Fitbit - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Nov 2019 13:17:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/ https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/#respond Thu, 14 Nov 2019 13:17:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5778 Google ने विश्वास दर्शवला आहे कि पुन्हा कोणत्याही युजरला अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही याची ते काळजी घेतील.

The post फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये आग लागल्यामुळे तसेच मोबाईलची बॅटरी ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना कुठून ना कुठून समोर येत असतात. याच आठवड्यात अशीच एक घटना ओरिसा मध्ये घडली होती ज्यात रात्री झोपताना स्मार्टफोन मध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्या स्फोटाने मोबाईल यूजरचा मृत्यु झाला होता. मोबाईलच्या या दुर्घटनेनंतर आता एक अशी घटना प्रकाशात आली आहे ज्यात स्मार्टफोन नाही तर हातातील स्मार्ट बँड मध्ये ब्लास्ट झाला आणि यात यूजर जखमी झाला आहे.

स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या बातम्यांमानंतर आता स्मार्ट बँड व फिटनेस बँड संकटाच्या छायेत आहेत. स्मार्ट बँड मध्ये आग लागल्याची आणि ब्लास्ट होण्याची हि बातमी अमेरिकेतून आली आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हि दुर्घटना झाली होती ज्यामुळे जगभरातील स्मार्ट बँड व फिटनेस बँड यूजर्स घाबरले आहेत. हैराणीची बाब म्हणजे ज्या बँड मध्ये ब्लास्ट झाला आहे तो कोणत्याही छोट्या किंवा नवख्या कंपनीचा बँड नव्हता तर टेक विश्वातील दिग्गज ब्रँडस मधील Fitbit चा फिटनेस बँड होता. अलीकडेच Fitbit कंपनीला Google ने विकत घेतले आहे.

Fitbit फिटनेस बँड मध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी आम्हाला द सन वेबसाइट वरून मिळाली आहे. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हि दुर्घटना गेल्या 5 नोव्हेंबरला झाली आहे आणि या घटनेचा शिकार अमेरिकेतील लोवा मधील इथन लँडर्स झाला आहे. रिपोर्ट नुसार लँडर्स ने आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे याची संपूर्ण माहिती दिली होती. लँडर्स ने सांगितले होते कि तो सवयीप्रमाणे फिटनेस बँड हातात घालून झोपला होता.

झोपेत त्याला अचानक आपल्या हातावर गर्मी जाणवली. गाढ झोपेत त्याला अचानक त्याला वाटले कि आपला हात जळत आहे. त्याने पहिले कि Fitbit बँड मधून धूर निघत होता. लँडर्स ने घाईत बँड काढण्याचा प्रयत्न केला पण बँड खूप जास्त गरम झाल्यामुळे काढता येत नव्हता. लँडर्स ने आणि त्याच्या पत्नीने प्रयत्न करून बँड हातातून काढला आणि त्यात स्फोट झाला.

जखमी लँडर्स हॉस्पिटल मध्ये गेला तिथे त्यावर उपचार सुरु झाले. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले कि लँडर्सला थर्ड डिग्री बर्न झाला आहे आणि त्याच्या त्वचेखाली मांसापर्यंत जखम पोचली आहे. लँडर्सचा हात बरा होण्यास वेळ लागेल. यावर Fitbit कंपनी म्हणाली कि त्यांना घटनेची माहिती मिळाली आहे आणि ते याची तपासणी करतील. Google ने विश्वास दर्शवला आहे कि पुन्हा कोणत्याही युजरला अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही याची ते काळजी घेतील.

The post फिटनेस बँडला लागली आग, झोपेत असताना झाला ब्लास्ट, यूजरच्या हाताला लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fitbit-smart-fitness-band-explode-caught-fire-on-wrist-google/feed/ 0