Application - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Feb 2019 14:58:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती https://www.91mobiles.com/marathi/top-5-dating-app-in-india-boy-girl-valentine-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-dating-app-in-india-boy-girl-valentine-day-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 14:58:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3589 जास्त दिवस राहिले नाहीत, लवकरच तयार व्हा

The post या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. वातावरणात अजूनही थंडावा आहे आणि ‘लव इज इन द एयर’ असे वाटू लागेल आहे. मला माहित आहे कि तुम्हाला कोणी ना कोणी आवडत असेलच आणि तुम्ही पण कोणालातरी आवडत असणार. पण जर तुमचे उत्तर नाही असेल तर आणि तुम्ही अजूनही सिंगल असाल तर कदाचित तुमची नजर आशा एखाद्या खास व्यक्तीशी भिडली नाही, ज्याला पाहून तुमच्या हृदयाची धडधड वाढेल. पण जर या व्हॅलेंटाईनच्या वेळी तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटत असेल आणि जर तुम्ही पार्टनरचा शोध घेत असाल तर, आज मी तुमची लवस्टोरी सुरु करणार आहे. आज मी घेऊन आलो आहे 5 असे डेटिंग ऍप्लिकेशन जे तुम्हाला तुमच्या मनासारखा सोबती शोधायला मदत करतील. चला तर मग लागा कामाला, कदाचित तुमची होणारी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुमची वाट बघत असेल.

टिंडर / Tinder

तरुणाईच्या मनात सर्वात आधी हाच विचार येतो कि समोरील व्यक्तीला आपण आवडत आहोत कि नाही आणि हीच भीती बऱ्याच अंशी दूर करतो हा ऍप. या ऍप मध्ये तुम्ही फेसबुक द्वारे साइन इन करू शकता. ज्यानंतर हा तुमची माहिती तसेच तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला पार्टनर निवडण्याची संधी देतो. हा वापरण्यास खूप सोप्पा आहे. समोर आलेल्या यादीतील कोणी आवडले तर तुम्ही उजविकडे स्वाईप करू शकता आणि न आवडल्यास डावीकडे आणि जर कोणी तुम्हाला लाईक बॅक केले तर समजून जा यावर्षीचा व्हॅलेंटाईन तुम्हाला एकट्याने साजरा करावा लागणार नाही.

ट्रूलीमॅड्ली / TrulyMadly

डेटिंग साठी ट्रूलीमॅड्ली सर्वात सुरक्षित आणि रियाबल ऍप पैकी एक आहे. हा फक्त तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधण्यास मदत करत नाही तर त्यांना जाणून घेण्याची संधी पण देतो. ऍप मधील स्पार्क फिचर तुम्हाला गर्दीतील वेगळी माणसे ओळखण्याची संधी देतो. ऍप मधील स्टीकर्स तुमच्या मेसेज मधून तुमच्या मनातले मनापर्यंत पोहचवतील. तसेच ऍप मधील क्वीज गेम्स् तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांना समजून घेण्यास मदत करतील.

हॅप्पन / Happn

‘राहों मे उनसे मुलाकात हो गई..’ हे फक्त गाणं राहणार नाही जर तुम्ही हॅप्पन वापरले तर. हॅप्पन ऍप फक्त एखाद्या फिक्स लोकेशन मधील लोकांशी भेट घडवत नाही तर जिथे जाल तिथल्या यूजर्सशी पण तुमची ओळख करून देतो. हॅप्पन प्रवासात तुमच्या आजूबाजूला असलेल्या हॅप्पन यूजर्सची माहिती देतो. याचा सर्वात जास्त फायदा तुम्ही जिथून जात आहेत तिथून कोण कोण गेले आहे हे जाणून घेण्यासाठी होतो.

वू / Woo

जर तुम्ही त्यांच्यापैकी असाल ज्यांनी अभ्यासाला जास्त महत्व दिले आहे आणि त्याचकारणामुळे तुम्हाला सिंगल राहावे लागेल असेल तर तुमची हीच सवय तुमची लव लाईफ बनवण्यास मदत करेल. वू असा डेटिंग ऍप जो वेल ऐजुकेटिड प्रोफेशनल लोकांना आपल्या आवडीचा पार्टनर निवडण्याची संधी देतो. कदाचित हाच ऍप तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शोधण्यास मदत करेल.

ओके क्यूपिड / OkCupid

जर तुम्हाला वाटत असेल कि तुमची प्रेम भावना इन्टेन्स आणि पॅशिनेट आहे आणि त्यामुळे तुम्ही आतापर्यंत सिंगल असाल तर अशी इच्छा ठेवणारे पण अनेक लोक आहेत. ओके क्यूपिड तुमची हीच इच्छा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. या ऍप मधील बॉडी टाईप, सेक्सुअल प्रेफरन्स सारखे ऑप्शन्स तुमच्या प्रोफाईल मध्ये लोकांची आवड वाढवतात.

जास्त दिवस राहिले नाहीत, लवकरच तयार व्हा. कदाचित तुमच्या भावी पार्टनरने आमचा हा लेख वाचून यातील एखादा ऍप डाउनलोड केला असेल आणि तुम्हाला शोधात पण असेल.

The post या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-dating-app-in-india-boy-girl-valentine-day-in-marathi/feed/ 0