Best Camera Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Jan 2020 18:01:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix घेऊन येत आहे भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/exclusive-infinix-mobiles-launching-new-pop-up-selfie-camera-smartphone-under-rs-10000-budget-in-india-february-2020/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-infinix-mobiles-launching-new-pop-up-selfie-camera-smartphone-under-rs-10000-budget-in-india-february-2020/#respond Fri, 03 Jan 2020 18:01:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6192 सूत्रांकडून अशी बातमी पण मिळाली आहे कि Infinix नंतर Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल

The post Infinix घेऊन येत आहे भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix बद्दल गेल्याच आठवड्यात हि बातमी समोर आली होती कि हा टेक ब्रँड भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट् मध्ये खुलासा झाला होता कि नवीन सीरीज सोबतच इनफिनिक्स भारतात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणेल. तसेच आता या बातमीला दुजोरा देत 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून माहिती मिळवली आहे कि Infinix चा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. यावरून स्पष्ट झाले आहे कि Infinix चा हा आगामी मोबाईल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सकडून माहिती मिळाली आहे कि Infinix पुढल्या महिन्यात आपला नवीन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल आणि या डिवाईसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. हा स्मार्टफोन इनफिनिक्सचा नाही तर संपूर्ण भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. सूत्रांकडून अशी बातमी पण मिळाली आहे कि Infinix नंतर Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड चीनी कंपनी Transsion Holdings Limited चे आहेत.

Infinix आपला हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येईल हि माहिती समोर आली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट सह येईल. रिपोर्टनुसार या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या मोबाईल सह Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करेल. Infinix च्या या नवीन सीरीज आणि याअंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील.

Infinix S5 Lite

Infinix S5 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Infinix S5 Lite एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 Lite 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Infinix S5 Lite डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Infinix S5 Lite 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे. Infinix S5 Lite ब्लॅक, श्यान आणि वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Infinix घेऊन येत आहे भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-infinix-mobiles-launching-new-pop-up-selfie-camera-smartphone-under-rs-10000-budget-in-india-february-2020/feed/ 0
जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/ https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/#respond Tue, 25 Jun 2019 09:53:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4658 या फोन मधून 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर केली जाऊ शकते.

The post जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme कंपनीने काल स्मार्टफोनच्या दुनियेला नवीन सुरवात दिली आहे. कंपनीच्या सीईओनी एक ट्वीट करून जगातील पहिल्या 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन समोर ठेवला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने 64-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेलेला फोटो इंटरनेट वर शेयर केला होता. या ट्वीट सोबत कंपनीने दावा केला होता कि Realme टेक विश्वात सर्वात आधी 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आणेल. आता 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या वाले फोन मधून घेतलेल्या फोटो नंतर कंपनीने या फोनची पहिली झलक पण सादर केली आहे.

Realme ने 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन समोर ठेवला आहे आणि या फोनची पहिली झलक इंटरनेट वर शेयर करण्यात आली आहे. कंपनीने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर आपल्या अधिकृत पेज द्वारे या आगामी डिवाईसचा फोटो ऑफिशियल केला आहे. Realme ने आपल्या पेज वर फोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला आहे ज्यातून फोनच्या रियर कॅमेरा सेटअपची माहिती समोर आली आहे. पोस्ट मध्ये Realme ने सांगितले आहे कि या फोन मधून 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर केली जाऊ शकते.

64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये एका आयताकृती रिंग मध्ये आहे आणि या रिंग मध्ये हे चारही कॅमेरा सेंसर रक्त रेषेत आहे. सर्वात वरच्या कॅमेरा सेंसरला गोल्ड कलरच्या रिंग मध्ये ठेवण्यात आले आहे. या पहिल्या कॅमेरा सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. Realme फोनच्या या कॅमेरा सेटअपच्या उजविकडे फ्लॅश लाईट आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा सेटअप AI फीचर्स ने सुसज्ज आहे.

Realme CEO माधव सेठ द्वारा काल शेयर केल्या गेलेल्या फोटो बद्दल बोलायचे तर 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेलेला हा फोटो एक लँडस्केप फोटो आहे ज्यात 64MP AI Quad Camera कॅमेरा सोबतच Shot on realme लिहिण्यात आले आहे. 64-मेगापिक्सल वाला फोटो शेयर करण्यासोबतच माधव यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे कि कंपनी जगातील पहिल्या 64-मेगापिक्सल कॅमेरावाल्या फोन वर काम करत आहे. हा स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करेल. आपल्या ट्वीट मध्ये रियलमी सीईओ ने 64-एमपी क्वॉलिटी वाला फोटो शेयर करण्यासोबत ‘Dare to Leap’ टॅगलाईनची सुरवात केली आहे.

64-एमपी कॅमेरा असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.

