Asus Zenfone Lite (L1) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3544 या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बिल्ड क्वॉलिटी म्हणजे असूसचे स्मार्टफोन्स. लो बजट ते हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन रेंज मध्ये असूसचे फोन लोकप्रिय आहेत. आपल्या फॅन्सना कमी किंमतीती स्मार्टफोन देत असूस ने ‘ओएमजी डेज’ ची सुरवात केली आहे. याकाळात असूसच्या 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन वेरिएंट्स मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

असूसचा ओएमजी डेज सेल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 4 दिवस चालेल. हा सेल उद्या म्हणजे 6 फेब्रुवारीला सुरु होऊन 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल. याचा काळात असूस स्मार्टफोन्स वर फक्त प्राइज डिस्काउंट दिला जात नसून फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण सेल साठी उपलब्ध होतील.

असूसच्या दमदार स्मार्टफोन झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर या फोनची किंमत कंपनी ने थेट 8,000 रुपयांनी कमी केली आहे. 29,999 रुपयांचा झेनफोन 5झेड चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 6जीबी/128जीबी वेरिएंटची किंमत 32,999 रुपयांवरून 24,999 रुपये आणि 8जीबी/256जीबी वेरिएंटची किंमत 36,999 रुपयांवरून 28,999 रुपये झाली आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर कंपनी 1,500 रुपयांची सूट देत आहे. ओएमजी डेज मध्ये फोनचा 9,999 रुपयांचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,499 रुपये तसेच 13,999 रुपयांचा 6जीबी/64जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, झेनफोन मॅक्स एम2 तसेच झेनफोन लाईट एल1 च्या सर्व वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकले जात आहेत. याच सेल मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

तसेच झेनफोन मॅक्स एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. झेनफोन लाइट एल1 सेल मध्ये 4,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध होईल.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/feed/ 0
असूस झेनफोन मॅक्स (एम1) आणि झेनफोन मॅक्स (एल1) लॉन्च, यात आहे मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m1-and-zenfone-lite-l1-launched-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m1-and-zenfone-lite-l1-launched-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 17 Oct 2018 12:11:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2552 असूस ने झेनफोन मॅक्स (एम1) 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर झेनफोन मॅक्स (एल1) 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post असूस झेनफोन मॅक्स (एम1) आणि झेनफोन मॅक्स (एल1) लॉन्च, यात आहे मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने कालच भारतात दोन नवीन स्मार्टफोनच्या9 आणि ए5 लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत मोठी बॅटरी आणि शानदार कॅमेरा सेटअप देतात. तर आज इंडियन मार्केट मध्ये असूस ने पण एक साथ दोन नवीन डिवाईस लॉन्च केले आहेत. असूस ने झेनफोन लाइट (एल1) आणि झेनफोन मॅक्स (एम1) बाजारात आणले आहेत जे बजेट मध्ये फिट आणि स्पेसिफिकेशन्स व फीचर्सच्या बाबतीत हिट आहेत.

असूस झेनफोन मॅक्स (एम1)
इंडिया मध्ये लॉच झालेला असूसचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित झेनयूआई 5.0 वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम मेमरी सह आणला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता झेनफोन लाइट (एम1) च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोटोग्राफी चांगली व्हावी म्हणून कंपनी ने दोन्ही पॅनल्स वर एलईडी फ्लॅश दिला आहे.

असूस झेनफोन मॅक्स (एम1) रियल डुअल सिम फोन आहे ज्यात 2 सिम कार्ड सोबत 1 मेमरी कार्ड पण वापरता येईल. 4जी वोएलटीई सोबतच हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्क्नॉलिजीला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी झेनफोन मॅक्स (एम1) मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देनाय्त आली आहे.

असूस झेनफोन लाइट (एल1)
असूस ने हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले देनाय्त आला आहे जो 2डी ग्लास ने कोटेड आहे. हा फोन पण एंडरॉयड ओरियो आधारित झेनयूआई 5.0 वर सादर करण्यात आला आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता झेनफोन लाइट (एल1) च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो.

असूस झेनफोन लाइट (एल1) डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता असूस ने झेनफोन मॅक्स (एम1) 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर झेनफोन मॅक्स (एल1) 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post असूस झेनफोन मॅक्स (एम1) आणि झेनफोन मॅक्स (एल1) लॉन्च, यात आहे मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m1-and-zenfone-lite-l1-launched-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0