ByteDance - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 04 Nov 2019 14:07:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/#respond Mon, 04 Nov 2019 14:07:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5675 फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि या म्यूजिक मेकिंग ऍपच पॅरेन्ट कंपनी ByteDance आपला स्वतःचा स्मार्टफोन पण बाजारात आणणार आहे. अनेक गॉसिप्स आणि बातम्यानंतर अखेरीस TikTok चा हा स्मार्टफोन समोर आला आहे. ByteDance ने आधीच स्पष्ट केले होते कि हा फोन टेक कंपनी Smartisan शी भागेदारी करून बनवला जाईल आणि या फोनचा TikTok शी कोणताही संबंध नसेल. तसेच आज कंपनीने हा स्मार्टफोन Jianguo Pro 3 नावाने अधिकृत केला आहे.

Jianguo Pro 3

हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये Nut Pro 3 नावाने प्रेजेंट केला जाईल. थेट फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Jianguo Pro 3 म्हणजे Nut Pro 3 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह ‘यू’ शेप नॉचला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.39 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Jianguo Pro 3 इन-डिस्प्ले टेक्नॉलॉजी सह येतो.

Jianguo Pro 3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो Smartisan OS 3.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस आहे. चीनी बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

क्वॉड कॅमेऱ्याची ताकद

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nut Pro 3 / Jianguo Pro 3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत फोन 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 8 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Jianguo Pro 3 / Nut Pro 3 मध्ये पावर बॅकअप साठी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचर असलेली 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4 टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करते. खास बाब अशी कि या फोन वर स्क्रीन अनलॉक न करता TikTok उघडून वापरतफ येईल. चीन मध्ये TikTok ला Duoyin म्हटले जाते. किंमतीबद्दल बोलायचे तर फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/feed/ 0
3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/ https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/#respond Thu, 04 Jul 2019 13:22:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4733 हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok ऍप भारतात जितका प्रसिद्ध आहे, तितकाच विवादास्पद पण आहे. अलीकडेच कॉग्रेस नेता शशी थरूर यांनी या ऍपला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हणत म्हटले होते कि TikTok इंडियन यूजर्सचा डेटा बेकायदेशीररित्या चीन मध्ये पाठवत आहे. TikTok संबंधित असा वाद चालू असताना एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. TikTok संबंधित बातमी आली आहे कि हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

TikTok संबंधित ये प्रकरण तामिळनाडू मधील आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार कृष्णानगर मधील सुरेश तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये आपल्या घरातून पळून गेला होता. सुरेश गायब झाल्यानंतर त्याची पत्नी आणि घरच्यांनी त्याला खूप शोधले पण तो कुठेच मिळाला नाही. पोलीसांत रिपोर्ट करूनही सुरेशचा थांगपत्ता लागला नाही. पण आता 3 वर्षानंतर सुरेशला एका TikTok वीडियो द्वारे त्याच्या पत्नीने पकडले आहे.

गायब झाल्यानंतर तीन वर्षांनी एके दिवशी सुरेशची पत्नी जयासुधाच्या नातेवाईकाने TikTok वर एक वीडियो बघितला ज्यात एक्टिंग करत असलेली एक व्यक्ती हुबेहूब सुरेश सारखी दिसत होती. त्या वीडियो मधील व्यक्ती एका किन्नरसोबत होती. संशय आल्यामुळे नातेवाईकाने जयासुधाला तो वीडियो दाखवला जो बघितल्यानंतर जयासुधाला खात्री झाली कि वीडियो मध्ये किन्नर सोबत असलेली व्यक्ति दुसरी कोणी नसून सुरेशच आहे.

TikTok वीडियो बद्दल जयासुधाने पोलिसांना सांगितले, त्यानंतर पोलिसांनी सुरेशच्या TikTok अकाउंट वर नजर ठेवली. काही दिवसांतच पोलिसांनी सुरेशला होसुर स्थानकावर पकडले. सुरेशने सांगितले कि त्याने कौटुंबिक कलहामुळे आपला परिवार सोडला होता. सुरेशने असे पण सांगितले कि तो वीडियो मधील किन्नर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे आणि घरातून पळून गेल्यानंतर तो त्याच्यासोबत राहत होता.

किन्नरांसाठी काम करणाऱ्या एका NGO सोबत मिळून पोलिसांनी सुरेशला पकडले आणि त्याची काउंसलिंग केल्यानंतर त्याची पत्नी व घरच्यांच्या हवाली केले आहे. सुरेशला दोन मुलं आहेत. TikTok वर वीडियो बनवण्याचा हा नाद सुरेशसाठी किती चांगला ठरला हे तर आम्ही सांगू शकत नाही पण या ऍपने एक घरातून पळून गेलेला नवरा पुन्हा त्याच्या बायकोला भेटू शकला.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/feed/ 0