Free WiFi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/ https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/#respond Fri, 29 Mar 2019 13:12:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3968 फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे.

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या माणसाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा यावरून अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल अश्या झाल्या आहेत. हे जरी मी विनोदाने बोललो असलो तरी बऱ्याच अंशी हे सत्य आहे. हातात मोबाईल आणि मोबाईल मध्ये इंटरनेट सर्वांचीच हि गरज बनली आहे. डिजीटल होत असलेल्या जगात इंटरनेट वेगाने वाढत आहे. टेलीकॉम कंपन्या स्वस्तात जास्त इंटरनेट बेनिफिट देत आहेत, तसेच भारत सरकार ने पण सार्व​जनिक ठिकाणी इंटरनेट देण्यासाठी अनेक कामे केली आहेत. याचसंदर्भात सामान्य माणसांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कि भारतात 1,000 रेल्वे स्टेशन पूर्णपणे फ्री वाई-फाई ने सुसज्ज झाले आहेत.

1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई झोन
भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना भेट देत भारत सरकार ने घोषणा केली आहे कि देशात 1,000 रेल्वे स्टेशन्स फ्री वाई-फाई सर्विस ने सुस्सज करण्यात आले आहे. या 1,000 रेल्वे स्टोशन्सचा संपूर्ण परिसर वाई-फाई झोन बनला आहे, जिथे कोणत्याही प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या कोणत्याही ठिकणी बसून कोणतेही शुल्क न देता फ्री वाई-फाई चा लाभ घेता येतो. इंडियन रेल्वे स्टेशन्स वाई-फाई ने सुसज्ज करण्याचे हे काम रेलटेल कॉरपोरेशन ऑफ इंडिया ने केले आहे.

रोज एका स्टेशनला मिळाला वाई-फाई
रेलटेल ने सांगितले आहे कि रेल्वे स्टेशन्सना फ्री वाई-फाई देण्याचे हे मिशन साल 2016 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2 वर्ष आणि तीन महिन्यांत कॉरपोरेशनने देशातील 1,000 स्टेशन्स मध्ये वाई-फाई ची सुविधा दिली आहे. अशाप्रकारे रेलटेल ने सरासरी एका महिन्यात 37 स्टेशन्स वाई-फाई झोन मध्ये परावर्तित केले आहेत आणि रोज देशातील 1 रेल्वे स्टेशन फ्री वाई-फाई स्टेशन बनला आहे. रेलटेल 1,000 वाई-फाई स्टेशन्स बनवल्यानंतर पण आपला हाच वेग कायम ठेवणार आहे.

हे देखील वाचा: ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी

विशेष म्हणजे देशात फ्री वाई-फाई सर्विस ने सुसज्ज होणारे पहिले रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल होते तर वाई-फाई झोन मध्ये परावर्तित होणाऱ्या 1,000व्या स्टेशनचा मान पण मुंबईतील रे रोड स्टेशनला मिळाला आहे. अलीकडेच रेलटेल ने टाटा ट्रस्ट सोबत रेल्वे स्टेशन्स वर वाई-फाई सेटअप देण्यासाठी भागीदारी केली आहे. त्यांनी 4,000 पेक्षा पण जास्त भारतीय रेल्वे स्टेशन्सना वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागले आहे ज्यात बी, सी, डी आणि ई कॅटेगरी आहेत.

भारतीय रेल्वेच्या प्रगतीबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच इंडियन रेल्वे ने एक नवीन प्रीमियम राजधानी एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे जी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन आणि मुबंईच्या छत्रपति शिवाजी महाराज ट्रमिनस दरम्यान चालते. हि ट्रेन फक्त देशातील सर्वात फास्ट ट्रेन्स पैकी नसून हिच्यात अत्याधुनिक आणि मनोरंजक टेक्नॉलॉजी पण आहे. प्रवासात इंटरनेट बेनिफिट देण्यासाठी ट्रेन मध्ये वाई-फाई हॉटस्पॉट आहे. हा वाई-फाई प्रवासी कोणताही अतिक्ति शुल्काविना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता. ट्रेनचा या वाई-फाई चा वापर एकावेळी 500 तासांपर्यंत केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे

या ट्रेन मधील टीवी स्क्रीन 3डी ला पण सपोर्ट करते. या स्क्रीन वर 3डी वीडियोज प्ले होतात. आणि हा 3डी कंटेंट बघण्यासाठी ट्रेन स्टॉफ कडून 3डी चष्मे पण दिले जातात. तसेच ​ट्रेन प्रवासात एखादी अडचण आल्यास किंवा प्रवासातील जेवण, सफाई, सर्विस सारख्या गोष्टींचा तुमचा अनुभव कसा होता, हा सर्व फीडबॅक तुम्ही प्रवासातच देऊ शकता. भारतीय रेल्वे ने ‘आप की राय’ मोबाईल ऍप ची सुरवात केली आहे आणि या ऍप मधून तुमच्या प्रतिक्रिया रेल्वे विभागाला देऊ शकता.

फ्री वाई फाई असलेल्या 1,000 रेल्वे स्टोशन्सची संपूर्ण लिस्ट बघण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post खुशखबर : देशातील 1,000 स्टेशन झाले फ्री वाई-फाई ने सुसज्ज, बघा कोणते स्टेशन्स आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/railtel-1000-indian-railway-stations-get-free-wifi-zone/feed/ 0