Coolpad Cool 3 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Jun 2019 11:57:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/#respond Wed, 26 Jun 2019 11:57:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4667 Coolpad ने Cool 3 Plus च्या लॉन्च सोबत आपल्या जुन्या मॉडेल Cool 3 चा पण एक नवीन वेरिएंट आज लॉन्च केला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा दबदबा आहे हे जगजाहीर आहे. Xiaomi, OPPO, vivo आणि Oneplus असेच काही प्रसिद्ध ब्रँड आहेत जे इंडियन मोबाईल मार्केटच्या एका मोठ्या हास्यवर राज्य करतात. या कंपन्यांमध्ये Coolpad एक असा ब्रँड आहे जो भारतात लो बजेट सेग्मेंट मध्ये लोकप्रिय. कमी किंमतीत आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स देणाऱ्या या कंपनीने आज भारतात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत अजून एक नवीन व स्वस्त मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने Coolpad Cool 3 Plus भारतीय बाजारात आणला आहे.

लुक आणि डिजाईन

Coolpad Cool 3 Plus कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Cool 3 Plus च्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या वरच्या डाव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये वर कॅमेरा सेंसर आहे मधोमध फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वरच सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर आणि यूएसबी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Coolpad Cool 3 Plus कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्याला कूलपॅड ने ड्यूड्रॉप डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा स्मार्टफोन 5.71-इंचाच्या एचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कूलपॅड कूल 3 प्लस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

कंपनीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. Coolpad Cool 3 Plus चा एक वेरिएंट 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Coolpad Cool 3 Plus सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फोटोग्राफ्स चांगले बनवण्यासाठी कॅमेरा सेंसर सह फ्लॅश लाईट पण आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी कूल 3 प्लस 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Coolpad Cool 3 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Coolpad Cool 3 Plus च्या 2जीबी रॅम + 16जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर फोनचा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी द्वारा 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनने चेरी ब्लॅक आणि ओशियन ब्लू कलर मध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. Coolpad Cool 3 Plus चा पहिला सेल येत्या 2 जुलैला शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर होईल.

विशेष म्हणजे Coolpad ने Cool 3 Plus च्या लॉन्च सोबत आपल्या जुन्या मॉडेल Cool 3 चा पण एक नवीन वेरिएंट आज लॉन्च केला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या नवीन वेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे जो देशात फक्त ऑफ लाईन रिटेल स्टोर्स वरच सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/feed/ 0