Delhi Crime 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Aug 2022 13:10:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या विकेंड काय बघायचं ठरवताय? OTT वर आल्या आहेत Delhi Crime 2, Criminal Justice 3, Maharani 2 सारख्या जबरदस्त वेब सीरीज https://www.91mobiles.com/marathi/new-ott-release-this-week-delhi-crime-2-criminal-justice-3-and-maharani-2/ https://www.91mobiles.com/marathi/new-ott-release-this-week-delhi-crime-2-criminal-justice-3-and-maharani-2/#respond Sat, 27 Aug 2022 13:02:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12542 ऑगस्टचा शेवटचा वीकेंड नवीन ओटीटी रिलीजमुळे शानदार ठरणार आहे. या वीकेंडला नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, वूट सिलेक्ट, झी5 इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर आणि क्राइम ड्रामा बघता येईल. ओटीटी वर Delhi Crime 2, Criminal Justice 3, महारानी सीजन 2 इत्यादी एकापेक्षा एक जबरदस्त सीरिज या विकेंडला दाखल झाल्या आहेत. Criminal Justice S3 क्रिमिनल जस्टिस […]

The post या विकेंड काय बघायचं ठरवताय? OTT वर आल्या आहेत Delhi Crime 2, Criminal Justice 3, Maharani 2 सारख्या जबरदस्त वेब सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑगस्टचा शेवटचा वीकेंड नवीन ओटीटी रिलीजमुळे शानदार ठरणार आहे. या वीकेंडला नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, वूट सिलेक्ट, झी5 इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर आणि क्राइम ड्रामा बघता येईल. ओटीटी वर Delhi Crime 2, Criminal Justice 3, महारानी सीजन 2 इत्यादी एकापेक्षा एक जबरदस्त सीरिज या विकेंडला दाखल झाल्या आहेत.

Criminal Justice S3

क्रिमिनल जस्टिस सीरीज खूप लोकप्रिय आहे. या सीरीजच्या तिसऱ्या सीजनसह पुन्हा एकदा पंकज त्रिपाठी येत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी मजेदार वकील माधव मिश्राची भूमिका साकारली आहे. नवीन सीजनमध्ये माधव मिश्रा न्यायव्यवस्था आणि तिच्या मर्यादेवर सवाल करत आहेत. सीरीजमध्ये श्वेता बसु प्रसाद, स्वास्तिका मुखर्जी आणि पूरब कोहली देखील आहेत. ही सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारवर 26 ऑगस्ट, 2022 पासून सुरु होत आहे, जी रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केली आहे.

Delhi Crime Season 2

अंतरराष्ट्रीय एमी विजेता स्ट्रीमिंग सीरीज ‘Delhi Crime’ आपला दुसरा सीजन घेऊन येत आहे. या शो मधील कलाकार अजून एक नवीन गुन्ह्यावर प्रकाश टाकतील आणि तो सोडवण्यासाठी नव्या सीजनमध्ये आपली भूमिका पुन्हा साकारत आहेत. नवीन सीजनमध्ये अनुभवी पोलीस अधिकारी डीसीपी वर्तिका चतुर्वेदी (शेफाली शाह) बढती मिळेलेली नीती सिंह (रसिका दुग्गल ) आणि वर्तिकाचे राईट हॅन्ड भूपेंद्र सिंह उर्फ भूपी (राजेश तैलंग) यांचे नेतृत्व करतील. वर्तिकाची टीम खाजगी आणि व्यवसायिक आघाड्यांवर येणाऱ्या संकंटांचा सामना करतील. Delhi Crime Season 2 26 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर बघता येईल.

Maharani 2

हुमा कुरैशी-स्टारर पॉलिटिकल ड्रामा ‘महारानी’ चा दुसरा सीजन आला आहे. मल्टी-सीजन ड्रामा एक काल्पनिक गोष्ट आहे, परंतु 1990 च्या दशकातील बिहारमधील राजकीय घडामोडीची झलक यात दिसते. शोच्या दुसऱ्या सीजनमध्ये हुमा कुरैशी राणी भारतीची मुख्य भूमिका साकारत आहेत, भीमा भारती (सोहम शाह) जेलमधून बेहरे येत आणि सत्तेसाठी आपल्या पत्नीशी संघर्ष करताना दिसेल. ही सीरिज तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म SonyLiv वर बघू शकता. ही सीरीज 25 ऑगस्ट, 2022 ला या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.

HIT: The First Case

राजकुमार राव-स्टारर HIT: The First Case 15 जुलैला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. हा मिस्ट्री थ्रिलर नावाच्या 2020 च्या हिट तेलुगु चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. एचआयटी चा फुलफॉर्म होमिसाइड इंटरवेंशन टीम असा आहे. या चित्रपटातून एका पोलीस ऑफिसरची गोष्ट सांगण्यात आली आहे जो एका हरवलेल्या महिलेचा शोध घेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 28 ऑगस्टला रिलीज होत आहे.

The post या विकेंड काय बघायचं ठरवताय? OTT वर आल्या आहेत Delhi Crime 2, Criminal Justice 3, Maharani 2 सारख्या जबरदस्त वेब सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-ott-release-this-week-delhi-crime-2-criminal-justice-3-and-maharani-2/feed/ 0