Coolpad cool 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Oct 2020 14:04:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/#respond Thu, 15 Oct 2020 14:04:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8536 Coolpad Cool 6 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स साईट अमेझॉन भारतात लिस्ट Coolpad Cool 6 स्मार्टफोन अनेक दिवसांपासून भारतीय मोबाईल बाजारात चर्चेचा विषय बनला होता. कोणत्याही घोषणेविना या फोनचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडिया वर लाईव केला गेला होता, ज्यात फोनच्या फोटो सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले होते. तसेच आज या फोनची किंमत आणि विक्री संबंधित डिटेल्स सांगत कूलपॅडने अधिकृतपणे आपला नवीन फोन कूलपॅड कूल 6 भारतात लॉन्च केला आहे.

Coolpad ब्रँडने मोठ्या कालावधीनंतर भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. हि नवीन सुरवात Coolpad Cool 6 सह झाली आहे जो भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर बाजारात आला आहे जो 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री फक्त अमेझॉन इंडिया वर होईल.

Coolpad Cool 6

कूलपॅड कूल 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने फुलव्यू डिस्प्ले वर लॉन्च केला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.07 टक्के आहे. फोनची स्क्रीन वर कोणतीही नॉच देण्यात आली नाही तसेच हा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Coolpad Cool 6 स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे तसेच या डिवाईसचे वजन 370ग्राम आहे.

Coolpad Cool 6 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी70 चिपसेट वर चालतो. भारतात मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज सह विक्रीसाठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड कूल 6 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात खाली फ्लॅश लाईट आहे तसेच 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 21 मेगापिक्सल AI पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

Coolpad Cool 6 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कूलपॅड कूल 6 स्मार्टफोन अमेझॉन इंडिया वर Blue आणि Silver कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/feed/ 0
21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/#respond Mon, 12 Oct 2020 12:56:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8469 Coolpad Cool 6 बद्दल माहिती समोर आली आहे कि हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coolpad ब्रँड बऱ्याच काळानंतर भारतीय बाजारात सक्रिय झाला आहे. कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे जो Coolpad Cool 6 नावाने लॉन्च केला जाईल. कूलपॅडने आपला हा नवीन फोन लॉन्च करण्याची तारीख तर सांगितली नाही पण ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे. अमेझॉनच्या लिस्टिंग मध्ये लॉन्चच्या आधीच Coolpad Cool 6 चे अनेक महत्वाचे डिटेल्स व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

कॅमेरा सेटअप

अमेझॉन लिस्टिंग मध्ये Coolpad Cool 6 च्या कॅमेरा डिपार्टमेंटची माहिती ऑफिशियल केली गेली आहे. हा स्मार्टफोन पॉप-अप कॅमेरा वर लॉन्च केला जाईल. हा कॅमेरा मॅक्नेजिम फोनच्या टॉप पॅनल वर डावीकडे असेल जो सेल्फी कमांड देताच बॉडीच्या बाहेर येईल. कूलपॅड कूल 6 चा हा पॉप-अप कॅमेरा 21 मेगापिक्सलच्या सेंसर सह येईल. कंपनीने याला AI Rising सेल्फी कॅमेरा असे नाव दिले आहे.

तसेच कूलपॅड कूल 6 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या सेटअप मध्ये सर्वात खाली फ्लॅश लाईट असेल सोबत 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. Coolpad Cool 6 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर दिला जाईल.

प्रोसेसिंग पावर

Coolpad Cool 6 बद्दल माहिती समोर आली आहे कि हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. अँड्रॉइड आधारित या स्मार्टफोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी70 चिपसेट मिळेल.

कूलपॅड कूल 6 च्या बॅक पॅनल वरच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पॉप-अप कॅमेऱ्यामुळे हा फोन कोणत्याही नॉच विना फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करेल. भारतीय बाजारात हा फोन Blue आणि Silver दोन कलर वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. आशा आहे कि 16 ऑक्टोबर पासून अमेझॉन इंडिया वर सुरु होणाऱ्या फेस्टिवल विक्री मधेच Coolpad Cool 6 पहिल्या विक्रीसाठी सादर केला जाईल.

The post 21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/feed/ 0