Google Pixel 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Android 11 आणि 8GB रॅम सह लॉन्च झाले Google Pixel 5 व Pixel 4A 5G, चायनीज फोन्सना मिळेल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-4a-5g-launch-specifications-features-price/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-4a-5g-launch-specifications-features-price/#respond Thu, 01 Oct 2020 14:34:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8378 दुर्दैवाने Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G भारतात येणार नाहीत.

The post Android 11 आणि 8GB रॅम सह लॉन्च झाले Google Pixel 5 व Pixel 4A 5G, चायनीज फोन्सना मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वातील दिग्गज कंपनी Google ने अखेरीस Pixel सीरीजचा सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G अमेरिकेत आयोजित केले गेलेल्या लॉन्च इवेंट मध्ये सादर केले आहेत. दुर्दैवाने Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G भारतात येणार नाहीत. यासाठी भारतात ग्राहकांना फक्त Google Pixel 4a ची वाट बघावी लागेल. पिक्सल 4ए पाहता हा फोन भारतात 17 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल. फोनचा सेल Flipkart वर केला जाईल.

डिजाइन

Pixel 5 आणि Pixel 4a 5G ची डिजाइन तर एकसारखी आहे. दोन्ही पंच-होल डिस्प्ले सह सादर केले गेले आहेत. हा होल-पंच फ्रंटला उजवीकडे टॉपला आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पंच-होल डिस्प्लेमुळे डिवाइसच्या तीन कडा बेजल लेस आहेत. बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. सोबत बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहेत. मागे उजवीकडे वरच्या बाजूला चौकोनी आकारात डुअल कॅमेरा सेटअप आहे जसा पिक्सल 4ए मध्ये होता. या सेटअप मध्ये डुअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश लाइट आहे. सेटअपच्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॉटमला गूगलची ब्रांडिंगची मिळेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G मध्ये डिस्प्लेचा फरक आहे. पिक्सल 5 स्मार्टफोन मध्ये 6-इंचाचा एचडी प्लस ओएलईडी (1,080×2,340 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात आस्पेक्ट रेश्यो 19:5:9 आहे. तसेच डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी 432ppi आणि प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 चे प्रोटेक्शन आहे. सोबत फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. दुसरीकडे पिक्सल 4ए 5G कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि 60Hz रिफ्रेश रेट सह 6.2-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

दोन्ही स्मार्टफोन मध्ये परफॉर्मेंससाठी स्नॅपड्रॅगॉन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगॉन 765जी क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 800 सीरीज प्रोसेसर पेक्षा कमी पावरफुल आहे, पण हा परफॉर्मेंसच्या बाबतीत शानदार एक्सपीरियंस देईल. तसेच फोन मध्ये पिक्सल 5 मध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 4ए 5जी मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.

फोन्स डुअल-सिम (नॅनो + ई-सिम)ला सपोर्ट असलेला हे स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतात जी गूगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोन्स मध्ये कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाई-फाई 802.11ac, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. बोर्ड वर सेंसर मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, बॅरोमीटर, जाइरोस्कोप आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. तसेच यात स्टीरियो स्पीकर आणि तीन माइक्रोफोन पण आहेत.

फोटोग्राफीसाठी Google Pixel 5 आणि Pixel 4A च्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये f/1.7 अपर्चर असलेला 12.2MP प्राइमरी सेंसर आणि अपर्चर f/2.2 असलेली 16MP सेकेंडरी सेंसर अल्ट्रा वाइड लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन्स फ्रंट मध्ये अपर्चर f/2.0 असलेला 8MP चा कॅमेरा आहे. फ्रंट आणि मागे दोन्ही कॅमेरा 4K वीडियो रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

बॅटरीच्या बाबतीत पण दोन्ही फोन वेगळे आहेत. पिक्सल 5 मध्ये बॅटरी 4,080mAh ची आहे आणि इथे 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट पण देण्यात आला आहे. हा फोन वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग दोन्हीला सपोर्ट करतो. पिक्सल 4ए मध्ये 3800mAh ची छोटी बॅटरी देण्यात आली आहे. पण इथे 18W फास्ट चार्जिंग टेकला सपोर्ट देण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Google Pixel 5 ची सुरवाती किंमत $699 (जवळपास 51,400 रुपये) आहे. Google Pixel 4a 5G ची सुरवाती किंमत 499 (जवळपास 37,000 रुपये) आहे. दोन्ही फोन्स 5G मार्केट्स- ऑस्ट्रेलिया, कनाडा, फ्रांस, जर्मनी, आयर्लंड, जापान, ताइवान, UK आणि UK पर्यंतच मर्यादित असतील.

