Galaxy A91 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Dec 2019 12:52:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/#respond Wed, 04 Dec 2019 12:52:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5968 फोटो मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिसत नाही. फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण या रेंडर मध्ये दिसत नाही, आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असू शकतो.

The post Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A91 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आता आम्हाला या फोनचे रेंडर्स मिळाले आहेत, ज्यावरून फोनच्या डिजाइनची सर्व माहिती समोर आली आहे. 91mobiles ने टिप्सटर @OnLeaks सह भागेदारी करून गॅलेक्सी ए91 चे एक्सक्लूसिव रेंडर्स आणि 360-डिग्री वीडियो जारी केला आहे.

रेंडर्स नुसार Galaxy A91 ची फ्रंट डिजाइन लॉन्च झालेल्या Galaxy Note 10 प्रमाणे असेल. फोनच्या फ्रंटला पंच होल डिस्प्ले आणि छोटे बेजल्स असतील. मागे कर्व्ड ग्लास पॅनल आणि स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल किंवा क्वाड कॅमेरा असू शकतो. Galaxy A91 रेंडर्सची डिजाइन जवळपास अपकमिंग Galaxy S11 प्रमाणे वाटत आहे, ज्याचे रेंडर्स काही आठवड्यांपूर्वी समोर आले होते.

रेंडर्स नुसार Galaxy S11 सीरीज आणि Galaxy A91 च्या डिजाइन मध्ये रियर कॅमेरा मॉड्यूल मध्ये थोडासा फरक असेल. टिप्सटर ने Galaxy A91 चे दोन रेंडर्स शेयर केले आहेत. एक रेंडर मध्ये क्वाड आणि दुसऱ्या मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिसत आहे. दोन्ही वर्जन मध्ये चौकोनी कटआउट दिसत आहे.

रेंडर्स नुसार फोनच्या उजव्या बाजूला पावर बटण आणि वॉल्यूम कंट्रोल मेटल फ्रॅम सह येईल. बॉटमला टाइप-सी पोर्ट आणि बाजूला सिंगल स्पीकर ग्रिल असेल. फोटो मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिसत नाही. फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण या रेंडर मध्ये दिसत नाही, आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असू शकतो.

Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्टनुसार Galaxy A91 सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A90 स्मार्टफोनच्या तुलनेत खूप एडवांस आणि पावरफुल असेल. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइटने सांगितले आहे कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. रिपोर्ट पाहता Samsung Galaxy A91 मध्ये Galaxy S10 प्रमाणे पंच होल डिस्प्ले मिळणार नाही.

Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/feed/ 0