Asus Zenfone Ares - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 18 Jun 2018 08:31:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम सह लॉन्च झाला असूस चा नवीन दमदार झेनफोन https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-ares-launched-with-8gb-ram-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-ares-launched-with-8gb-ram-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 18 Jun 2018 08:31:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=940 फोन च्या फ्रंट पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो याच्या होम बटन मध्ये इम्बेड आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला असूस चा नवीन दमदार झेनफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तैवान च्या टेक कंपनी असूस ने अंर्तराष्ट्रीय बाजारात अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. असूस ने झेनफोन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनी ने मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन झेनफोन एआर चा नेक्स्ट वर्जन झेनफोन एरीस नावाने टेक बाजारात सादर केला आहे. असूस ने हा फोन सध्या आपल्या होम मार्केट मध्ये सादर केला आहे जो आगामी दिवसांमध्ये इतर बाजारांमध्ये येऊ शकतो.

असूस झेनफोन एरीस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2560 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या क्यूएचडी 2के सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला 4 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड नुगट आधारित आहे जो क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 8जीबी च्या दमदार रॅम मेमरी वर सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता असूस झेनफोन एरीस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 23-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स318 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. यात डेप्थ सेंसिंग तकनीक सोबत मोशन ट्रॅकिंग फीचर पण आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो. असूस च्या या फोन मध्ये हाई रेज्ल्यूशन आॅडियो साठी डीटीएस एचडी सपोर्ट देण्यात आला आहे.

असूस झेनफोन एरीस मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन च्या फ्रंट पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो याच्या होम बटन मध्ये इम्बेड आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात 3.0 क्विक चार्ज टेक्निक वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता असूस चा हा स्मार्टफोन 9,999 तैवानी डॉलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 22,700 रुपये आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला असूस चा नवीन दमदार झेनफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-ares-launched-with-8gb-ram-feature-specifications-in-marathi/feed/ 0