Black Shark 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Aug 2020 10:41:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/#respond Mon, 03 Aug 2020 10:41:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7731 ब्लॅकशार्क 3 च्या यशानंतर आता कंपनीने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन फोन Black Shark 3S सादर केला आहे.

The post 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंग स्मार्टफोन्ससाठी ओळखला जाणाऱ्या Black Shark ब्रँडने मार्च मध्ये एक साथ दोन पावरफुल फोन Black Shark 3 आणि Black Shark 3 Pro लॉन्च केले होते जे 5,000 एमएएच बॅटरी आणि 12 जीबी च्या दमदार रॅम सह आले होते. ब्लॅकशार्क 3 च्या यशानंतर आता कंपनीने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन फोन Black Shark 3S सादर केला आहे. हा फोन पण फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणला आहे जो हाईएंड डिवाईसेज सह येतो.

Black Shark 3S

ब्लॅकशार्क 3एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. Black Shark 3S ची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते जी एचडीआर10+ फीचर सह येते.

Black Shark 3S कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो जॉययूआई 12 सह चालतो. तसेच फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे त्यासोबत 7एनएम टेक्नॉलॉजी वर चालणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 3S ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ब्लॅक शार्क 3एस मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Black Shark 3S डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी वोएलटीई सह डुअल मोड 5जी ला पण सपोर्ट करतो. ब्लॅक शार्क 3एस कपंनीने 12 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128जीबी, 256जीबी व 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 65वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,720एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत

ब्लॅक शार्क 3एस चा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3999 युआन म्हणजे जवळपास 42,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 4299 युआन म्हणजे जवळपास 46,500 रुपये तर 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट 4799 युआन म्हणजे जवळपास 51,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/feed/ 0
Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-antutu-listing-specs-leaked-12gb-ram-65w-4720mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-antutu-listing-specs-leaked-12gb-ram-65w-4720mah-battery/#respond Thu, 27 Feb 2020 09:49:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6695 Black Shark 3 एनटूटू वर Black Shark MBU-A0 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंग स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर Black Shark आणि ASUS ROG सारख्या पावरफुल डिवाईसेजचे नाव सर्वात वर येते. गेल्या काही दिवसांपासुन Black Shark 3 स्मार्टफोन इंटरनेट वर चर्चेत आहे तसेच हा फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स आणि बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे. आज पुन्हा हा स्मार्टफोन वेबसाइट एनटूटू वर पण लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. Black Shark 3 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन येत्या 3 मार्चला लॉन्च होईल. ब्लॅक शार्क 3 पावरफुल गेमिंग फोन असेलच सोबतच फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल्यामुळे स्प्ष्ट झाले आहे कि हा डिवाईस दमदार रॅम आणि प्रोसेसर सह पण येईल.

Black Shark 3 एनटूटू वर Black Shark MBU-A0 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण हा फोन Shark KLE-A0 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. थेट एनटूटू लिस्टिंग बद्दल बोलायचे तर वेबसाइट वर स्पष्टपणे सांगितले आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल. लिस्टिंग मध्ये ब्लॅक शार्क 3 क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह दाखवण्यात आला आहे.

एनटूटू लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि Black Shark 3 12 जीबी पावरफुल रॅम वर लॉन्च केला जाईल. तसेच या फोन मध्ये 512 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. फोनच्या प्रोसेसर सोबत एनटूटू वर खुलासा झाला आहे कि Black Shark 3 मध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,720एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे जी 65वॉट फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करेल. या फोन मध्ये 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

तसेच बेंचमार्किंग स्कोर पाहता Black Shark 3 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 4302 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या डिवाईस ने 12448 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग 22 फेब्रुवारीची आहे तसेच ब्लॅक शार्क फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. Black Shark 3 मध्ये klein मॉडेल नंबर असलेला मदरबोर्ड आहे जो 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल.

