fastest smartphones - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Aug 2018 14:42:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगातील 10 सर्वात फास्ट फोन, यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही https://www.91mobiles.com/marathi/world-fastest-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/world-fastest-smartphone-in-marathi/#respond Tue, 28 Aug 2018 14:42:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1850 तुम्ही पण फोन घेणार असाल तर हे जगातील 10 सर्वात फास्ट फोन नक्की बघा.

The post जगातील 10 सर्वात फास्ट फोन, यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही वर्षांपूर्वी लोक फोन घ्यायला जात असत तेव्हा आधी स्टाइल बघत होते. जो फोन चांगला दिसत असे तो घेतला जायचा. कारण फोन मध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त दुसरे काहीच नसायचे. पंरतु सध्या फोन घेताना पहिल्यांदा त्याचा स्पीड बघितला जातो. प्रत्येकजण सर्वात फास्ट फोन घेण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्या फोनच कंप्यूटर चे काम करत आहे आणि यावरूनच सर्व कामे केली जातात. तुम्ही पण फोन घेणार असाल तर हे जगातील 10 सर्वात फास्ट फोन नक्की बघा.

1. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

जर आपण सुपर फास्ट फोन बद्दल बोलत असू तर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा उल्लेख केलाच पाहिजे. हा फोन एक्सनोस 9810 वर चालतो जो खुप पावरफुल आहे. तसेच फोन मध्ये 6जीबी आणि 8जीबी रॅम आहे. हा फोन 128जीबी आणि 512जीबी मेमरीला सपोर्ट करतो. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो दुसर्‍या कुठल्याच फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा पण कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत हा फोन तुम्हाला आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दीली आहे. फोनचा कॅमेरा खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

2. अॅप्पल आयफोन 10

फास्ट फोन बद्दल बोलताना अॅप्पल चा उल्लेख न करून कसे चालेल. अॅप्पल कडे पण दमदार डिवाइस आहे. कंपनी ने गेल्यावर्षी आयफोन 10 (iPhone X) सादर केला होता जो आजही इतर फोन पेक्षा कमी नाही. या फोन पासून नॉच स्क्रीन ची सुरवात झाली होती. फोन मध्ये 5.8-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि हा अॅप्पल च्या ए11 बाईओनिक चिपसेट वर चालतो. यात हेक्सा-कोर अर्थात 6 कोर वाला प्रोसेसर देण्यात आला आहे. हा खुपच ताकदवान प्रोसेसर आहे. फोन मध्ये 12एमपीचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो खुप शानदार आहे. हा फोन 64जीबी आणि 256जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे.

3. हुआवई पी20 प्रो

हुआवई ने भारतीय बाजारात तीन कॅमेरा वाला पी20 प्रो सादर केला आहे. हा फोटोग्राफी मास्टर म्हणून ओळखला जातो आणि यात 40-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्या आरजीबी, मोनोक्रोम आणि टेलीफोटो लेंस आहेत. हा फोन 3एक्स आॅप्टिकल झूम आणि 5एक्स लॉसलेस झूम ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एफ/1.6 पासून एफ/2.4 पर्यंत अपर्चर चा वापर केला जाऊ शकतो. दमदार कॅमेरा नंतर याचा प्रोसेसर पण खुप शानदार आहे. कंपनी ने हा हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम आहे आणि इंटरनल स्टोरेज 128जीबी ची आहे. हा प्रोसेसर पण शानदार आहे.

4. वनप्लस 6

वनप्लस 6 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.28-इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. पण याची ताकद प्रोसेसर आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर सादर केला आहे जो सध्या सर्वात ताकदवान चिपसेट पैकी एक आहे. फोन मध्ये 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी आणि 8जीबी रॅम आणि यात 64जीबी आणि 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर आहे.

