BSNL Wings - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Jul 2018 12:55:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 12:55:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1307 बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल.

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेट चा वापर सध्या जोरदार सुरू आहे. टेलीकॉम कंपन्यांनी स्वस्तात 4जी डेटा दिल्यामुळे देशातील स्मार्टफोन यूजर्स इंटरनेट चा भरपूर फायदा घेत आहेत. यात देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) 4जी क्षेत्रात खासगी कंपन्यापेक्षा मागे राहिली आहे. आणि हे बीएसएनएल च्या पण लक्षात आहे म्हणून कंपनी आता पूर्ण तयारी सह देशात 5जी सर्विस आणण्याचे प्रयत्न करत आहे. बीएसएनएल ने आपल्या यूजर्स साठी 5जी सर्विस घेऊन येण्या बाबत एक मोठी घोषणा केली आहे.

बीएसएनएल ने सांगितले आहे की कंपनी 5जी सर्विस वर काम करत आहे आणि लवकरच आपल्या यूजर्सना 5जी ची सेवा देऊ इच्छित आहे. बीएसएनएल ने 5जी सर्विस साठी काही अंर्तराष्ट्रीय टेलीकॉम कंपन्यां सोबत करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये एनटीटी एडवांस टेक्नोलॉजी सोबतच प्रसिद्ध मोबाईल ब्रांड नोकिया पण आहे. बीएसएनएल ने सांगितले आहे की भारत संचार निगम लिमिटेड 5जी सेवेत मागे राहणार नाही आणि जगातील इतर देशां सोबतच ही सर्विस भारतात घेऊन येईल.

बीएसएनएल चे चीफ जनरल मॅनेजर अनिल जैन ने यांनी सांगितले की अंदाजे 2020 मध्ये 5जी सर्विस सुरू होईल, पण बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल. चीफ ने हे मान्य केले आहे की कंपनी ने 4जी मिस केली पण 5जी सर्विस च्या क्षेत्रात कंपनी मागे राहणार नाही. बीएसएनएल ची 5जी सर्विस मर्यादित काळातच संपूर्ण देशात सुरू करेल.

अनिल जैन ने सांगितले आहे की बीएसएनएल ने ​ग्राउंड लेवल वर 5जी ची टेस्टिंग सुरू केली आहे आणि यासाठी अनेक अंर्तराष्ट्रीय टेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. जैन यांचे म्हणणे आहे की 5जी सर्विस बद्दल अनेक इंटरनेशनल कंपन्यांनी सुचना पाठवल्या आहेत तर काहींनी आपल्या नेटवर्क वर काम पण केले आहे. अनिल यांच्या नुसार जगभरात 5जी सर्विस साठी टेस्टिंग सुरू आहे. जर्मनी व चीन सह भारतात पण 5जी सर्विस वर अनेक टेस्ट केले जात आहेत.

विशेष म्हणजे बीएसएनएल 1 ऑगस्ट पासून भारतात ‘बीएसएनएल विंग्स’ ची सुरवात करणार आहे. बीएसएनएल विंग्स देशातील पहिली इंटरनेट टेलीफोनी सेवा आहे. हा एक असा अॅप आहे जो वापरून वीना कोणताही सिम कार्ड वाई-फाई वरून देशातील कोणत्याही मोबाइल नंबर वर कॉल करता येईल. या अॅप मधून मोबाइल नंबर सोबत लँडलाईन नंबर वर पण फ्री कॉल करता येईल.

सध्या व्हाट्सॅप सारख्या अॅप मधून आॅडियो किंवा वीडियो कॉल करण्यासाठी दुसर्‍या व्यक्ति च्या फोन मध्ये पण तोच अॅप्लीकेशन असणे गरजेचे आहे. पण बीएसएनएल विंग्स वापरण्यासाठी याची गरज नसेल. या अॅप मधून कोणत्याही नंबर वर डायरेक्ट कॉल करता येईल. विशेष म्हणजे या कॉलिंग साठी कोणत्याही सिम ची गरज नसेल, म्हणजे नो सिम नो डेटा पॅक.

बीएसएनएल विंग्स बद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/feed/ 0