Asus 9Z - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Aug 2022 11:44:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/#respond Mon, 22 Aug 2022 11:44:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12370 आसुसनं गेल्या महिन्यात Asus Zenfone 9 स्मार्टफोन काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला होता. हा कॉम्पेक्ट साइज स्मार्टफोन आता भारतात देखील एंट्री करू शकतो. आसुसचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ज्यात क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 Soc, गिम्बल माउंट प्रायमरी कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा समावेश आहे. आसुसचा फ्लॅगशिप Zenfone 9 स्मार्टफोन भारतात […]

The post चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आसुसनं गेल्या महिन्यात Asus Zenfone 9 स्मार्टफोन काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला होता. हा कॉम्पेक्ट साइज स्मार्टफोन आता भारतात देखील एंट्री करू शकतो. आसुसचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ज्यात क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 Soc, गिम्बल माउंट प्रायमरी कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा समावेश आहे. आसुसचा फ्लॅगशिप Zenfone 9 स्मार्टफोन भारतात या आठवड्यात नव्या नावानं लाँच होऊ शकतो. चला जाणून घेऊया आसुसच्या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स.

युट्युबर साहिल करौलनुसार, Asus Zenfone 9 स्मार्टफोन भारतात 23 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. आसुसचा हा फोन भारतात Asus 9z नावानं दाखल होईल. साहिलच्या या दाव्यावर विश्वास ठेवणं काठी आहे कारण आसुस इंडियानं अजूनतरी एकही टिजर शेयर केला नाही. या स्मार्टफोनची गुपचूप एंट्री होण्याची शक्यता देखील कमी आहे. परंतु भारतात एंट्री झाल्यावर या स्मार्टफोनची थेट टक्कर वनप्लस, सॅमसंग, शाओमी, विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी होईल.

Asus Zenfone 9 Price in India

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट युरोपियन बाजारात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 799 यूरो (सुमारे 64,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक, स्टारी ब्लू, सनसेट रेड आणि मूनलाईट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे. परंतु भारतात या फोनची किंमत थोडी कमी असू शकते. Asus 9z स्मार्टफोन भारतात 60,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

ASUS Zenfone 9 चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ 2400 x 1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. कंपनीनं फ्रंटला Gorilla Glass Victus ची सुरक्षा दिली आहे. आसुसचा हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

आसुसच्या लेटेस्ट Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 12 फोनमध्ये 3.5mm जॅक देखील आहे. फोनचे अन्य फिचर्स पाहता हा IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट, साईड माउंटेड टच सेन्सेटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पिकर, व्हेपर चेंबर, 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, WiFi 6/6E, Bluetooth 5.2, आणि NFC सपोर्ट देण्यात आला आहे.

Asus Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये मोठा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात 6-अ‍ॅक्सिस गिम्बल स्टॅबिलायजेशन सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ घेताना हात हलल्यास दृश्य हलत नाही. फोनचा प्रायमरी कॅमेरा Sony IMX766 आहे जो OIS सपोर्टसह येणारा 50MP सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

The post चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/feed/ 0