5. सॅमसंग गॅलेक्सी एस9+

सध्या सॅमसंग च्या फ्लॅगशिप एस सीरीज चा हा सर्वात ताकदवान फोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस9 प्लस मध्ये 6.2-इंचाची सुपर एमोलेड क्वॉड एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन सॅमसंग च्या एक्नोस 9810 चिपसेट वर चालतो आणि यात 2.7गीगाहर्ट्जका आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर पण टॉप परफॉर्मेंस साठी प्रसिध्द आहे. हा फोन 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी मध्ये उपलब्ध आहे आणि या सोबत 4जीबी आणि 6जीबी रॅम आहे.

6. एलजी जी7 प्लस थिंक

खुप वर्षांनी एलजी ने खुप योग्य किंमतीत आपला फोन लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने जी7 प्लस थिंक सादर केला आहे जो खुप दमदार आहे. हा फोन क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो आणि यात कोरियो आर्किटेक्चर वाला 2.8गीगाहट्र्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. सोबत 6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यात 2टीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोन मध्ये आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले वाली 6.1-इंचाची क्वॉडएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी एलजी जी7 प्लस थिंक मध्ये 16-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.9 आणि एफ/1.6 अपर्चर सह सादर केला आहे जो पोर्टेट मोड सोबत वाइड एंगल फोटो घेऊ शकतो. कॅमेर्‍या सोबत लेजर पीडीएएफ आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे आॅप्शन देण्यात आले आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे आणि हा कंपनी ने एफ/1.9 अपर्चर सह सादर केला आहे.

7. असूस जेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने दोन फोन लॉन्च केले आहेत आणि दोन्ही खूपच शानदार आहेत. कमी रेंज मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम1 येतो. तर हाय एंड रेंज मध्ये कंपनी ने झेनफोन 5झेड सादर केला आहे आणि हा खूपच दमदार आहे. फोन मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. तसेच हा फोन 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज सह उपलब्ध आहेत. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. या फोन मध्ये एआई क्षमता आहे.

8. शाओमी पोको एफ1

आता पर्यंत लो आणि मिड रेंज प्राइस सेग्मेंट मध्ये शाओमी चे राज्य होते पण आता पोको फोन लॉन्च करून कंपनी ने हाई रेंज सेग्मेंट मध्ये पण आपले नाव केले आहे. पोको एफ1 को 20,999 रुपयांच्या बेसिक किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर लॉन्च होणार सर्वात स्वस्त फोन आहे. फोनचे बाकी स्पेसिफिकेशन पण खुप दमदार आहेत. यात 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो आणि हा 6जीबी व 8जीबी मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. या सोबत 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी आहे.

9. गूगल पिक्सल 2 एक्सएल

गेल्या वर्षी गूगल ने पिक्सल 2 एक्सएल हा फोन सादर केला होता पण आजही हा इतर फोन्स इतकाच फास्ट आहे. फोन मध्ये 6-इंचाचा क्यू एचडी+ डिस्प्ले आहे. कंपनी ने पीओएलईडी डिस्प्ले चा वापर केला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 वर आधारित आहे आणि यात 2.35गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. कंपनी ने यात 4जीबी रॅम दिला आहे. कदाचित हा रॅम कमी वाटेल पण स्टॉक एंडॉयड असल्यामुळे हा कमी रॅम असूनही खुप फास्ट आहे. फोटोग्राफी साठी यात 12.2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

10. आॅनर 10

हुआवई ब्रांड आॅनर कडे पण शानदार फोन आहे जो स्टाइल सोबतच परफॉर्मेंस मध्ये पण कमाल आहे. आॅनर 10 असाच मॉडेल आहे. या फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन इमोशन यूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो सह हुआवई च्या सर्वात ताकदवान चिपसेट किरीन 970 वर चालतो. फोन मध्ये 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. कंपनी ने यात दमदार कॅमेरा पण दिला आहे. रियर पॅनल वर 24-मेगापिक्सल + 16-मेगापिक्सल चे दोन लेईका कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फ्रंटला 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

The post जगातील 10 सर्वात फास्ट फोन, यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/world-fastest-smartphone-in-marathi/feed/ 0