Coolpad Legacy 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Jan 2020 12:30:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/#respond Wed, 08 Jan 2020 12:30:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6226 अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 400 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला गेला आहे

The post Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी बोलले जात होते कि साल 2020 मध्ये 5G स्मार्टफोन्सचा बोलबाला असेल. नवीन वर्ष सुरु होऊन फक्त एक आठवडा झाला आहे आणि इतक्यात हि गोष्ट खरी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत Redmi K30, OPPO Reno 3 आणि Realme X50 सारखे 5G फोन टेक बाजारात लॉन्च झाले आहेत. या यादीत आता अजून एक नवीन नाव Coolpad चे जोडले गेले आहे. कूलपॅड ने लॉस वेगस मध्ये सुरु असलेल्या कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2020) मध्ये आपला पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो Coolpad Legacy 5G नावाने टेक बाजारात आला आहे. खास बाब अशी कि कूलपॅड लेगसीने पण मीड बजेट मध्ये एंट्री घेतील आहे. चला जाणून घेऊया स्मार्टफोन मार्केट मधील या नवीन 5जी फोन बद्दल.

Coolpad Legacy

कूलपॅडने आपला हा नवीन फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला आहे जो 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या Snapdragon 765G चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू आहे.

Coolpad Legacy 5G इंटरनेशनल मार्केट मध्ये 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड लेगसी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

कूलपॅड लेगसी 5जी सिंगल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Coolpad Legacy 5G मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह क्वॉलकॉम क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी आणि 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Coolpad Legacy 5G फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे तसेच कूलपॅड लेगसीच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 400 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला गेला आहे, हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/feed/ 0