Galaxy M51 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Aug 2020 13:48:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/#respond Thu, 27 Aug 2020 13:48:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7885 Samsung Galaxy M51 च्या इमेजनुसार फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला जाईल.

The post मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपल्या M-सीरीज मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन Samsung Galaxy M51 लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. आता या फोनच्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण अलीकडेच 91मोबाईल्सने गॅलेक्सी एम51 ची लाइव इमेज एक्सक्लूसिव शेयर केली होती. आता फोन अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर गॅलेक्सी एम51 ‘Meanest Monster Ever’ टॅगलाइन सह दिसला आहे. तसेच फोनची एक माइक्रोसाइट पण बनवण्यात आली आहे. लिस्टिंग वरून समजले आहे कि फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल. तसेच वेबसाइट वर Galaxy M51 साठी ‘Notify Me’ ऑप्शन दिसत आहे. आशा आहे कि फोन सप्टेंबर मध्ये भारतात येईल.

फोन मध्ये फ्रंटला मध्यभागी पंच-होल डिस्प्ले असेल. अमेझॉन इंडिया पेज वर अशी हिंट मिळाली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 7,000mAh ची बॅटरी आणि एक sAMOLED+ डिस्प्ले असेल. तसेच फोन काही दिवसांपूर्वी गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट करण्यात आला होता.

डिजाइन

91मोबाईल्सने अलीकडेच शेयर केलेल्या Samsung Galaxy M51 च्या इमेजनुसार फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच फोनच्या मागच्या पॅनल मध्ये एल शेप क्वाड कॅमेरा असेल. कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश दिला जाईल. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर बटन असेल. बॅक पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नसेल, ज्यावरून आशा व्यक्त करण्यात आली आहे कि फोन मध्ये गॅलेक्सी एम31एस मध्ये दिला जाणारा पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर असेल.

स्पेसिफिकेशन्स

गूगल प्ले कंसोल लिस्टिंग वर सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. या नवीन मिड-रेंज फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल. लिस्टिंगनुसार Samsung फोन मध्ये 8GB रॅम आणि फुल एचडी+ स्क्रीन आणि एंडरॉयड 10 ऑपरोटिंग सिस्टम असेल.

अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 6.67-इंचाचा FHD + sAMOLED + डिस्प्ले असेल जो 60Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच हँडसेट मध्ये मागे 64MP चा क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनची यूएसपी याची विशाल 7,000mAh ची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो

The post मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-micro-website-amazon-availability-india-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/#respond Tue, 24 Mar 2020 14:10:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6882 Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन डिवाईस Samsung Galaxy M21 लॉन्च केला आहे. हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो 6,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. गॅलेक्सी एम21 बाजारात आल्यांनतर आता या सीरीजचा अजून एक नवीन डिवाईस समोर आला आहे ज्याचे नाम Samsung Galaxy M51 सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये या फोनचा फोटो शेयर केला गेला आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाईन सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सर्वात आधी सांगायचे म्हणजे 91मोबाईल्सने पण काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M51 संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी शेयर केली होती ज्यात खुलासा झाला होता कि हा फोन भारतात नोयडा मधील फॅक्टरी मध्ये बनवला जाईल आणि भारतात SM-M515 मॉडेल नंबर सह लॉन्च होईल. आता आनलीक्सने या फोनचा रेंडर वीडियो आणि फोटोज शेयर केले आहेत. Samsung Galaxy M51 लुकच्या बाबतीत सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन Galaxy S10 Lite सारख्या असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M51

गॅलेक्सी एम51 या वीडियो मध्ये पंच-होल डिस्प्ले वर बनलेला असल्याचे दाखवण्यात आले आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा साईड पॅनलशी मिळाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोटो मध्ये Samsung Galaxy M51 चा रियर पॅनल चमकदार दिसत आहे जो ग्लॉस बॉडीसह येऊ शकतो.

Samsung Galaxy M51 च्या रियर पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे आहे जो चौकोनी आकारत आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये उजवीकडे तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेंसरच्या खाली डावीकडे फ्लॅश लाइट आहे ज्याच्या खाली सेंसर व पिक्सलची माहिती आहे. गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅण्डिंग आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या साईड पॅनल्स बद्दल बोलायचे तर फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे आणि याच्या खाली पावर बटण आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. Samsung Galaxy M51 च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे. वीडियो मध्ये या यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर देण्यात आला आहे तर डावीकडे जागा रिकामी आहे.

Samsung Galaxy M21

सॅमसंग गॅलेक्सी एम21 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलाचे तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Samsung Galaxy M21 कंपनीच्या वेबसाइट सोबतच अमेझॉन वर Midnight Blue व Raven Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M51 आला समोर, कमी किंमतीत देईल Galaxy S10 Lite सारखा अनुभव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-render-image-video-leak-design-punch-hole-display-revealed-looks-like-galaxy-s10-lite/feed/ 0