The post जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-64mp-ai-quad-camera-real-photo-dare-to-leap-isocell-bright-gw1/feed/ 0
Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/ https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/#respond Mon, 24 Jun 2019 11:09:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4642 आता रियलमीने बाजी मारल्यानंतर Xiaomi किंवा Samsung काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सच्या जगात अजून एक नवीन बदल येणार आहे. लवकरच एका फोन मधून 64-मेगापिक्सलचा फोटो क्लिक करता येईल. गेल्या काही आठवड्यांपासून Samsung आणि Xiaomi सारख्या मोठ्या कंपन्यांबद्दल बातमी समोर आली होती कि या दोन्ही कंपन्या असा स्मार्टफोन बनवत आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या बातम्या अजूनतरी लीक्स मध्ये समोर येत होत्या. पण आता Samsung आणि Xiaomi च्या आधी टेक कंपनी Realme ने लीक्सच्या पुढे जात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन सादर पण केला आहे.

Realme CEO माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ट्वीट करत कंपनीच्या 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन समोर आणला आहे. माधव सेठ यांनी आपल्या ट्वीट मध्ये एक फोटो शेयर केला आहे जो 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेला आहे. हा एक लँडस्केप फोटो आहे ज्यात 64MP AI Quad Camera कॅमेऱ्यासह Shot on realme लिहिले आहे. हा फोटो शेयर कारण्यासोबतच माधव सेठ यांनी घोषणा केली आहे कि कंपनी नवीन प्रीमियम किलर फोन वर काम करत आहे.

64-मेगापिक्सल वाला फोटो शेयर करण्यासोबतच माधव यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे कि कंपनी जगातील पहिल्या 64-मेगापिक्सल कॅमेरावाल्या फोन वर काम करत आहे. हा स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करेल. आपल्या ट्वीट मध्ये रियलमी सीईओ ने 64-एमपी क्वॉलिटी वाला फोटो शेयर करण्यासोबत ‘Dare to Leap’ टॅगलाईनची सुरवात केली आहे.

विशेष म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी दाखवली होती. या टेक्नॉलॉजी सह कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आता पर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा खूप जास्त आहे.

64-एमपी कॅमेरा असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

असे असतील खास फीचर्स

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.

माधव सेठ द्वारा हा फोटो शेयर केला गेल्या नंतर एकीकडे स्पष्ट झाले आहे कि Realme कंपनी 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनची निर्मिती करत आहे तर दुसरीकडे असे पण म्हणता येईल कि हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण येईल. आता रियलमीने बाजी मारल्यानंतर Xiaomi किंवा Samsung काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post Realme ने घडवला इतिहास ! सादर केला 64-मेगापिक्सल वाला फोटो, Xiaomi – Samsung राहिले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-ceo-madhav-5g-tweet-64mp-camera-photo-dare-to-leap/feed/ 0
हे आहेत भारतातील ट्रिपल रियर कॅमेरा असलेले 12 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत 6,999 रुपयांपासून 19,990 रुपयांपर्यंत https://www.91mobiles.com/marathi/12-smartphone-in-india-with-triple-rear-camera-under-rs-2000-budget-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/12-smartphone-in-india-with-triple-rear-camera-under-rs-2000-budget-in-marathi/#respond Sat, 22 Jun 2019 10:40:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4632 भारतात ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची किंमत सध्या फक्त 6,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

The post हे आहेत भारतातील ट्रिपल रियर कॅमेरा असलेले 12 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत 6,999 रुपयांपासून 19,990 रुपयांपर्यंत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एक काळ होता जेव्हा स्मार्टफोन्स मध्ये वीजीए कॅमेरा मिळत होता आणि या कॅमेऱ्याने फोटोज आवडीने घेतले जायचे. वेळेसोबत टेकनॉलॉजी पण बदलली आणि आज 5 रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स पण बाजारात आले आहेत. साल 2019 मध्ये नवनवीन इनोवेशन झाले आहेत आणि यातील एक म्हणजे ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन स्वस्त बजेट मध्ये पण आले आहेत. एकेकाळी हाईएंड फ्लॅगशिप म्हणून ओळख असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप स्वस्त स्मार्टफोन्स मध्ये पण मिळू लागला आहे. जर तुम्ही पण एखादा स्वस्त व कमी बजेट वाले असा स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल जो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर पुढे आम्ही वर्ष 2019 च्या 6 महिन्यात लॉन्च झालेल्या 12 स्मार्टफोन्सची लिस्ट बनवली आहे जे 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये भारतात विक्री साठी उपलब्ध आहेत. हैराणीची बाब म्हणजे भारतात ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची किंमत सध्या फक्त 6,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

12.
Samsung Galaxy M40

गॅलेक्सी एम40 भारतात लॉन्च झालेला सॅमसंगचा सर्वात नवीन स्मार्टफोन आहे जो 19,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेप्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 को 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन 6जीबी की रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट सोबत पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

11. Huawei P30 Lite
हुआवई पी30 लाइट कंपनी द्वारा 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा प्राइमरी, 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei P30 Lite 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.15-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9.0 पाई आधारित ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आलेला हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेकनॉलॉजी वर बनलेल्या किरीन 710 चिपसेट वर चालतो. सिक्योरिटी रियर फिंगरप्रिंट सेंसर व फेस अनलॉक फीचर सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चर्जिंग टेकनॉलॉजी असलेली 3,340एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचे दोन्ही रॅम वेरिएंट 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. विशेष म्हणजे फोनच्या 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 19,990 रुपये आणि 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत 22,990 रुपये आहे.

