Exclusive - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Dec 2019 13:20:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/#respond Fri, 06 Dec 2019 13:20:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5994 कदाचित कंपनी या महिन्यात भारतात Galaxy A51 लॉन्च करेल.

The post Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite आधी डिसेंबर मध्ये लॉन्च होणार असल्याची बातमी मिळाली होती . पण आता आता आम्हाला इंडस्ट्री सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि या दोन्ही डिवाइसचा लॉन्च पुढे ढकलण्यात आला आहे. मिड-जानेवारी मध्ये कोणत्या तारखेला फोन होतील हि माहिती आम्हाला मिळाली नाही.
इंडस्ट्री सोर्सने 91mobiles ला सांगितले कि Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite स्मार्टफोन मिड-जानेवारी 2020 ला लॉन्च होतील. कदाचित कंपनी या महिन्यात भारतात Galaxy A51 लॉन्च करेल.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन पण क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह येईल. एफसीसी वर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. Samsung Galaxy S10 Lite एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच हा फोन 12 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सलच्या थर्ड कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite एफसीसी च्या लिस्टिंग मध्ये 4500एमएएच ची पावरफुल बॅटरी सह असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन EA-TA845 मॉडेल नंबर असलेल्या चार्जरला सपोर्ट करेल. हाच मॉडेल नंबर असलेला चार्जर Samsung Galaxy Note 10 Plus मध्ये दिसला होता आणि तो स्मार्टफोन 45वॉट फास्ट चार्जर सह बाजारात आला होता. म्हणजे Samsung Galaxy S10 Lite पण 45वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy Note 10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

The post Exclusive: Samsung Galaxy S10 Lite आणि Note 10 Lite चा इंडिया लॉन्च पुढे ढकलला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-note-10-lite-launch-in-india-delayed-to-mid-january/feed/ 0