Black Shark 3S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Aug 2020 10:41:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/ https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/#respond Mon, 03 Aug 2020 10:41:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7731 ब्लॅकशार्क 3 च्या यशानंतर आता कंपनीने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन फोन Black Shark 3S सादर केला आहे.

The post 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंग स्मार्टफोन्ससाठी ओळखला जाणाऱ्या Black Shark ब्रँडने मार्च मध्ये एक साथ दोन पावरफुल फोन Black Shark 3 आणि Black Shark 3 Pro लॉन्च केले होते जे 5,000 एमएएच बॅटरी आणि 12 जीबी च्या दमदार रॅम सह आले होते. ब्लॅकशार्क 3 च्या यशानंतर आता कंपनीने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन फोन Black Shark 3S सादर केला आहे. हा फोन पण फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणला आहे जो हाईएंड डिवाईसेज सह येतो.

Black Shark 3S

ब्लॅकशार्क 3एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. Black Shark 3S ची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते जी एचडीआर10+ फीचर सह येते.

Black Shark 3S कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो जॉययूआई 12 सह चालतो. तसेच फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे त्यासोबत 7एनएम टेक्नॉलॉजी वर चालणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 3S ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ब्लॅक शार्क 3एस मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Black Shark 3S डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी वोएलटीई सह डुअल मोड 5जी ला पण सपोर्ट करतो. ब्लॅक शार्क 3एस कपंनीने 12 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128जीबी, 256जीबी व 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 65वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,720एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत

ब्लॅक शार्क 3एस चा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3999 युआन म्हणजे जवळपास 42,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 4299 युआन म्हणजे जवळपास 46,500 रुपये तर 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट 4799 युआन म्हणजे जवळपास 51,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 12 जीबी रॅम, 64एमपी कॅमेरा आणि 65वॉट 4,720एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा पावरफुल गेमिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/black-shark-3s-launched-12gb-ram-64mp-camera-65w-charging-specs/feed/ 0