Pixel 4a 5G सर्वात पहले जापान मध्ये 15 ऑक्टोबरला येईल आणि नोव्हेंबर पासून हा दुसऱ्या देशांमध्ये उपलब्ध होईल. दुसरीकडे Pixel 5 15 ऑक्टोबर पासून सर्व 9 देशांमध्ये उपलब्ध होईल. फोनचा जस्ट ब्लॅक आणि सोर्टा सेज कलर ऑप्शन सादर केला गेला आहे.

The post Android 11 आणि 8GB रॅम सह लॉन्च झाले Google Pixel 5 व Pixel 4A 5G, चायनीज फोन्सना मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-4a-5g-launch-specifications-features-price/feed/ 0
Google Pixel 5 च्या लॉन्चच्या आधी समोर आली ऑफिशियल किंमत, जाणून घ्या कधी होईल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-price-leak-on-japan-website-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-price-leak-on-japan-website-launch-soon/#respond Mon, 28 Sep 2020 13:32:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8331 9to5Google ने हि लिस्टिंग बघितली होती. रिपोर्टनुसार नवीन Google Pixel 5 74,800 Yen (जवळपास 52,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल.

The post Google Pixel 5 च्या लॉन्चच्या आधी समोर आली ऑफिशियल किंमत, जाणून घ्या कधी होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google च्या अपकमिंग Pixel डिवाइसची वाट अनेक दिवसांपासून बघितली जात आहे. माहितीनुसार Pixel लॉन्च इवेंट आगामी 30 सप्टेंबर 2020 ला होईल. पण आता लीक्सटर जॉन प्रॉसरने शेयर केलेल्या लीक मध्ये सांगितले आहे कि Google Pixel 5 ची फक्त प्री-ऑर्डरचा 30 सप्टेंबर पासून सुटू होईल. तसेच फोनचा ऑफिशल लॉन्च 15 ऑक्टोबरला होईल आणि बायर्सना ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत नवीन फोनसाठी वाट बघावी लागेल. पण दुसरीकडे Google च्या एका चुकीमुळे लॉन्चच्या आधी Gooel Pixel 5 स्मार्टफोनची किंमत आणि डिजाइन समोर आली आहे.

Google सध्या Google Pixel 5 आणि Google Pixel 4a 5G स्मार्टफोनचे प्रमोशन करत आहे. याचा प्रमोशन मध्ये कंपनीने चुकून गूगल जापानच्या ऑफिशियल साइट वर Google Pixel 5 चा एक वीडियो पोस्ट केला, ज्यात Google Pixel 5 च्या फ्रंट पॅनलची डिजाइन आणि फोनची किंमत दाखवण्यात आली होती. हा वीडियो नंतर काढून टाकण्यात आला होता.

किंमत

पण, 9to5Google ने हि लिस्टिंग बघितली होती. रिपोर्टनुसार नवीन Google Pixel 5 74,800 Yen (जवळपास 52,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तसेच लीक वीडियो वरून फोनच्या संपूर्ण डिजाइन बाबत माहिती मिळाली नाही. पण अशी आशा व्यक्त केली जात आहे कि Google Pixel 5 अलीकडेच लॉन्च झालेल्या Google Pixel 4A च्या डिजाइन मध्ये सादर केला जाऊ शकतो. लीक वीडियो मध्ये Google Pixel 5 5G कनेक्टिविटी सह सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Pixel 5 बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6-इंचाचा 90Hz OLED पॅनल मिळू शकतो जो गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन सह येईल. हँडसेट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G 5G चिपसेट दिला जाईल. तसेच फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह येऊ शकतो. तसेच Pixel 4A 5G अलीकडेच लॉन्च झालेल्या किफायतशीर Pixel 4A चा 5G सपॉर्ट असलेला मॉडेल असेल.

Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G भारतात येणार नाहीत. त्यामुळे भारतात ग्राहकांना फक्त Google Pixel 4a ची वाट बघावी लागेल. हा फोन भारतात ऑक्टोबर मध्ये Flipkart वर विक्रीसाठी येऊ शकतो.

