Honor 7s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Sep 2018 09:55:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी-रियलमी ला टक्कर देण्यासाठी आला आॅनर 7एस, फक्त 6,999 रुपयांमध्ये देईल शानदार स्पेसिफिकेशन्स आणि आर्कषक लुक https://www.91mobiles.com/marathi/honor-7s-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-7s-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/#respond Tue, 04 Sep 2018 09:55:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1939 कंपनी ने आॅनर 7एस ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला आहे जो 14 सप्टेंबर पासून 6,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post शाओमी-रियलमी ला टक्कर देण्यासाठी आला आॅनर 7एस, फक्त 6,999 रुपयांमध्ये देईल शानदार स्पेसिफिकेशन्स आणि आर्कषक लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर कंपनी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एका पाठोपाठ एक स्मार्टफोन लॉन्च करत आहे. मीड बजेट फोन ते स्वस्त डिवाईस वाल्या सेग्मेंट मध्ये आॅनर ने आपली उपस्थिती दर्शविली आहे. काही दिवसांपूर्वी आॅनर प्ले आणि आॅनर 9एन देशात लॉन्च केल्या नंतर कंपनी ने आज आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 7एस पण बाजारात आणला आहे. आॅनर ने आॅनर 7एस 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 14 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

आॅनर 7एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सह सादर करण्यात आला आहे ​जो क्वॉड-कोर प्रोसेसर सोबत मीडियाटेक एमटी6739 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये पावरवीआर जीई8100 जीपीयू देण्यात आला आहे.

कंपनी ने आॅनर 7एस 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आॅनर 7एस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात पीडीएएफ सारखे फीचर्स आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आॅनर 7एस डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. कंपनी ने या फोन मध्ये फिं​गरप्रिंट सेंसर दिला नाही त्यामुळे हा फक्त फेस अनलॉक फीचर लाच सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी आॅनर 7एस मध्ये 3020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने आॅनर 7एस ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला आहे जो 14 सप्टेंबर पासून 6,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post शाओमी-रियलमी ला टक्कर देण्यासाठी आला आॅनर 7एस, फक्त 6,999 रुपयांमध्ये देईल शानदार स्पेसिफिकेशन्स आणि आर्कषक लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-7s-launched-in-india-feature-specifications-price-availability-offer-in-marathi/feed/ 0