Dual Pop-Up Camera - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Sep 2019 15:18:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/#respond Wed, 04 Sep 2019 15:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5226 Vivo V17 Pro 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या महिन्यात आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि Vivo कंपनी लवकरच भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवणार आहे आणि या सीरीज अंतर्गत Vivo V17 Pro आणि Vivo V17 स्मार्टफोन लॉन्च केले जातील. आम्ही सांगितले होते कि Vivo V17 Pro कंपनी डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करेल. म्हणजे फोनच्या पॉप-अप सेटअप वर दोन सेल्फी सेंसर दिले जातील. आता Vivo V17 सीरीजच्या आगामी स्मार्टफोनचा अधिकृत पोस्टर पण समोर आला आहे ज्यात डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा समोर आला आहे.

Vivo V17 Pro लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. अश्या बातम्या आतापर्यंत फक्त लीक्स मधेच समोर येत होत्या पण 91मोबाईल्स आज Vivo V17 Pro च्या भारतातील इंडिया लॉन्चच्या बातमीवर शिकामोर्तब केला आहे. फोन लॉन्चच्या आधी आम्ही Vivo की V17 Pro संबंधित स्ट्रॅटेजीची माहिती मिळाली आहे कि कंपनी या आठवड्यात 9 तारखेला भारतात Vivo V17 Pro ट्रेनिंग सुरु करत आहे ज्यात वीवो प्रोमोटर्सना स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत व सेल संबंधित माहिती तसेच कंपनीचे प्लानिंग सांगण्यात येईल.

Vivo V17 Pro ची हि खास ट्रेनिंग 9 सप्टेंबर पासून सुरु होईल. इंडस्ट्रीमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार फोन ट्रेनिंग संपल्यावर कंपनी हा फोन डिजीटल मीडिया वर टीज करायला सुरवात करेल, त्यानंतर काही आठवडयांनी हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. Vivo V17 Pro पाहता हा स्मार्टफोन वीवो चा पहिला स्मार्टफोन आहे जो 6 कॅमेरा सेंसर्सना सपोर्ट करतो.

आम्हाला मिळालेल्या Vivo V17 Pro पोस्टर मध्ये हा स्मार्टफोन बॉलीवुड अभिनेता आमिर खानच्या हातात आहे. फोनचा लुक पाहता हा फोन फुलव्यू बेजल लेस डिजाईन वर बनला आहे. डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा इतर कोणताही सेंसर नाही. डिस्प्लेच्या चारही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मेकॅनिज्म देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट असेल. दोन सेंसर फ्लॅशच्या वर असतील तर दोन कॅमेरा सेंसर फ्लॅश लाईटच्या खाली आहेत.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट

Vivo V17 Pro ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 4 सेंसर असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. विशेष म्हणजे आतापर्यंत सिंगल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि शार्कफिन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले फोन बाजारात आले आहेत. डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होणारा Vivo V17 Pro पहिला स्मार्टफोन असेल. Vivo V17 Pro 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

स्पेसिफिकेशन्स

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही त्यामुळे असे म्हणता येईल कि वीवो आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणेल. Vivo V17 Pro चे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण मीडिया रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह 8-मेगापिक्सल, 5-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर्स दिले जाऊ शकतात आणि डुअल पॉप-अप कॅमेऱ्यावर 16-मेगापिक्सलचा सेंसर मिळू शकतो.

Vivo V17 Pro कंपनी क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर लॉन्च करू शकते जो भारतात 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी असलेल्या दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर Vivo V17 Pro मध्ये 128जीबी आणि 256जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे कि 6 सप्टेंबरला Vivo Z1x भारतात लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी कंपनी V17 Series पण सादर करेल. Vivo V17 Pro भारतात कधी लॉन्च होईल हे आम्ही लवकरच तुम्हाला सांगू.

The post Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v17-pro-real-photo-india-launch-confirmed-promoter-training-from-9-september/feed/ 0