The post Google Pixel 5 च्या लॉन्चच्या आधी समोर आली ऑफिशियल किंमत, जाणून घ्या कधी होईल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-price-leak-on-japan-website-launch-soon/feed/ 0
Google करत आहे 30 सप्टेंबरला मोठ्या ईवेंटचे आयोजन, Google Pixel 5 सह लॉन्च होतील अनेक स्मार्ट प्रोडक्ट्स https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-chromecast-smart-nest-speaker-to-launch-on-30-september/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-chromecast-smart-nest-speaker-to-launch-on-30-september/#respond Tue, 15 Sep 2020 13:32:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8159 Pixel 5 स्मार्टफोन 5G सपोर्ट सह येईल पण हा फोन भारतात लॉन्च होईल किंवा नाही याची ठोस माहिती मिळालेली नाही.

The post Google करत आहे 30 सप्टेंबरला मोठ्या ईवेंटचे आयोजन, Google Pixel 5 सह लॉन्च होतील अनेक स्मार्ट प्रोडक्ट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने गेल्या महिन्यात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत टेक विश्वात मिड बजेट पिक्सल फोन घेऊन येत Google Pixel 4a लॉन्च केला होता. ग्लोबल मार्केट मध्ये फोन लॉन्च करताना गूगलने अशी घोषणा पण केली होती कि लवकरच अजून दोन नवीन पिक्सल फोन पण Google Pixel 4a 5G आणि Google Pixel 5 नावाने बाजारात पदार्पण करतील. गूगलने आता अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 30 सप्टेंबरला आपले नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे.

Google ने लॉन्च इन्वाईट शेयर करत सांगितले आहे कि कपंनी येत्या 30 सप्टेंबरला एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे. या मंचावरून कंपनीचे नवीन पिक्सल फोन व इतर प्रोडक्ट्स सादर केले जातील. गूगलचा हा ईवेंट ऑनलाइन प्रक्षेपित केला जाईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा एक वर्चुअल ईवेंट असेल जो तुम्ही तुमच्या मोबाईल वर लाईव बघू शकता.

गूगलने स्पष्टपणे सांगितले नाही कि 30 सप्टेंबरला आयोजित होणाऱ्या या ईवेंट मध्ये कोणते प्रोडक्ट्स लॉन्च केले जातील. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार यादिवशी Google Pixel 5 स्मार्टफोन आणि त्यासोबत नवीन Chromecast तसेच नवीन nest speaker पण सादर केला जाऊ शकतो. Pixel 5 स्मार्टफोन 5G सपोर्ट सह येईल पण हा फोन भारतात लॉन्च होईल किंवा नाही याची ठोस माहिती मिळालेली नाही.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: येत आहे Google चा स्वस्त फोन Pixel 5s, लॉन्चच्या आधी बघा डिजाइन

Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Xiaomi ने आणला स्वस्त Redmi 9i स्मार्टफोन, Realme च्या अडचणीत वाढ

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. ज्याची किंमत $349 डॉलर म्हणजे जवळपास 26,300 रुपये आहे. फोनची भारतातील किंमत समोर आली नाही.

The post Google करत आहे 30 सप्टेंबरला मोठ्या ईवेंटचे आयोजन, Google Pixel 5 सह लॉन्च होतील अनेक स्मार्ट प्रोडक्ट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5-chromecast-smart-nest-speaker-to-launch-on-30-september/feed/ 0
येत आहे Google चा स्वस्त फोन Pixel 5s, लॉन्चच्या आधी बघा डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5s-live-images-reveal-complete-design-in-full-glory-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5s-live-images-reveal-complete-design-in-full-glory-launch-soon/#respond Thu, 10 Sep 2020 13:09:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8082 मेक्सिकन रेडियो पर्सनालिटी @japonton ने ट्विटर वर Google Pixel 5s चे फोटो शेअर केले आहेत.

