Gionee M11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Sep 2019 13:58:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/#respond Wed, 04 Sep 2019 13:58:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5223 दोन्ही फोन मध्ये खूप सारखेपणा आहे, फक्त प्रोसेसरच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात आपल्या डिवाइसने ग्राहकांना आकर्षित करणारी कंपनी Gionee गेल्या वर्षी आर्थिक कारणांमुळे डबघाईला आली होती. त्यानंतर कंपनीने आपली अधिकृत वेबसाइट पण बंद केली होती. काही दिवसांपूर्वी कंपनीचे दोन फोन Gionee M11 आणि Gionee M11s सर्टिफिकेशनस साइट वर दिसले होते. त्यामुळे बोलले जात होते कि कंपनी पुन्हा एकदा मार्केट मध्ये येईल. आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीने M11 आणि M11s सादर केले आहेत.

Gionee ने अधिकृतपणे फोन लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही. पण WeChat चॅनल वर M11 आणि M11s ची प्रोमो इमेज पोस्ट करण्यात आली आहे. दोन्ही फोन मध्ये खूप सारखेपणा आहे, फक्त प्रोसेसरच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत. फोनचे सर्व डिटेल्स समोर आले नाहीत.

Gionee M11 आणि M11s मध्ये एक सारखा ग्लास बॅक पॅनल देण्यात आला आहे. तसेच यात डुअल कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Gionee M11 थोडा कमी पावरफुल वेरिएंट वाटत आहे. प्रोमो इमेज मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल. तसेच फोन काही दिवसांपूर्वी सर्टिफिकेशनस साइट टेना वर दिसला होता. M11 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 6.217-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. M11s मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

कंपनीच्या अधिकृत प्रोमो मध्ये Gionee M11/M11s मध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा असेल आणि कॅमेरा सेटअप पाहता यात 16MP चा प्राइमेरी कॅमेरा सेंसर आणि सेकेंडरी कॅमेरा सेंसर 5MP चा असेल. रिपोर्ट नुसार कंपनीने आपल्या अधिकृत WeChat अकाउंटवरून याची माहिती शेयर केली आहे. कंपनीने सध्या आपल्या Weibo अकाउंट आणि ऑफिशियल वेबसाइट वर नवीन स्मार्टफोन्स बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/feed/ 0