Fake Xiaomi Products - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Nov 2020 13:06:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 देशात सापडले आहेत 33 लाख नकली Xiaomi प्रोडक्ट्स, तुम्ही पण अडकला नाहीत ना या जाळ्यात https://www.91mobiles.com/marathi/fake-xiaomi-products-worth-rs-33-3-lakh-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/fake-xiaomi-products-worth-rs-33-3-lakh-in-india/#respond Tue, 24 Nov 2020 13:06:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9062 Xiaomi ने स्वतःहून पोलिसांत तक्रार केली होती की त्यांच्या ब्रँडच्या नावाने नकली सामान लोकांना विकला जात आहे.

The post देशात सापडले आहेत 33 लाख नकली Xiaomi प्रोडक्ट्स, तुम्ही पण अडकला नाहीत ना या जाळ्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड आहे. कमी किंमतीच्या स्मार्टफोन्स सोबतच शाओमी कंपनी मोबाईल एक्ससेसरीज व प्रोडक्ट्सच्या बाबतीत पण अव्वल आहे. भारतीय ग्राहकांना Xiaomi प्रोडक्ट्स खूप आवडतात आणि स्वस्त असल्यामुळे विकत पण घेतात. शाओमीच्या या मोठ्या फॅन फॉलोइंगमुळे मार्केट मध्ये नकली शाओमी प्रोडक्ट्सची संख्या पण वाढली आहे जे अस्सल म्हणून सर्वसामान्य लोकांना विकले जातात. Xiaomi फेक प्रोडक्ट्ससंबंधित असेस एक प्रकरण समोर आला आहे, ज्यात चेन्नवीन आणि बेंगळुरूच्या बाजारातून 33.3 लाख रुपयांचे नकली शाओमी प्रोडक्ट्स पकडले गेले आहेत.

फेक शाओमी प्रोडक्ट्सचे मोठे रॅकेट सध्या देशात सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर Xiaomi चे नकली प्रोडक्ट्स दुकानात आहेत जे अस्सल प्रोडक्ट्सच्या किंमतीत विकले जातात. अलीकडेच चेन्नवीन आणि बेंगळुरू मध्ये स्थानिक पोलिसांनी छापा टाकून 33.3 लाख रुपयांच्या किंमतीचे नकली शाओमी प्रोडक्ट्स पकडले आहेत. हैराणीची बाब म्हणजे हे एवढे फेक प्रोडक्ट्स फक्त 3 सप्लायर्सकडून जप्त करण्यात आले आहेत. आणि या प्रोडक्ट्स मध्ये नेमके एक-दोन नाही तर वेगवेगळ्या कॅटेगरी मधील अनेक शाओमी प्रोडक्ट्सच्या मॉडेल्सचा समावेश आहेत.

Xiaomi ने स्वतःहून पोलिसांत तक्रार केली होती की त्यांच्या ब्रँडच्या नावाने नकली सामान लोकांना विकला जात आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि मग छापा टाकला. रिपोर्टनुसार जेव्हा पोलिसांचे टीमने सप्लायर्सना पकडले तेव्हा 3,000 पेक्षा पण जास्त नकली शाओमी प्रोडक्ट्स मिळाले. या छाप्यात शाओमीचे कर्मचारी पोलिसांसोबत होते, ज्यांनी असली आणि नकली मधील फरक सांगितला. बोलले जात आहे कि चेन्नवीन मधून जवळपास 24.9 लाख तर बेंगळुरू जवळ 8.4 लाख रुपयांचे नकली शाओमी प्रोडक्टस पकडले गेले आहेत.

खरेदी करताना सावध रहा

जर तुम्ही पण शाओमीचा एखादा प्रोडक्ट विकत घेण्याचा विचार करत असाल तर जास्त सावध राहिले पाहिजे. नकली शाओमी प्रोडक्ट विकण्याचे काम फक्त चेन्नवीन किंवा बेंगळुरू मधेच नाही तर देशातील इतर भागांमध्ये पण होत आहे. नकली सामान विकणारे सप्लायर्स छोट्या शहरांना व ग्रामीण भागांना लक्ष्य करतात जिथे मोबाईलच्या दुकानांत व रिटेल स्टोर्स वर हे फेक Xiaomi प्रोडक्ट्स अस्सल प्रोडक्टच्या नावावर आणि किंमतीत विकले जातात. या प्रोडक्ट्स मध्ये Mobile cover, Mi Band, headphone, power bank, USB cable, charger आणि earphones सारख्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे.

The post देशात सापडले आहेत 33 लाख नकली Xiaomi प्रोडक्ट्स, तुम्ही पण अडकला नाहीत ना या जाळ्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fake-xiaomi-products-worth-rs-33-3-lakh-in-india/feed/ 0