ASUS ROG Phone II - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Sep 2019 11:59:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/#respond Mon, 23 Sep 2019 11:59:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5386 8 जीबी रॅम वेरिएंट सह 18वॉट चार्जर बॉक्स मध्ये दिला आहे तर फोनच्या 12 जीबी रॅम वेरिएंट सह 30वॉटचा चार्जर बॉक्स मध्ये मिळेल.

The post 12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने आज भारतात आपला हाईएंड गेमिंग स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत नवीन डिवाईस ROG Phone II लॉन्च केला आहे. ROG म्हणजे Republic of Gamers. ASUS चा हा नवीन डिवाईस पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो तसेच हा फोन भारतातील पहिला स्मार्टफोन बनला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस वर लॉन्च झाला आहे. कंपनीने हा फोन खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केला आहे जो अनेक आर्कषक फीचर्स सह येतो.

किंमत आणि सेल

ASUS ROG Phone II भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी दमदार रॅम मेमरी सह 512 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने 8 जीबी रॅम असलेला वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच ROG Phone II चा 12 जीबी रॅम वाले वेरिएंट 59,999 रुपयांमध्ये बाजार मध्ये आला आहे. ASUS ROG Phone II चा 8 जीबी रॅम वेरिएंट येत्या 30 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. तर 12 जीबी रॅम वेरिएंट साठी तारीख घोषित झालेली नाही.

स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone II क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह येतात. स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि सर्वात जास्त पावरफुल फोन आहे. हा चिपसेट 4 कोरयो गोल्ड कोर आणि 4 कोरयो सिल्वर कोरने बनला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्क्यांपर्यंत जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. ASUS ROG Phone II डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबोरोबर 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-अँगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ROG Phone II मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोन बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल. ASUS आपल्या लेटेस्ट ROG Phone II च्या 8 जीबी रॅम वेरिएंट सह 18वॉट चार्जर बॉक्स मध्ये दिला आहे तर फोनच्या 12 जीबी रॅम वेरिएंट सह 30वॉटचा चार्जर बॉक्स मध्ये मिळेल.

The post 12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/feed/ 0