Android 9.0 P - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 09 May 2018 13:29:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एंडरॉयड ‘पी’ चे 5 फीचर्स जे बनवतात याला खुप खास आणि एडवांस https://www.91mobiles.com/marathi/android-p-5-features-ai-advance-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/android-p-5-features-ai-advance-in-marathi/#respond Wed, 09 May 2018 13:29:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=376 हे फीचर्स फक्त दिसायला खुप आर्कषक नाहीत तर वापरण्यास पण तेवढेच सोप्पे आणि आधुनिक वाटतात.

The post एंडरॉयड ‘पी’ चे 5 फीचर्स जे बनवतात याला खुप खास आणि एडवांस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल ची वार्षिक आई/ओ 2018 कॉग्रेंस सुरू झाली आहे. गूगल ने या वार्षिक ईवेंट मध्ये अनेक मोठया घोषणा केल्या ज्यात जीमेल, गूगल एआई फीचर सह एंडरॉयड चा लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पी पण सादर करण्यात आला. गूगल ने एंडरॉयड पी चा बीटा वर्जन पण सादर केला आहे जो काही स्मार्टफोन डिवाईस वर उपलब्ध होईल. स्मार्टफोन यूजर्स च्या गरजा ओळखून आणि फोन चा वापर सोप्पा के एडवांस बनवण्यासाठी गूगल ने एंडरॉयड पी मध्ये आर्कषक फीचर्स दिले आहेत. हे फीचर्स फक्त दिसायला खुप आर्कषक नाहीत तर वापरण्यास पण तेवढेच सोप्पे आणि आधुनिक वाटतात.

एडवांस एआई
गूगल ने एंडरॉयड पी मध्ये एआई म्हणजे आ​र्टिफिशियल इंटेलिजेंस ची विशेष काळजी घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस मुळे एंडरॉयड पी आधारित स्मार्टफोन स्मार्टफोन यूजर्स कडून होणारा फोन चा वापर समजून घेऊन त्यांना त्यानुसार इंटरफेस देईल त्याचबरोबर ‘अॅप एक्शन’ द्वारे फोन मधील वापराच्या आधारावर पुढील स्टेप्स पण समजू शकेल.

अडॅप्टिव बॅटरी
एंडरॉयड पी मध्ये बॅटरी ची हे​ल्थ आणि लाईफ चांगली ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन एंडरॉयड मध्ये अडॅप्टिव बॅटरी फीचर देण्यात आला आहे जो मशीन लर्निंग वापरून स्मार्टफोन बॅटरी चा वापर मर्यादित करतो. त्यामुळे बॅटरी कडून फोनला जास्त बॅकअप मिळतो तसेच बॅटरी पण खुप चालते.

वेल ​बीइंग फीचर
गूगल ने स्मार्टफोन चा गरजेपेक्षा जास्त वापर करणार्‍या यूजर्स साठी पण एंडरॉयड पी ला खास बनवले आहे. एंडरॉयड पी मधील वेल ​बीइंग फीचर यूजर्स कडून कितीवेळा फोन अनलॉक केला गेला, कितीवेळ फोन वापरला गेला आणि कोणत्या अॅप वर जास्त वेळ घालवण्यात आला अशा गोष्टी ट्रॅक केल्या जातील. या ट्रॅकिंग नंतर स्मार्टफोन यूजर्सना सूचना दिली जाईल की स्मार्टफोन वरील त्यांची एक्टिविटी त्यांच्यासाठी चांगली नाही. या फीचर मध्ये विंड डाउन मोड पण असेल जो रात्री फोन ची स्क्रीन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मोड मध्ये नेईल.

एसयूएसएच (SUSH)
एंडरॉयड पी मधील हा फीचर फोन च्या डू नॉट डिस्टर्ब फीचर ला एक्टिवेट करतो. या फीचर मुळे फोन अशा मोड मध्ये जातो ज्यात कोणत्याही अॅप कडून येणार्‍या नोटिफिकेशन्स ​फोन च्या डिसप्ले वर दिसत नाहीत.

न्यू नेविगेशन
स्मार्टफोन वर केलेली कामे आणि वापरण्यात आलेले अॅप्स यामधील नेविगेशन ला एंडरॉयड पी मध्ये अजून सोप्पे आणि यूजर फ्रेंडली बनवण्यात आले आहे. नवीन एंडरॉयड वर्जन मध्ये नेविगेशन साठी स्पेशल बटन देण्यात आले आहे. यात होम बटन दाबल्यावर गेस्चर ओपन होताता ज्यामुळे काही वेळापूर्वी वापरलेल्या अॅप सह इतर अॅप्स मध्ये स्वीच करणे सोप्पे होते.

The post एंडरॉयड ‘पी’ चे 5 फीचर्स जे बनवतात याला खुप खास आणि एडवांस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-p-5-features-ai-advance-in-marathi/feed/ 0