Asus Zenfone 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Jun 2023 05:09:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/#respond Fri, 30 Jun 2023 05:09:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21823 असूसनं ग्लोबल टेक मंचावर आपल्या झेनफोन सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन ASUS Zenfone 10 सादर केला आहे. हा स्मार्टफोन पाश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाला आहे जो लवकरच भारतीय बाजारात देखील येऊ शकतो. पुढे तुम्ही ह्या नवीन असूस फोनच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता. ASUS Zenfone 10 स्पेसिफिकेशन्स 5.9″ 144Hz AMOLED Display Qualcomm Snapdragon […]

The post ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 16GB RAM मेमरी देण्यात आली आहे.
  • फोन Snapdragon 8 Gen 2 वर चालतो.
  • हा 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो.

असूसनं ग्लोबल टेक मंचावर आपल्या झेनफोन सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन ASUS Zenfone 10 सादर केला आहे. हा स्मार्टफोन पाश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाला आहे जो लवकरच भारतीय बाजारात देखील येऊ शकतो. पुढे तुम्ही ह्या नवीन असूस फोनच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

ASUS Zenfone 10 स्पेसिफिकेशन्स

  • 5.9″ 144Hz AMOLED Display
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 16GB RAM + 512GB Storage
  • 32MP Front Camera
  • 50MP Rear Camera
  • 30W 5,000mAh Battery
  • 15W Wireless Charging

  • स्क्रीन : हा असूस फोन 5.9 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनला गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे जोडीला 1100निट्स ब्राइटनेस आणि एचडीआरचा सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसेर : असूस झेनफोन 10 अँड्रॉइड 13 आधारित असूस झेनयुआयवर लाँच करण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा ओआयएस सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ASUS Zenfone 10 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. तसेच हा मोबाइल 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
  • इतर फीचर्स : ह्यात 3.5mm जॅक, ड्युअल स्टीरियो स्पिकर, IP68, NavIC, NFC, Bluetooth v5.3 आणि OZO ऑडियो नॉइज रिडक्शन टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स आहेत.

ASUS Zenfone 10 ची किंमत

फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेजची किंमत EUR 799 (जवळपास 71,300 रुपये) आहे. 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेजची किंमत EUR 849 (जवळपास 75,750 रुपये) आहे तर सर्वात मोठ्या 16जीबी रॅम+512जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत EUR 929 (जवळपास 82,900 रुपये) आहे. फोन Midnight Black, Comet White, Eclipse Red, Aurora Green आणि Starry Blue कलरमध्ये सादर केला गेला आहे.

The post ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/feed/ 0