Asus Zenfone 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 Oct 2018 14:43:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 14:42:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2727 असूस झेनफोन 6 चे फ्रंट पॅनल वरील तिन्ही बाजू बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत.

The post असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी असूस आपल्या झेनफोन सीरीज साठी जगभर प्रसिद्ध आहे. यावर्षी कंपनी ने झेनफोन सीरीज वाढवत झेनफोन 5 आणि याचे काही वेरिएंट लॉन्च केले होते. झेनफोन 5 असूस ने नॉच डिस्प्ले सह सादर केला होता. ऍप्पल ने आईफोन 10 मध्ये जी डिजाईन दिली होती, वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे असूस ने पण आपल्या झेनफोन 5 सीरीजच्या फोन्स मध्ये तोच लुक आणि डिजाईन दिली होती. फ्रंट पॅनल वर नॉच आणि बॅक पॅनल वर वर्टिकल डुअल रियर कॅमेरा सोबत झेनफोन 5 लॉन्च झाला होता. ऍप्पलला कॉपी केल्यानंतर आता असूस आपली स्वतःची डिजाईन घेऊन येत आहे जी झेनफोन 6 मध्ये दिसेल आणि विश्वास ठेवा हि ​​डिजाईन खूप अनोखी असेल.

असूसच्या नव्या फोनचे फोटो लीक झाले आहेत जो झेनफोन 6 आहे असे बोलले जात आहे. फोटो मध्ये फोनचा फ्रंट तसेच बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. या कथित झेनफोन 6 च्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप वाली छोटीशी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. साधारणतः जी नॉच फोन डिस्प्ले वर मधोमध असते ती असूस झेनफोन 6 मध्ये उजव्या बाजूला आहे. नॉच चा आकार गोलाकार आहे आणि हि डिस्प्ले वर उजव्या कर्वच्या बाजूला आहे.

असूस झेनफोन 6 चे फ्रंट पॅनल वरील तिन्ही बाजू बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत. झेनफोन 6 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर उजव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्याच्या खाली एलईडी लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वरच फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेंसरच्या खाली असूसचा लोगो आहे. असूस जेनफोन चे चारही कोपरे कर्व्ड शेप मध्ये आहेत.

झेनफोन 6 च्या या फोटो मध्ये खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक दिसत आहे. फोनच्या वरच्या बाजूला स्पीकर ग्रिल आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर तसेच पावर बटन देण्यात आला आहे. असूस कडून अजूनतरी झेनफोन 6 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती आली नाही पण फोनचे फोटो लीक झाल्यामुळे अशा आहे कि कंपनी लवकरच अनोखी नॉच डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन बद्दल घोषणा करेल.

The post असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/feed/ 0