Honor 10 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Jan 2019 12:27:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 24-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड पाई आणि नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला ऑनर 10 लाइट, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-launched-in-india-with-notch-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-launched-in-india-with-notch-display-in-marathi/#respond Tue, 15 Jan 2019 12:27:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3384 ऑनर 10 लाइट सोबत रिलायंस जियो कडून 2,200 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

The post 24-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड पाई आणि नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला ऑनर 10 लाइट, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवईच्या सब-ब्रँड ऑनर ने आज भारतात यावर्षीचा आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो ऑनर 10 लाइट नावाने सादर केला गेला आहे. ऑफिशियल लॉन्चच्या आधी डिवाइस ई-कॉमर्स वेवबसाइट फ्लिपकार्ट वर लिस्ट केला गेल होता. नावावरूनच समजते कि डिवाइस गेल्या वर्षी लॉन्च ऑनर 9 लाइटचा अपग्रेडेड वर्जन आहे. ऑनर 10 लाइटची बेस किंमत 13,999 रुपये आहे आणि हा फोन 20 जानेवारी पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि ऑनर इंडियाच्या वेबसाइट वर दुपारी 12 वाजता सेल साठी येईल.

ऑनर 10 लाइट ची किंमत
ऑनर 10 लाइट कंपनी ने भारतात तीन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. यात 4जीबी रॅम/ 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. तसेच ऑनर 10 लाइट सोबत रिलायंस जियो कडून 2,200 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

ऑनर 10 लाइट मध्ये कंपनी ने वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला आहे, ज्यात तुम्हाला सेल्फी कॅमेरा मिळेल. ऑनर ने हा स्मार्टफोन आधी चीन मध्ये लॉन्च केला आहे. ऑनर 10 लाइट चे सर्वात मोठे फीचर एआई (आर्टिफिशल इंटेलिजेंस) असलेला 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात 8 वेगवेगळे मोड पण देण्यात आले आहेत. एआई च्या मदतीने क्लिक केलेले फोटो ओवरएक्सपोज्ड होणार नाहीत आणि रंग पण चांगले येतील.

ऑनर 10 लाइट स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.21-इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले आणि एक छोटी वाटर ड्रॉप नॉच आहे. तसेच ऑनर 10 लाइट हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट वर आधारित आहे. हा कंपनीचा एक मिड-रेंज प्रोसेसर आहे जो हुआवई ने बनवला आहे. डिवाइस मध्ये दोन सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एक साथ दोन सिम आणि गरज पडल्यास माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता.

फोटोग्राफी साठी डिवाइस मध्ये 13-मेगापिक्सल रियर सेंसर आणि 2-मेगापिक्सल डेप्थ यूनिट आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये फीचर एआई (आर्टिफिशल इंटेलिजेंस) असलेला 24-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई बेस्ड ईएमयूआई 9.0 कस्टम स्किन वर चालते. बॅटरी बॅकअप साठी फोन मध्ये 3,320एमएएच ची बॅटरी आहे.

ऑनर 10 लाइट मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून डुअल 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ 4.2 एलई, वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन/एसी, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि ग्लोनास आहेत. तसेच याचे डाइमेंशन 154.8×73.64×7.95 मिलीमीटर आहे आणि वजन 162 ग्राम आहे.

The post 24-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड पाई आणि नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला ऑनर 10 लाइट, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-launched-in-india-with-notch-display-in-marathi/feed/ 0
‘O’ शेप नॉच सह लॉन्च होईल आॅनर वी20, फोनचा फोटो झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/honor-v20-display-image-leaked-waterdrop-notch-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-v20-display-image-leaked-waterdrop-notch-specifications-in-marathi/#respond Thu, 15 Nov 2018 13:57:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2874 आॅनर वी20 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करण्यात आला आहे तिथे फोनचे कोडनेम प्रिंसटोन आहे.

The post ‘O’ शेप नॉच सह लॉन्च होईल आॅनर वी20, फोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर बद्दल कालच बातमी आली होती कि कंपनी येत्या 21 नोव्हेंबरला टेक मंचावर आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लाइट सादर करणार आहे. आॅनर हा फोन सर्वात आधी चीन मध्ये सादर करणार आहे आणि यासाठी कंपनी ने मीडिया इन्वाईट पाठवणे पण सुरु केले आहे. आॅनर 10 लाइटच्या लॉन्चच्या आधीच आता या कंपनीच्या अजून एका स्मार्टफोनचा लीक समोर आला आहे. नवीन लीक मध्ये आॅनर च्या आगामी स्मार्टफोनचा डिस्प्ले दाखवण्यात आला आहे तसेच फोनचे नाव आॅनर वी20 सांगण्यात आले आहे.

