Google Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Feb 2020 12:35:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/#respond Thu, 13 Feb 2020 12:35:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6585 WhatsApp ने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेसबुकच्या मालकीच्या इंस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने पुन्हा एकदा मोठा रेकॉर्ड केला आहे. व्हाट्सऍपने घोषणा केली आहे कि जगभरात त्यांचे आता 2 अब्ज पेक्षा जास्त यूजर्स झाले आहेत. पण ऍक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत व्हाट्सऍप अजूनही फेसबुकच्या खूप मागे आहे. दोन वर्षांपूर्वी व्हाट्सऍपने सांगितले होते कि त्यांच्या यूजर्सची संख्या 1.5 अब्ज आहे. तर जून 2017 मध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या 2 अब्जांपेक्षा जास्त होती.

व्हाट्सऍपने अजूनतरी सांगितले नाही कि भारतात व्हाट्सऍप यूजर्सची संख्या किती आहे. गेल्यावर्षी जुलै मध्ये भारतात व्हाट्सऍपच्या यूजर्स की संख्या 40 कोटी झाली होती. तसेच व्हाट्सऍपसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

जगभरात 2 अब्ज यूजर्स असलेल्या या इंस्टंट मेसेजिंग ऍपलिकेशन बद्दल बोलायचे झाले तर व्हाट्सऍप याबाबतीत टॉपला आहे. एका रिपोर्ट नुसार, 2022 पर्यंत फोन बेस्ड ओवर-द-टॉप (OTT) मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सची संख्या 3 अब्ज होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे कि व्हाट्सऍप वर डार्क मोड येत आहे. आणि व्हाट्सऍपने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे. तसेच अजूनही काही फीचर्स व्हाट्सऍप मध्ये आले आहेत.

विशेष म्हणजे व्हाट्सऍप पूर्णपणे फ्री ऍप आहे. तसेच या ऍप वर कोणतीही जाहिरात यूजर्सना त्रास देत नाही पण असे बोलले जात आहे कि आता हे बदलणार आहे. जगात हा ऍप खूप लोकप्रिय आहे. व्हाट्सऍप जगातील सर्वात जास्त वापरला जाणारी चॅट सेवा आहे. वेळोवेळी कंपनी आपल्या यूजर्सच्या गरजेनुसार नवीन फीचर्स देत असते.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/feed/ 0