Apple iPhone SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 25 Oct 2019 13:26:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/#respond Fri, 25 Oct 2019 13:26:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5603 Apple iPhone SE2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल.

The post Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple आपल्या नवीन आईफोन डिवाईस iPhone SE2 वर काम करत आहे, ज्या बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. Apple iPhone SE2 च्या नावासह याच्या किंमतीचा खुलासा पण केला गेला आहे. आज पुन्हा iPhone SE2 संबंधित मोठी बातमी समोर आली आहे ज्यात फोनच्या लॉन्च आणि सेल डेटच्या माहिती सोबतच iPhone SE2 च्या कलर वेरिएंट्सचा खुलासा झाला आहे.

Apple iPhone SE2 संबंधित माहिती प्रसिद्ध टिपस्टर आणि ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo ने दिली आहे. कुओ यांनी आज पुन्हा या फोन संबंधित महत्वाचा खुलासा केला आहे. इंटरनेट वर माहिती शेयर करत कुओ यांनी सांगितले कि iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत मास प्रोडक्शन साठी जाईल आणि कंपनी तीन महिन्यानंतर म्हणजे मार्च मध्ये हा फोन विक्री साठी बाजारात आणेल. iPhone SE2 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस डीप ग्रे, वाईट आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच कुओ यांच्या मते Apple iPhone SE2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल.

iPhone SE

अशी असेल किंमत

Apple iPhone SE2 बद्दल गेल्या आठवड्यात खुलासा झाला होता कि हा फोन $399 यूएस डॉलर वर लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे हि बातमी खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील. विशेष म्हणजे iPhone SE2 तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल. तसेच नवीन माहिती नुसार Apple iPhone SE2 मध्ये 3D Touch दिला जाईल तसेच हा आईफोन ग्रे, सिल्वर आणि रेड कलर मध्ये लॉन्च होईल.

The post Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/feed/ 0