The post येत आहे Google चा स्वस्त फोन Pixel 5s, लॉन्चच्या आधी बघा डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी ऑगस्ट मध्ये गूगलने पिक्सल 4ए लॉन्च करताना Pixel 5 and Pixel 4a 5G ची घोषणा केली होती, जे यावर्षीच्या शेवट पर्यंत लॉन्च केले जाऊ शकतात. हे फोन्स भारतात नाही तर अमेरिका आणि इतर ठिकाणी लॉन्च केले जातील. आता पिक्सल 5 सीरीज मधील अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे. गूगल पिक्सल 5एस नावाच्या या फोनचे काही फोटो इंटरनेट वर लीक झाले आहेत, असे वाटत आहे कि कंपनी हा फोन कमी किंमतीत सादर केला जाईल.

मेक्सिकन रेडियो पर्सनालिटी @japonton ने ट्विटर वर गूगल पिक्सल 5एस चे फोटो शेअर केले आहेत. फोटोज मध्ये फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. या फोटोजनुसार डिवाइसच्या फ्रंटला डाव्या कोपऱ्यावर पंच होल असेल. तसेच मागे डाव्या बाजूला चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आणि मध्यभागी फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. एका फोटो मध्ये 5एस असे नाव दिसत आहे, ज्यावरून वाटत आहे कि हा फोन गूगल पिक्सल 5एस नावाने सादर केला जाईल. हा फोन कधी येईल कंपनीने याची माहिती मात्र दिलेली नाही.

Pixel 5

काही दिवसांपूर्वी पिक्सल 5 बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये दिसला होता. लिस्टिंग नुसार Google Pixel 5 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G 5G चिपसेट दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम असेल. गेल्यावर्षी कंपनीने Google Pixel 4 आणि Pixel 4 XL स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह सादर केला होता. बेंचमार्किंग लिस्टिंग वरून वाटत आहे कि कंपनी अपकमिंग पिक्सल 5 मध्ये प्रीमियम हाई-एंड स्पेसिफिकेशन्स देणार नाही. Google Pixel 5 च्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बाबत अजून माहिती येणे बाकी आहे. Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G भारतात येणार नाहीत. त्यामुळे भारतीयांना फक्त Google Pixel 4a ची वाट बघावी लागेल. पिक्सल 4ए बद्दल बोलायचे तर हा फोन भारतात ऑक्टोबर मध्ये Flipkart वर विक्रीसाठी येऊ शकतो.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए मध्ये 5.81 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालतो. डिवाइस मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट आहे. फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट सह सादर केला गेला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट, एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारख्या फीचर्स सह येतो. हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला होता.

The post येत आहे Google चा स्वस्त फोन Pixel 5s, लॉन्चच्या आधी बघा डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-5s-live-images-reveal-complete-design-in-full-glory-launch-soon/feed/ 0
Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/#respond Tue, 04 Aug 2020 09:52:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7736 Google Pixel 4a ची किंमत पाहता हा फोन $349 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,300 रुपयांच्या आसपास आहे.

The post Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google Pixel 4a फोन येणार आहे, हि चर्चा अनेक दिवस चालू होती. जेव्हापासून समजले आहे कि गूगल आपला हा पिक्सल फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये नव्हे तर मिड बजेट मध्ये सादर करेल, तेव्हापासून भारतीय फॅन्स पण या फोनची वाट बघत आहेत. स्मार्टफोन्स यूजर्सची प्रतीक्षा संपवत गूगलने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन सादर केला आहे. Google Pixel 4a अधिकृतपणे टेक मंचावर सादर केला आहे. फक्त पिक्सल 4ए नाही तर त्या सोबत कंपनीने Google Pixel 4a 5G आणि Google Pixel 5 ची पण घोषणा केली आहे.

किंमत व विक्री

सर्वात आधी Google Pixel 4a ची किंमत पाहता हा फोन $349 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,300 रुपयांच्या आसपास आहे. गूगल पिक्सल 4ए सध्या अमेरिकन बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे तर फोनची विक्री 20 ऑगस्ट पासून सुरु होईल. तसेच भारतात फोनची लॉन्च डेट सध्या समोर आली नाही पण फोनची विक्री भारतात ऑक्टोबर मध्ये होईल. येत्या काही दिवसांत हा फोन भारतात पण प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

गूगल पिक्सल 4ए वीडियो

The post Google ने लॉन्च केला पावरफुल फीचर्स आणि स्वस्त Pixel 4a स्मार्टफोन, Pixel 5 ची पण झाली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4a-5g-announced-price-specs-sale-pixel-5/feed/ 0