Asus Zenfone 5Z - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला असूस चा सर्वात ताकदवान फोन झेनफोन 5झेड, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 04 Jul 2018 11:19:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1160 बेसिक कनेक्टिविटी आॅप्शन्स व काही शानदार फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post लॉन्च झाला असूस चा सर्वात ताकदवान फोन झेनफोन 5झेड, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस च्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड ची भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये वाट बघितली जात होती. ही प्रतीक्षा संपवत असूस ने आज आपला फोन बाजारात आणला आहे. असूस ने झेनफोन 5झेड 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव आहे जो 9 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन 5झेड ला कंपनी ने 3 वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. पहिला वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. असूस झेनफोन 5झेड चा तिसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

असूस झेनफोन 5झेड चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या मोठया बेजल लेस फुलएचडी+ नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन 5झेड च्या बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच यात फोन फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी आॅप्शन्स व काही शानदार फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

असूस ने झेनफोन 5झेड चा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच फोन चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 32,999 रुपये आणि 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट 36,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post लॉन्च झाला असूस चा सर्वात ताकदवान फोन झेनफोन 5झेड, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
4 जुलै ला लॉन्च होईल 8जीबी रॅम वाला असूस झेनफोन 5झेड, फ्लिपकार्ट पर होगी एक्सक्लूसिव सेल https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launch-to-launch-on-4-july-in-india-as-flipkart-exclusively-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launch-to-launch-on-4-july-in-india-as-flipkart-exclusively-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 08:51:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1073 हा लॉन्च ईवेंट 4 जुलै ला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि फ्लिपकार्ट या ईवेंट चे लाइव अपडेट देईल.

The post 4 जुलै ला लॉन्च होईल 8जीबी रॅम वाला असूस झेनफोन 5झेड, फ्लिपकार्ट पर होगी एक्सक्लूसिव सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होत की कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे की कंपनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या सुरवातीच्या आठवड्यात हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल. तसेच आता शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने ही माहिती आॅफिशियल केली आहे की असूस झेनफोन 5झेड आगामी 4 जुलै ला भारतीय बाजारात येत आहे.

शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने प्रोडक्ट पेज बनवून असूस झेनफोन 5झेड च्या लॉन्च डेट चा खुलास केला आहे. फ्लिपकार्ट ने ya वेबपेज वर सांगितले आहे की येणार्‍या 4 जुलै ला असूस भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या इवेंट मधून कंपनी चा हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड भारतीय टेक बाजारात लॉन्च केला जाईल. हा लॉन्च ईवेंट 4 जुलै ला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि फ्लिपकार्ट या ईवेंट चे लाइव अपडेट देईल.

असूस झेनफोन 5झेड च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या मोठ्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालेल. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम तसेच 8जीबी रॅम सह बाजारात सादर केला आहे. असूस चा हा फोन 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या स्टोरेज आॅप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन 5झेड च्या बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच याची शक्यता पण जास्त आहे की बाजारात हा फोन फेस अनलॉक टेक्निक सह येईल. बेसिक कनेक्टिविटी आॅप्शन्स व काही शानदार फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

असूस झेनफोन 5झेड भारतात किती रॅम किंवा स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या फोन ची किंमत काय असेल यासाठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे. हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल हे स्पष्ट झाले आहे तसेच देशात या फोन चा पहिला सेल ​कधी होईल याची माहिती पण 4 जुलै ला फोन लॉन्च झाल्यावर मिळेल.

The post 4 जुलै ला लॉन्च होईल 8जीबी रॅम वाला असूस झेनफोन 5झेड, फ्लिपकार्ट पर होगी एक्सक्लूसिव सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-launch-to-launch-on-4-july-in-india-as-flipkart-exclusively-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या बेजल लेस स्क्रीन वाला असूस चा दमदार फोन झेनफोन 5झेड 15 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-will-launch-on-15-june-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-will-launch-on-15-june-in-marathi/#respond Wed, 13 Jun 2018 13:16:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=894 लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालेल

The post 8जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या बेजल लेस स्क्रीन वाला असूस चा दमदार फोन झेनफोन 5झेड 15 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या वर्षी आयोजित झालेल्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस च्या मंचावरून टेक कपंनी असूस ने आपल्या झेनफोन सीरीज मध्ये तिन नवीन डिवाईस सादर केले होते. या स्मार्टफोंस मध्ये झेनफोन 5, झेनफोन 5झेड आणि झेनफोन 5 लाइट सामील होते. दोन स्मार्टफोन मध्ये नॉच डिस्प्ले होता तर एक स्मार्टफोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला होता. तिन्ही
स्मार्टफोंस मध्ये सर्वात ताकदवान मॉडेल झेनफोन 5 एप्रिल महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल साठी उपलब्ध झाला होता, तर आता लवकरच झेनफोन 5झेड पण बाजारात एंट्री करणार आहे.

