Cool Play 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Aug 2018 13:28:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 13:28:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1885 फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 699 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये होतात.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कूलपॅड ने काही दिवसांपूर्वी कूल प्ले 7 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली प्ले सीरीज वाढवत कूलपॅड ने आता कूल प्ले 7 चा अजून एक वर्जन कूल प्ले 7सी पण स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कूलपॅड ने हा फोन चीन मध्ये लॉन्च केला आहे तिथे हा दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. कूल प्ले 7सी ची बेस किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये आहे.

कूल प्ले 7सी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कूलपॅड ने आपला लेटेस्ट मॉडेल 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 5.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कूल प्ले 7सी एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फोन आहे जो मीडियाटेक एमटी6750 चिपसेट वर चालतो. कूलपॅड ने आपल्या या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी दिली आहे.

कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 8-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि अजून एक सेकेंडरी कॅमेरा ​सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो.

कूल प्ले 7सी डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. कूलपॅड ने पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी दिली आहे. फोन डायमंड ब्लॅक, आॅरोरा ब्लू आणि रूबी रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 699 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये होतात. तसेच फोनच्या 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 799 युआन म्हणजे 8,300 रुपये ठेवण्यात आली आहे. 4 सप्टेंबर पासून कूल प्ले 7सी चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/feed/ 0