BharatNet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 May 2018 05:28:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/#respond Mon, 21 May 2018 13:42:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=549 भारतनेट नावाने या मोहिमेची सुरुवात साल 2011 मध्ये झाली होती.

The post डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक घरात इंटरनेट सुविधा पोचवण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी खुप काळापासून भारत सरकार कार्यरत आहे. भारताच्या विकास आराखड्यातील हे एक स्वप्न लवकरच सत्यात येणार आहे. डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम (DoT) ने भारत सरकार च्या मिशन ‘भारतनेट’ बद्दल मोठी घोषणा केली आहे. टेलीकॉम विभाग ने सांगितले आहे की साल 2018 च्या डिसेंबर महिन्या पर्यंत देशातील 2,50,000 ग्रामपंचायती पूर्णपणे इंटनेट ब्राॅडबँड शी जोडल्या जातील.

भारत सरकार द्वारा सुरू असलेल्या भारतनेट प्रोग्राम ची डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम ने ठरलेली डेडलाईन बदलली आहे. 2,50,000 ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शन देण्यासाठी भारत सरकार ने आधी मार्च 2019 ही वेळ मर्यादा ठरवली होती पण हा अवधी आता कमी करून डिसेंबर 2018 करण्यात आला आहे. म्हणजे देशातील लाखो गावे वर्षाच्या शेवटापर्यंत इंटरनेट शी जोडली जातील. या प्रोग्राम अंतर्गत सरकार चे लक्ष्य आहे की साल 2022 पर्यंत संपूर्ण देश इंटरनेट ने जोडलेला असेल आणि प्रत्येकाला कमीत कमी 50 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

विशेष म्हणजे भारतनेट प्रोग्राम अंतर्गत भारत सरकार गावांमध्ये आॅप्टीकल फाइबर टाकण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून आता पर्यंत 1 लाखा पेक्षा जास्त गावांमध्ये ब्रॉडबँड लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिपोर्ट नुसार उरलेल्या जागा लवकरात लवकर कवर करण्यासाठी सरकार ने 31,000 कोटी रुपयांचा फंड संबंधित विभागांना दिला आहे ज्यामुळे 6—7 महिन्यांत 1.5 लाख गावांमध्ये ब्रॉडबँड लाईन चे काम लवकरच पूर्ण होईल.

देशाला गावे ब्राडबँड शी जोडण्याचा हा प्रोग्राम काही नवीन नाही. भारतनेट नावाने या मोहिमेची सुरुवात साल 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची अंतिम तारीख डिसेंबर, 2013 ठरवण्यात आली होती पण काम पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यामुळे ही डेडलाईन वाढवून सप्टेंबर 2015 करण्यात आली. यादरम्यान देशातील सरकार बदलले आणि प्रोजेक्ट पण नव्याने सुरू करण्यात आला.

आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची तारीख डिसेंबर 2016 ठेवण्यात आली होती पण काम पूर्ण न झाल्यामुळे ती मार्च 2019 करण्यात आली. असे पहिल्यांदाच झाले आहे की या प्रोजेक्ट डेडलाईन बदलण्यात आली आहे पण पुढे ढकलण्या ऐवजी ती कमी करण्यात आली आहे. कामची वेग आणि प्रगती पाहून डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम ने भारतनेट ची डेडलाईन मार्च 2019 वरून डिसेंबर 2018 केली आहे.

भारतनेट प्रोजेक्ट बद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा

The post डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/feed/ 0