आॅनर वी20 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करण्यात आला आहे तिथे फोनचे कोडनेम प्रिंसटोन आहे. या वेबसाइट वर आॅनर वी20 चा डिस्प्ले पॅनल शेयर करण्यात आला आहे ज्यावरुन फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. लीक झालेल्या फोटो मध्ये आॅनर वी20 मध्ये छोटीशी ‘ओ’ शेप वॉटरड्रॉप नॉच दाखववण्यात आली आहे. या नॉच मध्येच सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर कुठेच कोणताही सेंसर व फिजिकल बटण दिसत नाही.

Honor V10

लीक नुसार आॅनर वी20 6.4-इंचाच्या सुपर फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाईल. आॅनर वी20 च्या डिस्प्ले मध्ये खूपच नॅरो बेजल्स दाखवण्यात आले आहेत. लीकनुसार आॅनर चा हा फोन आईपी रेटिंग सह लॉन्च होईल, म्हणजे हा फोन वॉटर प्रूफ असेल. बोलले जात आहे कि आॅनर वी20 कंपनी हुआवई च्या पावरफुल चिपसेट किरीन 980 सह बाजरात येईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 22.5 वॉल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण दिला जाऊ शकतो.

आॅनर कडून अजूनतरी वी20 स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण एवढे निश्चित आहे कि आॅनर चा हा फोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच पुढल्या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या आॅनर 10 लाइट बद्दल बोलायचे तर हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल सोबत हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. आॅनर 10 लाइट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण असेल.

आॅनर 10 लाइट च्या स्पेसिफिकेशन्स साठी 21 नोव्हेंबर ची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. चीन मध्ये लॉन्च झाल्यावर भारतात हा फोन यायला थोडा वेळ लागू शकतो.

The post ‘O’ शेप नॉच सह लॉन्च होईल आॅनर वी20, फोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-v20-display-image-leaked-waterdrop-notch-specifications-in-marathi/feed/ 0
21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/#respond Tue, 13 Nov 2018 14:41:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2842 आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात यायला या फोनला थोडा वेळ लागू शकतो.

The post 21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ची सब ब्रँड कंपनी आॅनर ने याच वर्षी मी महिन्यात आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस आॅनर 10 भारतात लॉन्च केला होता. हा फोन कंपनी ने नॉच डिस्प्ले सह सादर केला होता जो 32,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. स्टाइलिश लुक असलेल्या आॅनर 10 नंतर आता कंपनी आपल्या फॅन्सना अजून एक नवीन भेट देण्याची तयारी करत आहे. आॅनर येत्या 21 नोव्हेंबरला आॅनर 10 चा नवीन वर्जन आॅनर 10 लाइट नावाने अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर करणार आहे.

आॅनर ने घोषणा केली आहे कि कंपनी 21 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 10 लाइट टेक मंचावर सादर करेल. आॅनर ने सांगितले कि नोव्हेंबरच्या 21 तारखेला चीन मधील बीजिंग शहरात कपंनी एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून आॅनर 10 लाइट टेक बाजारात येईल. नावावरून समजतेच कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन आॅनर 10 चा छोटा वर्जन असेल जो स्वस्तात सेल साठी उपलब्ध होईल.

Honor 10 lite

कंपनी ने अजूनतरी आॅनर 10 लाइटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही. पण वेगवेगळ्या विभिन्न मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि आॅनर 10 लाइट एंडरॉयड ओरियो वर सादर केला जाईल सोबतच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. आॅनर 10 लाइट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल.

आॅनर 10 लाइट च्या स्पेसिफिकेशन्स साठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे. एवढे निश्चित कि आॅनर 10 प्रमाणे हा फोन स्टालिश व आर्कषक ​लुक तसेच डिजाईन सह लॉन्च होईल. आशा आहे कि आॅनर 10 लाइट 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. पण चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारतात यायला या फोनला थोडा वेळ लागू शकतो.

The post 21 नोव्हेंबरला लॉन्च होईल आॅनर 10 लाइट, दमदार स्पेसिफिकेशन्स सह असेल शानदार स्टाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10-lite-to-launch-on-21-november-specification-in-marathi/feed/ 0