ASUS Zenfone Max Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Apr 2018 12:16:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/#respond Mon, 23 Apr 2018 12:16:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=59 कंपनी ने या फोन ची सुरवाती किंमत 10,999 रुपये ठेवली आहे

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे कधीतरीच होते जेव्हा एखादी शॉपिंग साइट एखाद्या टेक कंपनी च्या आधीच त्यांच्या येणार्‍या फोन ची माहिती देते. मागच्या आठवड्यात प्रसिद्ध आॅनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने घोषणा केली होती की असूस भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन साठी असूस आणि फ्लिपकार्ट मध्ये भागीदारी झाली आहे. त्याचप्रमाणे आज असूस चा दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनी ने या फोन ची सुरवाती किंमत 10,999 रुपये ठेवली आहे आणि हा फ्लिपकार्ट वर 3 मे पासून सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन आॅल मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे जी ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करते. फोन मध्ये 6-इंचाचा मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीन डॅमेज पासून वाचवण्यासाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

असूस चा हा नवीन फोन स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. असूस ने आपला हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवीता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम1 स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. या फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चे 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 डुअल सिम आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट्स फ्लिपकार्ट वरून ग्रे आणि मीडनाईट ब्लॅक रंगात विकत घेतले जाऊ शकतात.

त्याचबरोबर टेलीकॉम कंपनी वोडाफोन असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या खरेदीवर 3,200 रुपयांचे फायदे देत आहे. कंपनी च्या प्रीपेड व पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना 12 महीने म्हणजे 1 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 10जीबी 4जी डेटा एक्स्ट्रा दिला जाईल जो पूर्णपणे मोफत असेल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/feed/ 0