Google Pixel 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 05 Oct 2023 15:10:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro झाले लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-8-and-pixel-8-pro-price-specification-sale-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-8-and-pixel-8-pro-price-specification-sale-in-india/#respond Thu, 05 Oct 2023 15:10:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22645 Google नं आपल्या नवीन स्मार्टफोन्सवरील पडदा हटवत नवीन ‘पिक्सल 8’ सीरीज सादर केली आहे. कंपनीनं Pixel 8 आणि Pixel 8 Pro लाँच केले आहेत जे स्टायलिश लुक, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही गुगल पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रोची किंमत व सेलसह दोन्ही स्मार्टफोन्सची संपूर्ण माहिती वाचू शकता. Google Pixel […]

The post Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro झाले लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google नं आपल्या नवीन स्मार्टफोन्सवरील पडदा हटवत नवीन ‘पिक्सल 8’ सीरीज सादर केली आहे. कंपनीनं Pixel 8 आणि Pixel 8 Pro लाँच केले आहेत जे स्टायलिश लुक, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही गुगल पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रोची किंमत व सेलसह दोन्ही स्मार्टफोन्सची संपूर्ण माहिती वाचू शकता.

Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro ची किंमत

गुगल पिक्सल 8 ची किंमत 75,999 रुपये आहे ज्यात 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळते. तसेच गुगल पिक्सल 8 प्रोची किंमत 1,06,999 रुपये आहे व 12जीबी रॅम 128जीबी स्टोरेजसह येतो. दोन्ही Google Phone फ्लिपकार्टवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत त्यांची विक्री 14 ऑक्टोबरपासून सुरु होईल.

Google Pixel 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन: पिक्सल 8 प्रो मध्ये 1344 x 2992 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही ऑलवेज ऑन स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.
  • प्रोसेसर: हा गुगल फोन टेंसर जी3 चिपसेटवर सादर करण्यात आला आहे जो टायटन एम2 सिक्योरिटी मायक्रोप्रोसेसरसह चालतो.
  • ओएस: Pixel 8 Pro अँड्रॉइड 14 वर सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पहिला मोबाइल आहे जो नवीन अँड्रॉइड ओएससह मार्केटमध्ये आला आहे. हा फोन 7 वर्षांच्या ओएस अपडेटसह आला आहे जो पुढील अनेक वर्ष नवीन अँड्रॉइड व्हर्जनवर चालत राहील.
  • कॅमेरा: हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स, 48 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 30एक्स झूम असलेला 48 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 10.5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी: गुगल पिक्सल 8 प्रो मध्ये 5,050एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते. ह्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

Google Pixel 8 स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन: गुगल पिक्सल 8 स्मार्टफोन 6.2 इंचाच्या पंच-होल फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ह्या ऑलवेज ऑन स्क्रीनवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2000निट्स ब्राइटनेस तसेच गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. ह्यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.
  • प्रोसेसर: पिक्सल 8 मध्ये देखील टायटन एम2 सिक्योरिटी मायक्रोप्रोसेसरसह चालणार टेंसर जी3 चिपसेट देण्यात आला आहे.
  • ओएस: हा गुगल फोन देखील अँड्रॉइड 14 वर सादर करण्यात आला आहे. जो 7 वर्षांच्या ओएस अपडेट, सिक्योरिटी अपडेट तसेच फीचर ड्रॉप अपडेटला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा: हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर मिळतो. ह्या फोनच्या फ्रंट पॅनलवर 10.5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

    बॅटरी: पावर बॅकअपसाठी गुगल पिक्सल 8 स्मार्टफोनमध्ये 4,575एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 27वॉट फास्ट चार्जिंग आणि 18वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

The post Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro झाले लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-8-and-pixel-8-pro-price-specification-sale-in-india/feed/ 0