिस्ट्रेशन नंतर खाजगी माहिती मागितली जाईल ज्यात नाव आणि वय सोबतच प्रवासाचा इतिहास विचारला जाईल. इथे यूजरला विचारले जाईल कि गरज पडल्यास ते स्वयंसेवक म्हणून काम करू शकतील का. सर्वकाही निवडून सब्मिट करा.

असे करतो काम

Aarogya setu App वर रजिस्टर केल्यानंतर हा ऍप प्रत्येक यूजरचा सेल्फ रिस्क असेसमेंट करतो. इथे वय आणि लिंग सोबतच इतर काही प्रश्न विचारले जातात जसे कि खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे का, गेल्या 14 दिवसांत परदेश यात्रा केली आहे का, मधुमेह, रक्तदाब, हृदय संबंधित इतर कोणता जुना आजार आहे का इत्यादि सर्वकाही माहिती दिल्यावर हा ऍप सांगतो कि तुमहाला कोरोनाचा धोका आहे कि नाही. तसेच आरोग्य सेतु ऍप कोरोना पासून वाचण्याचे उपाय सांगतो.

The post आरोग्य सेतु ऍपचा फायदा काय, हे ऍप डाउनलोड करण्यावर पंतप्रधानांनी का दिला जोर, जाणून घ्या या ऍप बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-aarogya-setu-mobile-app-how-to-use-install-benifite-corona-virus-lockdown-india-covid-19/feed/ 0