Chinese Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 15 Jul 2020 10:41:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/ https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/#respond Wed, 15 Jul 2020 10:41:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7647 भारतात सुरु असलेल्या अँटी-चायना लाटेत चीनी ब्रँड्सच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे.

The post चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात बायकॉट चायना मोहीम सुरु आहे. लोक एकमेकांना चीनी ब्रँड्सचे स्मार्टफोन विकत न घेण्याचा सल्ला देत आहेत. सोशल मीडिया वर पण चीनी कंपन्यांबाबत वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर जेव्हा आम्ही एखादी टेक्नोलॉजी क्षेत्राशी संबंधित बातमी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रकाशित करतो तेव्हा 91मोबाईल्सला पण काही लोक देशभक्तीच्या तराजू मध्ये तोलत आहेत. चीन विरुद्ध निर्माण झालेल्या या रागामुळे Xiaomi, Realme, Oppo आणि Vivo सारख्या ब्रँड्सच्या मार्केटिंग वर परिणाम तर झाला आहे पण या मोहिमेचा परिणाम त्या भारतीय यूजर्सच्या खिश्यावर होणार आहे जे आधीपासून एखाद्या चीनी कंपनीचा मोबाईल वापरात आहेत.

भारतात सुरु असलेल्या अँटी-चायना लाटेत चीनी ब्रँड्सच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे. लोक चीनी कंपन्यांद्वारे निर्मित स्मार्टफोन्स घेणे टाळत आहेत आणि Samsung सारख्या इतर देशांच्या मोबाईल्स वर विश्वास दाखवत आहेत. पण ज्या लोकांकडे आधीपासून चीनी ब्रँडचे स्मार्टफोन्स आहेत त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे कि देशात चायनीज मोबाईल्सच्या पार्ट्सची कमतरता भासू लागली आहे. या टंचाईमुळे स्मार्टफोन्सचे पार्ट्स महाग झाले आहेत तसेच मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

मोबाईल पार्ट्सची कमतरता

हि गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही कि भारतात चीनी स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. देशातील टॉप 5 मोबाईल ब्रँड्स मध्ये 4 नावे चीनी कंपन्यांची आहेत. Xiaomi सतत नंबर वन इंडियन स्मार्टफोन ब्रँड बनत आहे. भारतात चीनी कंपन्या हिट होण्याची सर्वात मोठे कारण स्वस्तात जास्त फीचर्स असलेले स्मार्टफोन विकणे हे आहे. या फोन्सची किंमत कमी असण्याचे मुख्य कारण फोन मधील पार्ट्सची किंमत कमी आहे.

चीनी कंपन्या ज्या फोन ‘मेक इन इंडिया’ च्या टॅग सह विकतात त्यांचे बहुतांश पार्ट्स चीन मधून आयात केले जातात. तसेच आता माहिती समोर येत आहे कि भारतात या चीनी कंपन्यांच्या पार्ट्सची कमतरता निर्माण झाली आहे. आणि या टंचाईमुळे मोबाईल्स मध्ये तसेच रिपेयरिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सची किंमत पण बाजारात वाढली आहे.

रिपेयरिंग होईल महाग

स्थानिक मोबाईल मेकॅनिकनुसार काही आठवड्यांपूर्वी जो फोल्डर 1,000 रुपयांमध्ये मिळत होते, त्याची किंमत आता 1,300 रुपये झाली आहे. तसेच फोनच्या बॅटरीच्या किंमतीत 50 से 150 रुपये तसेच स्पीकर मध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. फोन मधील माइक्रोएसडी कार्ड पण आधीपेक्षा बाजारात 100 रुपयांपर्यंत जास्त महाग विकला जात आहे. मोबाईल दुरुस्त करणाऱ्या लोकांच्या मते पार्ट्स महाग मिळाल्यामुळे त्यांना रिपेयरिंग चार्ज पण वाढवावे लागतील. त्याचबरोबर टॅम्पर्ड ग्लास, इयरफोन व डेटा केबलच्या किंमती पण वाढल्या आहेत.

तुम्हाला माहितीच असेल कि गेल्या आठवड्यात देशातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने पाचव्यांदा आपल्या हिट स्मार्टफोन Redmi Note 8 च्या किंमतीत वाढ केली आहे. रिटेलर्सनुसार बायकॉट चायना मोहिमेचे परिणाम ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर होत आहेत. मोबाईल दुकानांवर लोक चीनी कंपन्यांच्या फोन्सना प्राधान्य देत नाहीत. पण दुसरीकडे ऑनलाईन शॉपिंग साइट्स वर अजूनही OnePlus, Poco, Xiaomi, Realme आणि Oppo, Vivo चे स्मार्टफोनचा सेल ‘स्टॉक आउट’ होत आहे.

The post चायनीज फोन वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, मोबाईल बिघडला तर दुरुस्तीसाठी करावा लागेल जास्त खर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-repair-cost-increased-in-india-shortage-of-chinese-mobile-parts/feed/ 0