असूस ने अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी दोन दिवसांनंतर म्हणजे 15 जूनला आपला हाईएंड डिवाईस झेनफोन 5झेड सेल साठी सादर केला जाईल. असूस ने जापानी आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून झेनफोन 5झेड च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. असूस ने झेनफोन 5झेड जापानी वेबसाइट वर प्रीआॅर्डर साठी लिस्ट केला आहे. जापान मध्ये हा स्मार्टफोन 479 यूरो च्या सुरवाती किंमतीत सेल साठी उपलब्ध होईल. भारतीय करंसी नुसार ही किंमत 38,000 रुपयांच्या आसपास आहे.

असूस झेनफोन 5झेड च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या मोठ्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालेल. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम तसेच 8जीबी रॅम सह बाजारात सादर केला आहे. असूस चा हा फोन 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या स्टोरेज आॅप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन 5झेड च्या बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच याची शक्यता पण जास्त आहे की बाजारात हा फोन फेस अनलॉक टेक्निक सह येईल. बेसिक कनेक्टिविटी आॅप्शन्स व काही शानदार फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8जीबी रॅम आणि 6.2-इंचाच्या बेजल लेस स्क्रीन वाला असूस चा दमदार फोन झेनफोन 5झेड 15 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-will-launch-on-15-june-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वाला असूस चा हा दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च, तोडू शकेल का फ्लॅगशिप चे सर्व रेकॉर्ड ? https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-listed-on-geekbench-with-8gb-ram-256gb-storage-specifications-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-listed-on-geekbench-with-8gb-ram-256gb-storage-specifications-features-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 13:53:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=403 असूस झेनफोन 5झेड गीकबेंच वर असूस झेड01आरडी कोडनेम सह लिस्ट करण्यात आला आहे.

The post 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वाला असूस चा हा दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च, तोडू शकेल का फ्लॅगशिप चे सर्व रेकॉर्ड ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी असूस ने फेब्रुवारी मध्ये मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या मंचावरून अंर्तराष्ट्रीय टेक जगासमोर आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन झेनफोन 5झेड सादर केला होता. 8जीबी रॅम आणि सर्वात दमदार चिपसेट असलेला हा स्मार्टफोन कंपनी ने अजून पर्यंत बाजारात आणला नाही पण आता असे वाटते आहे की असूस लवकरच याला लॉन्च करू शकते. असूस झेनफोन 5झेड चीनी बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे आणि आता आशा आहे की कंपनी लवकरच हा फोन बाजारात घेऊन येईल.

असूस झेनफोन 5झेड गीकबेंच वर असूस झेड01आरडी कोडनेम सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत त्याचबरोबर स्पष्ट झाले आहे की असूस आता हा फोन बाजारात आणायला जास्त वेळ नाही लावणार. असूस झेनफोन 5झेड गीकबेंच वर 8 मे पर्यंत सिंगल-कोर मध्ये 2,471 स्कोर तसेच मल्टी-कोर मध्ये 9,209 स्कोर देण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झेनफोन 5झेड स्मार्टफोन ला एनटूटू अॅप वरून 2,74,499 स्कोर मिळाला आहे.

असूस झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर कपंनी ने हा फोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.2-इंचाच्या फुलएचडी डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे जो बेजल लेस आहे. हा फोन झेनयूआई आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. असूस चा या फोन मध्ये अॅप्पल आयफोन 10 च्या एनिमोजी प्रमाणे झेनीमोजी एआई स्टीकर आहेत.

गीकबेंच वर हा फोन 8जीबी च्या पावरफुल रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 256जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 1.4माइक्रोन सोनी आईएमएक्स363 कॅमेरा सेंसर वाला 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चर ला सपोर्ट करतो. फोन मध्ये एआई चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी मधील एआई टेक्निक मुळे तुम्ही रात्रभर चार्जिंग वर लाऊन झोपू शकता. बॅटरी टेक्निक या फोनला 80 टक्के चार्ज करून आपोआप थांबवेल ज्यामुळे फोन ची बॅटरी रात्रभर विनाकारण चार्ज होणार नाही.

असूस झेनफोन 5झेड मध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी सारखे बेसिक कनेक्टिविफी फीचर्स देण्यात आले आहेत तसेच यातील एनएक्सपी स्मार्ट एम्प्लीफायर उत्तम आॅडियो क्वॉलिटी देतात. पण असूस ​कधी हा फोन बाजारात सादर करेल, याची किंमत काय असेल आणि झेनफोन 5झेड भारतात सेल साठी उपलब्ध होईल की नाही यासाठी असूस ची अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वाला असूस चा हा दमदार स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च, तोडू शकेल का फ्लॅगशिप चे सर्व रेकॉर्ड ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-5z-listed-on-geekbench-with-8gb-ram-256gb-storage-specifications-features-in-marathi/feed/ 0