Galaxy Fold - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 12 Dec 2019 09:53:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-may-launch-its-new-foldable-galaxy-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-may-launch-its-new-foldable-galaxy-smartphone/#respond Thu, 12 Dec 2019 09:52:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6045 सॅमसंग दरवर्षी आपली फ्लॅगशिप S-सीरीज मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) ट्रेड शो मध्ये अपग्रेड करून सादर करते.

The post 18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने काही दिवसापूर्वी आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन Samsung W20 लॉन्च केला होता. आता नवीन लीक्स मध्ये समोर येत आहे कि तिसऱ्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहे. टिप्सटर Ice Universe ने माहिती दिली आहे कि सॅमसंग आपला हा फोल्डेबल स्मार्टफोन 18 फेब्रुवारी, 2020 लॉन्च करू शकते. या दिवशी कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस Galaxy S11 लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सॅमसंग दरवर्षी आपली फ्लॅगशिप S-सीरीज मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) ट्रेड शो मध्ये अपग्रेड करून सादर करते. साल 2020 मध्ये MWC इवेंट 24 ते 27 फेब्रुवारी पर्यंत असेल. यावर्षी सॅमसंगने आपली Galaxy S10 सीरीज 20 फेब्रुवारीला लॉन्च केली होती. कंपनीने Galaxy S10 सीरीज सोबत कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold पण सादर केला होता.

Samsung Galaxy S11 संबंधित काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आला आहे कि या फोन मध्ये कंपनी सर्वात पावरफुल कॅमेरा देईल. हा फोन कंपनी दमदार झूम सोबत हाई रेजोल्यूशन आणि जास्त अपर्चर ऑप्शन सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे कि Samsung Galaxy S11 मध्ये लो लाइट फोटोग्राफी साठी ट्रेटासेल टेक्नोलॉजी सह नवीन सेंसर दिले जाऊ शकतात. फोन ट्रिपल अपर्चर लेंस सह सादर केला जाऊ शकतो.

कंपनी यात F1.5 आणि F2.4 मध्ये एक नवीन एफ स्टॉप ऍड करू शकते. यासाठी कंपनी कॅमेऱ्यामध्ये नवीन ToF सेंसर सह सुधारित एचडीआर प्रोसेसिंग जोडू शकते. Galaxy S11 बद्दल लीक मध्ये हेच सांगण्यात आले आहे कि हा फोन कंपनी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह पण बनवेल आणि ग्लोबल मार्केटच्या काही बाजारांत हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल.

कदाचित Galaxy S11 मॉडेल्स सोबतच Exynos 9830 टेक बाजारात येऊ शकतो. विशेष म्हणजे Samsung चा सर्वात पावरफुल फोन Galaxy Note 10 एक्सनॉस 9825 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. म्हणजे Samsung Galaxy S11 मध्ये दिला जाणारा एक्सनॉस 9830 चिपसेट Galaxy Note 10 मधील एक्सनॉस 9825 चिपसेटचा अपग्रेडेड वर्जन असेल.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड वीडियो

The post 18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-may-launch-its-new-foldable-galaxy-smartphone/feed/ 0
डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/#respond Tue, 01 Oct 2019 11:58:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5449 हा फोन कंपनीने 1,64,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने आज भारतीय बाजारात आपला Galaxy Fold लॉन्च केला आहे. या अनोख्या डिजाइन सह कंपनीने Galaxy Fold फेब्रुवारीत पहिल्यांदा बाजारात सादर केला होता. काही दिवसांपूर्वी हा डिवाईस कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केला होता.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy Fold कंपनीने 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन कंपनीने 1,64,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच हा 4 ऑक्टोबर पासून प्री-ऑर्डर करता येईल. तसेच भारतीय 20 ऑक्टोबर नंतर डिवाइस डिलिवर होण्यास सुरवात होईल.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोन मध्ये 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन घडी करून छोट्या फोन मध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होते. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा आहेत, जे फोन बॉडी मध्ये बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी आहेत. फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/2.2 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

तर दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनीने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 ते एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तसेच तिसरा सेंसर टलीफोटो आहे. यात 2एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. त्याचबरोबर तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तिथे आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि तो एफ/1.9 अपर्चर वाला आहे.

Samsung Galaxy Fold एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नवीन वनयूआई इंटरफेस वर चालतो. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. यात एक साथ तीन ऍप सह मल्टी टास्किंग करता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटऱ्यांची कपॅसिटी मिळून 4,380एमएएच होते. या दोन्ही बॅटऱ्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतील.

The post डायरी प्रमाणे घडी होणारा Samsung Galaxy Fold भारतात झाला लॉन्च, दोन स्क्रीन आणि 6 कॅमेरे आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-to-launched-in-india/feed/ 0