Android OS 9.0 Pie - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Aug 2018 08:23:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 गूगल ने केला एंडरॉयड पी च्या नावाचा खुलासा, नवीन ओएस चे नाव असेल एंडरॉयड 9 पाई https://www.91mobiles.com/marathi/google-officially-releases-android-p-name-it-calls-android-9-pie-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/google-officially-releases-android-p-name-it-calls-android-9-pie-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 07:38:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1595 गूगल ने माहिती दिली आहे की सध्यातरी एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9.0 पाई पिक्सल डिवाइस मध्ये लॉन्च केली जाईल.

The post गूगल ने केला एंडरॉयड पी च्या नावाचा खुलासा, नवीन ओएस चे नाव असेल एंडरॉयड 9 पाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मार्च च्या सुरवातीला गूगल ने नवीन आॅपरेटिंग सिस्टम 9.0 पी बद्दल माहिती दिली होती. त्यानंतर कंपनी ने याचा अपडेट पण दिला आहे. आता पर्यंत एंडरॉयड च्या नवीन वर्जन च्या फीचर्स ची माहिती होती पण नाव माहित नव्हते. दरवेळी प्रमाणे यावेळी पण नवीन मिठाईच्या नावाची वाट बघितली जात होती. आज कंपनी ने नवीन नावाची घोषणा केली आहे. गूगल ची नवीन आॅपरेटिंग सिस्टम 9.0 एंडरॉयड पाई नावाने ओळखली जाईल.

आॅपरेटिंग सिस्टम च्या नावा सोबत कंपनी ने माहिती दिली आहे की आज पासून काही फोन साठी रोलआउट पण केला आहे आणि गूगल पिक्सल यूजर्स एंडरॉयड 9 पाई आता पासून आपल्या फोन मध्ये डाउनलोड करू शकतात. कंपनी चे म्हणणे आहे की नवीन आॅपरेटिंग सिस्टम मध्ये मसीन लर्निंग आधारित सुधारित एआई फीचर्स आहेत जे तुमच काम समजून ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकतात.

एंडरॉयड पाई गूगल च्या मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम चा नववा रिलीज आहे जो गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ओरियो नंतर आला आहे. या ओएस मध्ये तुम्हाला अनेक नवीन बदल मिळतील ज्यात अडॅप्टिव बॅटरी मुख्य आहे. जो स्वतः सेंस करेल की तुम्ही कोणते अॅप्स कमी वापरता आणि स्वतः च त्यांना बंद करेल ज्यामुळे चांगला बॅटरी बॅकअप मिळेल. त्याचप्रमाणे एडॅप्टिव ब्राइटनेस पण खास आहे. जी लोकेशन आणि प्रकाश सेंस करून स्क्रीन ब्राइटनेस स्वतःहून सेट करेल. त्यामुळे फोनचा बॅटरी बॅकअप चांगला होईल.

त्याचबरोबर गूगल पाई मध्ये टास्क क्विकर पण खास आहे जिथे सर्च च्या आधारावर तुम्हाला काही खास अॅप्स ची माहिती दिली जाईल ज्यांचा वापर तुम्ही करू शकाल. तसेच अॅप्स एक्शन पण खास आहे. मशीन लर्निंग आधारित हा फीचर तुमच्या गरजा लक्षात ठेऊन फोन च्या स्क्रीन वर अॅप दाखवतो.

तसेच कंपनी चे म्हणेन आहे की गूगल एंडरॉयड पाई मध्ये अजून काही अपडेट्स येतील ज्यात डिजिटल वेलबेइंग फीचर्स इत्यादी असतील. यात तुम्हाला न्यू डॅशबोर्ड मिळेल जो तुमचा अॅप यूसेज को ट्रॅक करेल आणि स्वतःहून रात्री नाइट लाइट व डू नॉट डिस्टर्ब सारखे फीचर्स आॅन करेल.

कोणत्या फोन्सना मिळेल अपडेट

गूगल ने माहिती दिली आहे की सध्यातरी एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9.0 पाई पिक्सल डिवाइस मध्ये लॉन्च केली जाईल. नंतर ही नेक्सस आणि इतर बीटा प्रोग्राम पार्टिसिपेंटना मिळेल. ज्यात सोनी मोबाइल, शाओमी, एचएमडी ग्लोबल, ओपो, वीवो, वनप्लस आणि ऐसेंशियल यांचा समावेश आहे.

The post गूगल ने केला एंडरॉयड पी च्या नावाचा खुलासा, नवीन ओएस चे नाव असेल एंडरॉयड 9 पाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-officially-releases-android-p-name-it-calls-android-9-pie-in-marathi/feed/ 0