Honda - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 05:11:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 दोन बॅटरीजसह होऊ शकते Honda Electric Scooter ची एंट्री; लाँचपूर्वीच दिसली Honda BENLY e बाईक https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-u-go-may-launch-india-know-everything-before-goes-official/ https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-u-go-may-launch-india-know-everything-before-goes-official/#respond Mon, 04 Jul 2022 13:47:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11107 Honda BENLY e इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंग दरम्यान Zigwheels द्वारे बेंगळुरूमध्ये स्पॉट करण्यात आली आहे.

The post दोन बॅटरीजसह होऊ शकते Honda Electric Scooter ची एंट्री; लाँचपूर्वीच दिसली Honda BENLY e बाईक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस Honda BENLY e electric scooter च्या भारतीय लाँचच्या बातम्या येत आहेत. परंतु कंपनीनं मात्र आपल्या या आगामी इलेक्ट्रिक स्कुटरची कोणतीही अधिकृत माहिती शेयर केलेली नाही. लीक्स आणि रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे की लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होऊ शकतो. आता Honda BENLY e बेंगळुरूमध्ये टेस्टिंग सुरु अस्तंत दिसली आहे. ही एक B2B service scooter असेल आणि यात Honda ची swappable battery technology देण्यात येईल, त्यामुळे मोठ्या चार्जिंग टाइमची काळजी करावी लागणार नाही.

Honda इलेक्ट्रिक स्कूटरचं पेटंट

भारतातील ईव्ही सेगमेंटमध्ये पदार्पण करण्याची होंडाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील लीक आणि अफवांमधून कंपनीच्या एका ई-स्कूटरची माहिती समोर आली होती. होंडा अ‍ॅक्टिवा ई नावाच्या स्कुटरवर कंपनी काम करत असल्याची माहिती आली होती. अलीकडेच होंडानं भारतात होंडा यू-गो ई-स्कूटरसाठी पेटंट दाखल केलं होतं.

Honda BENLY e लवकरच होईल लाँच

Honda BENLY e इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंग दरम्यान Zigwheels द्वारे बेंगळुरूमध्ये स्पॉट करण्यात आली आहे. टेस्टिंगमध्ये ही स्कुटर दिसण्याची ही दुसरी वेळ आहे, ही विशेष बाब आहे. याआधी आलेल्या माहितीनुसार, होंडा आपली स्वॅपेबल बॅटरी टेक्नॉलॉजीची टेस्टिंग करण्यासाठी टेस्टिंग उपकरण म्हणून BENLY e इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करत आहे.

अशी असेल डिजाइन

BENLY e स्कूटर टेस्टिंग मध्ये हिरव्या आणि सफेद रंगाच्या रजिस्टर्ड नंबर प्लेटसह रस्त्यावर दिसली होती. ऑटो साईट रशलेनच्या तपासमधून समोर आलं की ही स्कुटर होंडा मोटरसायकल अँड स्कूटरच्या नावे भारतात रजिस्टर आहे. तसेच, ज्या आरटीओद्वारे वाहन रजिस्टर करण्यात आलं आहे त्या जयनगरच्या आरटीओचा कोड केए 05 आहे.

एक नव्हे दोन दोन बॅटरीज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर

BENLY e स्कूटर ट्विन बॅटरी पॅकसह येईल, प्रत्येक बॅटरीचा क्षमता 0.99kWh इति असेल. या दोन्ही बॅटरीजची अदलाबदल करता येईल, त्यामुळे रायडर फक्त एका मिनिटांत चार्ज झालेली स्कूटर वापरता येईल. रायडरला फक्त आपली रिकामी झालेली बॅटरी चार्जिंग डॉकमध्ये ठेवावी लागेल आणि फुल चार्ज असलेली बॅटरी त्याला घेता येईल. त्यामुळे जास्त वेळ न दवडता रायडर पुढील प्रवासासाठी निघू शकतो. तसेच होंडाच्या स्वॅपेबल बॅटरी टेस्टिंग बाबत बोलले जात आहे की होंडानं एचपीसीएल आणि बेंगळुरू मेट्रोसह स्वॅपेबल बॅटरी स्टेशनची स्थापन केली आहे. स्टेशन दुचाकी आणि तिचाकी गाड्यांसाठी बनवण्यात येईल. या बॅटरी स्वॅपिंग स्टेशनची सुरुवात मे 2022 मध्ये केली जाण्याची शक्यता आहे. होंडानं महाराष्ट्रात ठाणे येथे 2021 मध्ये एक पायलट प्रोग्रॅम देखील आयोजित आहे.

The post दोन बॅटरीजसह होऊ शकते Honda Electric Scooter ची एंट्री; लाँचपूर्वीच दिसली Honda BENLY e बाईक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-u-go-may-launch-india-know-everything-before-goes-official/feed/ 0