Coolpad Cool 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 01 Oct 2019 12:08:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/#respond Tue, 01 Oct 2019 12:08:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5452 लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी Coolpad हळूहळू पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली ओळख निर्माण करत आहे. कंपनीने अलीकडेच बजेट कॅटगरी मध्ये आपला Coolpad Cool 3 Plus सादर केला होता. आता कंपनीने Cool 5 सादर केला आहे. या फोनला मार्केट मधील Redmi 8A, Vivo U10 आणि Realme 5 कडून टक्कर मिळेल.

किंमत आणि उपलब्धता

Coolpad Cool 5 कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा हँडसेट कंपनीने दोन कलर वेरिएंट्स- Gradient Blue आणि Midnight Blue मध्ये सादर केला आहे. Cool 5 आज पासून अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

Coolpad Cool 5 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह HD+ रिजोल्यूशन, 19:9 आस्पेक्ट रेश्यो, ड्यूड्रॉप नॉच आणि 2.5D कर्व्ड ग्लास आहे. तसेच हँडसेट मीडियाटेक Helio P22 ऑक्ट-कोर चिपसेट 2GHz सह येतो. फोन मध्ये 4GB रॅम सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येईल. Coolpad Cool 5 मध्ये एंडरॉयड 9 Pie सोबत पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी Coolpad Cool 5 मध्ये 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर व LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी Coolpad Cool 5 मध्ये टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, वाई-फाई, जीपीएस, एफएम रेडियो, 3.5एमएम हेडफोन जॅक इत्यादी ऑप्शन आहेत.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/feed/ 0