Apple watch - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 04 May 2018 10:41:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अॅप्पल वॉच सीरीज 3 आज पासून करू शकता प्री आॅर्डर, फोन नसताना पण करू शकता कॉल https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-3-available-for-pre-order-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-3-available-for-pre-order-in-india-in-marathi/#respond Fri, 04 May 2018 08:13:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=293 ही टेक्निक यासाठी वेगळी आहे कारण कॉल रिस्पॉन्स साठी अॅप्पल वॉच चे अॅप्पल आयफोन शी कनेक्टड असणे गरजेचे नाही.

The post अॅप्पल वॉच सीरीज 3 आज पासून करू शकता प्री आॅर्डर, फोन नसताना पण करू शकता कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी देशातील दोन मोठया टेलीकॉम कंपन्या एयरटेल भारती आणि रिलायंस जियो ने घोषणा केली होती की ते अॅप्पल ची लेटेस्ट स्मार्ट वॉच सीरीज 3 देशात सेल साठी उपलब्ध करतील. टेलीकॉम कंपन्यां अॅप्पल वॉच विकत आहेत म्हणजे दोन्ही कंपन्या हा स्मार्टवॉच सेलुलर कनेक्टिविटी सह बाजारात घेऊन येतील. ज्यात कदाचित मोबाईल सिम पण वापरता येईल. अॅप्पल फॅन्स साठी एयरटेल व जियो या दोन्ही कंपन्यांनी आज अॅप्पल वॉच सीरीज 3 देशात प्री आॅर्डर साठी उपलब्ध केली आहे.

रिलायंस जियो आणि एयरटेल या दोन्ही कंपन्यानी आॅनलाईन प्लॅटफार्म च्या माध्यमातून अॅप्पल वॉच सीरीज 3 साठी प्रीआॅर्डर सुरू केली आहे. वेबसाइट वर अॅप्पल वॉच सीरीज 3 (जीपीएस + सेलुलर), अॅप्पल वॉच नाईक+ आणि अॅप्पल वॉच एडिशन प्री आॅर्डर साठी उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टवॉच ची किंमत पाहता हे 39,080 रुपये पासून 1,22,090 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले आहेत. आज म्हणजे 4 मे पासून प्री आॅर्डर साठी लिस्ट होऊन हे स्मार्टवॉच वेरिएंट 11 मे पासून सेल साठी उपलब्ध होतील.

एयरटेल आणि जियो कडून विकल्या जाणारी अॅप्पल वॉच सीरीज 3 यूजर्सना फोन नसताना कॉल करण्याची आणि रिसीव करण्याची सुविधा देईल. कंपनी कडून वापरत असलेल्या एयरटेल व जियो मोबाईल नंबर चे दोन सिम दिले जातील, त्यातील एक सिम मोबाईल फोन आणि दुसरा या स्मार्टवॉच मध्ये जाईल. सिम मुळे अॅप्पल आयफोन अॅप्पल वॉच शी सतत ब्लूटूथ ने कनेक्ट करने गरजेचे नाही. फोन मधील नंबर वरील एक्टिव डाटा प्लान या वॉच वर पण वापरता येईल.

ही टेक्निक यासाठी वेगळी आहे कारण कॉल रिस्पॉन्स साठी अॅप्पल वॉच चे अॅप्पल आयफोन शी कनेक्टड असणे गरजेचे नाही. जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन घरी विसरलात तर संपूर्ण देशातून कुठूनही तुम्ही अॅप्पल वॉच सीरीज 3 च्या माध्यमातून फोन अॅक्सेस करू शकता आणि आपल्या कान्टेक्ट नंबर्स वर कॉल तसेच एसएमएस करू शकता. या कॉल तसेच इंटरनेट साठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

The post अॅप्पल वॉच सीरीज 3 आज पासून करू शकता प्री आॅर्डर, फोन नसताना पण करू शकता कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-3-available-for-pre-order-in-india-in-marathi/feed/ 0