10.
Vivo V15

वीवो वी15 कंपनी द्वारा 23,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राइस कट नंतर या फोनची किंमत 19,990 रुपये झाली आहे. हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल वाइड-एंगल शूटर आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी Vivo V15 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.53-इंचाच्या एलसीडी स्क्रीन वर लॉन्च झाला आहे जो एंडरॉयड पाई सह मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो. हा फोन 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

9.
Samsung Galaxy A50

सॅमसंग गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन पण भारतात 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजच्या दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यांची किंमत क्रमश: 18,490 रुपये आणि 21,490 रुपये आहे. हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो तसेच फोनच्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो. तसेच बिक्सबे शार्टकट बटणबटन, डुअल सिम आणि 4जी एलटीई सारख्या फीचर्स सह पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

8.
Samsung Galaxy M30

गॅलेक्सी एम सीरीजचा हा फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तथा एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा ही डेप्थ सेंसर फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Galaxy M30 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Samsung Galaxy M30 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,990 रुपये आहे.

7.
Vivo Y17

वीवो वाई17 कंपनी द्वारा 17,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो प्राइस कट नंतर आता 15,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हा फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह वर्टिकल शेप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी, 8-मेगापिक्सलचा सुपर वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. Vivo Y17 कंपनी द्वारा 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. डुअल सिम, 4जी एलटीई आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सह या फोन मध्ये फास्ट चार्जिंग टेकनॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

6.
Honor 20i

Honor 20i या स्मार्टफोन सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे जो 14,999 रुपयांमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देतो. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी हा फोन 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन पाहता Honor 20i मध्ये 6.21-इंचाचा फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता जो एंडरॉयड पाई सह किरिन 710 प्रोसेसर वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते.

5.
Vivo Y15

वीवो ने आपल्या वाई सीरीज मध्ये Y15 फक्त 13,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच Vivo Y15 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 2-मेगापिक्सलच्या तिसऱ्या रियर कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी वीवो वाई15 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y15 19.3:9 आस्पेक्ट रेशियो 6.35-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9.0 आधारित फनटच ओएस 9 सोबत हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo चा हा फोन 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज ने सुस्सज आहे. डुअल सिम तसेच 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत यात रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

4.
Vivo Y12

वीवो वाई12 ट्रिपल कॅमेरा सह भारतात लॉन्च झालेला कंपनीचा सर्वात लेटेस्ट फोन आहे ज्याची किंमत फक्त 12,490 रुपये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y12 चे स्पेसिफिकेशन्स पाहता कपंनीने हा फोन 4जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड पाई सह 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत फोन मध्ये रिवर्स चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

3.
Tecno Camon i4

टेक्नो कॅमोन आई4 देशातील सर्वात स्वस्त ट्रिपल कॅमेरा वाल्या फोन्स पैकी एक आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी कॅमोन आई4 एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.21-इंचाच्या एचडी+ स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे.

टेक्नो कॅमोन आई4 चा 2जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट तसेच 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतात तसेच 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 9,599 रुपये, 10,599 रुपये आणि 11,999 रुपये आहे. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर व फेस अनलॉक फीचर सह रॉकेट चार्जिंग फीचर वाल्या 3,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

2.
Infinix S4

इनफिनिक्स ने Infinix S4 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च करून ट्रिपल रियर कॅमेरा स्वस्त बजेट मध्ये सादर केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल वाइड एंगल सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix S4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.21-इंचाचा एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई सह मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर वर सादर केला गेला आहे. हँडसेट मध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर माइक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच 4जी एलटीई व डुअल-सिम सह फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

1.
Infinix Smart 3 Plus

Infinix Smart 3 Plus भारतातील सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये नंबर वन पॉजिशन वर येतो. या फोनची किंमत फक्त 6,999 ठेवण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर कंपनीने लो लाईट सेंसरच्या स्वरूपात दिला आहे. तसेच सेल्फी साठी Smart 3 Plus एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.21-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9.0 पाई आधारित एक्सओएस 5 वर सादर करण्यात आलेला हा फोन 2.0 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. Infinix Smart 3 Plus 2जीबी रॅम मेमरी वर सादर केला गेला आहे जो 32जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर सोबत पावर बॅकअप साठी Infinix Smart 3 Plus मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post हे आहेत भारतातील ट्रिपल रियर कॅमेरा असलेले 12 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत 6,999 रुपयांपासून 19,990 रुपयांपर्यंत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12-smartphone-in-india-with-triple-rear-camera-under-rs-2000-budget-in-marathi/feed/ 0