Black Shark 2 Pro

Black Shark 2 Pro बद्दल बोलायचे तर कंपनीने या गेमिंग फोन मध्ये डीसी डिमिंग 2.0 आणि लिक्विड कूलिंग 3.0+ पण दिली आहे. या टेक्नोलॉजीमुळे यूजर्सचा गेमिंग एक्सपीरियंस अजून चांगला होईल.याचा अर्थ असा आहे कि फोन मध्ये जास्त वेळ गेम खेळल्यावर पण फोन गरम होण्याच्या समस्येचा सामना यूजर्सना करावा लागणार नाही. तसेच फोन मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट देण्यात आला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्के जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम चालणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

या फोन मध्ये 6.39-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच हँडसेट मध्ये डीसी डिमिंग आणि हाई टच सॅमपलिंग रेट 240 गीगाहर्ट्ज आहे. Black Shark 2 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागे एक 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सपोर्ट सह येते.

The post Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-antutu-listing-specs-leaked-12gb-ram-65w-4720mah-battery/feed/ 0
Black Shark 3 गेमिंग फोन 3 मार्चला होऊ शकतो लॉन्च, यात असतील पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-pro-5g-might-launch-on-3-march-kle-a0-listed-on-geekbench-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-pro-5g-might-launch-on-3-march-kle-a0-listed-on-geekbench-specs-leaked/#respond Mon, 24 Feb 2020 13:09:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6662 कंपनी Black Shark 3 आणि Black Shark 3 Pro 5G बाजारात आणू शकते.

The post Black Shark 3 गेमिंग फोन 3 मार्चला होऊ शकतो लॉन्च, यात असतील पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागील वर्ष गेमिंग स्मार्टफोन्ससाठी खूप खास होते. तेव्हा सर्व ब्रँड्सनी आपले स्मार्टफोन्स गेमिंग मोड्स सह बाजारात आणले होते तर Black Shark आणि ASUS ROG सारखे गेमिंग फोन पण मार्केट मध्ये लॉन्च झाले होते. हे गेमिंग फोन्स लोकांना आवडले होते. यावर्षी हे डिवाईस अजून स्मार्ट आणि पावरफुल होऊन येतील आणि असे वाटते कि याची सुरवात पण लवकरच होणार आहे. Black Shark 3 स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट आणि बेंचमार्किंग साइट वर समोर आला आहे ज्यावरून या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे तसेच स्पस्ट झाले आहे कि हा पावरफुल गेमिंग फोन लवकरच बाजारात येऊ शकतो.

Black Shark 3 काही दिवसांपूर्वी 3सी सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला होता. तर आता हा डिवाईस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे. गीकबेंच वर हा फोन Shark KLE-A0 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 फेब्रुवारीची आहे तसेच ब्लॅक शार्क फोन एंडरॉयडकॅय्य लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. Black Shark 3 मध्ये klein मॉडेल नंबर असलेला मदरबोर्ड दाखवण्यात आला जो क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 5जी चिपसेट असेल. हा चिपसेट 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल.

ब्लॅक शार्क 3 गीकबेंच वर 12 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्किंग स्कोर पाहता Black Shark 3 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 4302 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या डिवाईसने 12448 स्कोर मिळवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Black Shark 3 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 66वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Black Shark 2 Pro

Black Shark 2 Pro बद्दल बोलायचे तर कंपनीने या गेमिंग फोन मध्ये डीसी डिमिंग 2.0 आणि लिक्विड कूलिंग 3.0+ पण दिली आहे. या टेक्नोलॉजीमुळे यूजर्सचा गेमिंग एक्सपीरियंस अजून चांगला होईल.याचा अर्थ असा आहे कि फोन मध्ये जास्त वेळ गेम खेळल्यावर पण फोन गरम होण्याच्या समस्येचा सामना यूजर्सना करावा लागणार नाही. तसेच फोन मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट देण्यात आला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्के जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम चालणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

या फोन मध्ये 6.39-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच हँडसेट मध्ये डीसी डिमिंग आणि हाई टच सॅमपलिंग रेट 240 गीगाहर्ट्ज आहे. Black Shark 2 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागे एक 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सपोर्ट सह येते.

नवीन अपडेटनुसार ब्लॅक शार्क सीरीज येत्या 3 मार्चला लाँन्च केली जाऊ शकते. या दिवशी कंपनी Black Shark 3 आणि Black Shark 3 Pro 5G बाजारात आणू शकते.

The post Black Shark 3 गेमिंग फोन 3 मार्चला होऊ शकतो लॉन्च, यात असतील पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3-pro-5g-might-launch-on-3-march-kle-a0-listed-on-geekbench-specs-leaked/feed/ 0