Galaxy S21 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 19 Nov 2020 13:58:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा पावरफुल Galaxy S21 Plus वेबसाइट वर लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट आणि 8 जीबी रॅमचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-with-snapdragon-875-soc-8gb-ram-listed-on-geekbench-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-with-snapdragon-875-soc-8gb-ram-listed-on-geekbench-specs/#respond Thu, 19 Nov 2020 13:58:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9006 Samsung Galaxy S21+ संबंधित लीक्स पाहता बोलले जात आहे कि सॅमसंगचा हा फोन एमोलेड पॅनल वर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करणाऱ्या स्क्रीनला सपोर्ट करेल.

The post Samsung चा पावरफुल Galaxy S21 Plus वेबसाइट वर लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट आणि 8 जीबी रॅमचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S21 सीरीज बाजारात येण्यास वेळ आहे, पण लॉन्चच्या आधी या सीरीजची चर्चा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या लीक्स आणि वेबसाइट लिस्टिंग्स मध्ये या सीरीजचे डिटेल्स समोर येत आहेत ज्यात Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21+ आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा होत आहे. यात आता सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस स्मार्टफोन बेंचमार्क सर्टिफिकेशन वर समोर आला आहे ज्यात फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Samsung Galaxy S21+ बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे जी 16 नोव्हेंबरची आहे. सर्वप्रथम लक्षात असू द्या कि सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरीजचे दोन मॉडेल बाजारात आणते ज्यात एक मॉडेल ‘एक्सनॉस’ चिपसेट असलेला असतो तसेच दुसरा मॉडेल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेटला सपोर्ट करतो. गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एस21+ स्मार्टफोन क्वॉलकॉम प्रोसेसर असलेला मॉडेल सर्टिफाइड झाला आहे. चिपसेट सोबतच इतर पावरफुल स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस अँड्रॉइडच्या नवीन ओएस अँड्रॉइड 11 सह सर्टिफाइड केला गेला आहे. इथे फोन आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे ज्यात मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘Lahaina’ लिहिण्यात आले आहे. हे कोडनेम क्वॉलकॉमच्या आगामी सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 875 चे आहेत. लिस्टिंग मध्ये स्पष्ट झाले आहे Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेटला सपोर्ट करेल. तसेच चर्चा अशी आहे कि फोनचा दुसरा मॉडेल एक्सनॉस 2100 चिपसेट सह लॉन्च होईल.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा

Samsung Galaxy S21 Plus गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच बेंचमार्किंग स्कोर पाहता या फोनला सिंगल-कोर मध्ये 1120 प्वाइंट्स तसेच मल्टी-कोर मध्ये 3319 प्वाइंट्स मिळाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस एक्सनॉस चिपसेट असलेल्या मॉडेलला सिंगल-कोर मध्ये 1040 स्कोर तसेच मल्टी-कोर मध्ये 3107 बेंचमार्क स्कोर मिळाला होता जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट असलेल्या मॉडेलच्या तुलनेत कमी आहे.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21+ संबंधित लीक्स पाहता बोलले जात आहे कि सॅमसंगचा हा फोन एमोलेड पॅनल वर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करणाऱ्या स्क्रीनला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोन मध्ये 6.7 इंचाचा एलटीपीएस फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस21+ एक 5G फोन असेल जो Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.1 सारख्या फीचर्स सह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,800एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर येत आहे. चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस स्मार्टफोन Phantom Silver, Phantom Black आणि Phantom Violet कलर मध्ये बाजारात येईल.

The post Samsung चा पावरफुल Galaxy S21 Plus वेबसाइट वर लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट आणि 8 जीबी रॅमचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-with-snapdragon-875-soc-8gb-ram-listed-on-geekbench-specs/feed/ 0